Breaking News
Home / मनोरंजन / लग्न चालू असताना नवरदेव मध्येच अचानक वेड्यासारखा नाचू लागला, पाहून हसू आवरणार नाही

लग्न चालू असताना नवरदेव मध्येच अचानक वेड्यासारखा नाचू लागला, पाहून हसू आवरणार नाही

‘लग्नात लग्न, भारतीय लग्न, नव्या नवरीचं लक्ष विधींकडे, तर नवरा नाचण्यात मग्न…’ होय. आज आमच्या टीमने बघितलेल्या व्हिडियोच वर्णन थोडक्यात करायचं झालं तर वरील ओळींमध्ये करता येईल. आता लग्न म्हंटलं म्हणजे विधी, इतर कार्यक्रम, या सगळ्यांची तयारी अस सगळंच असतं. यात एवढा वेळ निघून जातो की दमछाक होते. त्यात नवीन नवरा नवरीचं तर बघायलाच नको. ते एका नवीन नात्यात आणि ते ही आयुष्यभरासाठी (अपेक्षित तर हेच असतं) प्रवेश करणार असतात. त्यामुळे त्यांच्या मनात एकचवेळी आनंद आणि घालमेल अशी अवस्था झालेली असते. म्हणूनच तर आपण अनेक वेळेस लग्न समारंभांत नवरा किंवा नवरी चक्कर येऊन पडल्याचं बघतो. कारण त्यांना काही वेळा हा ताणच सहन होत नाही. त्यांची ही चुकी नसते म्हणा.

पण प्रत्येक गोष्टीला अपवाद हे असतातच. त्यामुळे ही घालमेल नसलेले आणि स्वतःच्या लग्नात आनंद घेणाऱ्या अनेक जोड्या असतात. अगदी प्रसिध्द उदाहरणं द्यायची झाली तर अनेक वायरल व्हिडियोजची देता येतील जेथे नवरा नवरी एकत्र मिळून मस्त असा डान्स करताना दिसतात. पण प्रत्येक वेळी दोघे एकत्र नाचतील असंच काही नसतं. अनेक वेळा दोघांपैकी कोणीतरी एक जण नाचत असतो किंवा असते. पण मंडळी बहुतेक वेळा यासाठी नेमून दिलेल्या जागी डान्स चालू असतो. म्हणजे काही ठिकाणी तर डान्स फ्लोअरची व्यवस्था केलेली असते.

डीजे अगदी पाठीच असतात. त्यामुळे विधींची जागा वेगळी आणि डान्सची वेगळी असते. त्यामुळे डान्सच्या माहोलात मजा मस्ती होते आणि विधी होण्याच्या जागी विधी अगदी शांतपणे पार पडत असतात. पण वर नमूद केल्याप्रमाणे प्रत्येक गोष्टीला अपवाद असतातच. यालाही अपवाद आहेच. हे अपवादात्मक वागणं आज आपल्या टीमला एका व्हिडियोतून बघायला मिळालं. हा व्हिडियो तसा छोटासाच आहे. छोटा म्हणजे अगदी एका मिनिटापेक्षा कमी वेळेचा व्हिडियो आहे. पण यातली जी मजा आहे ना ती तुम्ही एकदा पाहिलीत की पुढची काही मिनिटं तुम्ही ती पाहतच राहता. व्हिडियो सुरू होतो तेव्हा आपल्याला विधी होत असलेला मंच दिसून येतो. नवरा नवरीचे नातेवाईक आणि मित्र परिवार वर उभा असतो. खाली पंडित जी आणि नवरी नवरा बसलेले असतात. सगळं सुरळीत चालू असतं. पण तेवढ्यात नवरा असलेल्या बाबू मोशाय यांना काय होतं माहीत नाही, पण ते नाचायलाच लागतात. बरं बसल्या बसल्याच नाच सुरू होतो. हे नाचणं म्हणजे कसं नाचणं ? तर मनमोकळेपणाने स्वतःच्या भावनांना व्यक्त करत नाचणं होय. त्यामुळे यात स्टेप्स वगैरे नसतात. असतो तो या बंगाली भावोजींचा जबरदस्त डान्स. पण हा डान्स इतका जबरदस्त असतो की त्यांच्या पाठी उभे असलेले सगळेच जण स्तब्ध होऊन जातात. आता यांना आवरायचं कसं हेच भाव त्यांच्या चेहऱ्यावर दिसून येतात.

इथे सुरुवातीला शांत वाटणारी आपली ताई मात्र नंतर तोंडावर हात ठेऊन हसायला लागते. नंतर मात्र स्वतःला सावरत ते खाली बसतात. पण अजूनही त्यांचा उत्साह शांत झालेला नसतो. पुन्हा नाचायला सुरुवात करतात आणि मग पुन्हा आपण मजा घ्यायला लागतो आणि व्हिडियो संपतो. खरं सांगतो मंडळी, हा व्हिडियो काही सेकंदांचा आहे पण आपण इतके वेळा पाहतो की काही मिनिटं सहज निघून जातात. अर्थात एक गोष्ट नमूद करावीशी वाटते ती म्हणजे यातील सगळ्यांचं वागणं बघून हा एखाद्या कलाकृतीचा (मालिका/ सिनेमा) यांचा तर भाग नाही ना अशी पुसटशी शंका येते. पण खूप शोधून ही काही सापडत नाही. त्यामुळे हा असा प्रसंग घडला असावा असंच मानावं लागतं. असो. आपण हा व्हिडियो बघितला असेल तर आपल्याला आवडला असेलच. पण आपण हा व्हिडियो बघितला नसेल तर जरूर पहा. आमच्या टीमला तर हा व्हिडियो खूप आवडला. आपल्याला ही आवडेल हे नक्की.

असो. तर मंडळी हा होता आजचा लेख. आपल्या टीमने लिहिलेला हा लेख आपल्याला आवडला असेल अशी अपेक्षा आहे. आपली टीम नेहमीच उत्तमोत्तम विषयांवर लेखन करत असते आणि करत राहील. त्यासाठी अर्थातच आपला पाठिंबा अपेक्षित आहे आणि जो आम्हाला मिळतो ही आहे. हा पाठींबा येत्या काळात ही मिळत रहावा ही सदिच्छा. आपली टीमही नेहमीच उत्तमोत्तम लेख आपल्या भेटीस घेऊन येत राहील याची खात्री बाळगा. लवकरच एका नवीन विषयासह भेट होईलच. तोपर्यंत आपल्या टीमचे अन्य नवनवीन लेख वाचत राहा. आठवणीने सगळे लेख शेअर करत राहा आणि आनंद वाटत राहा. धन्यवाद !!!

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *