Breaking News
Home / मनोरंजन / लग्न चालू असताना नवरा गुटका खात आहे हे माहिती पडल्यावर भडकलेल्या नवरीने बघा काय केले ते

लग्न चालू असताना नवरा गुटका खात आहे हे माहिती पडल्यावर भडकलेल्या नवरीने बघा काय केले ते

असं म्हणतात की लग्न झालं की नवरा मुलगा बराचसा बदलतो. काही वेळेस या बदलाचं कौतुक होतं तर काही वेळेस पारावरच्या वायफळ गप्पांना विषय मिळतो. ते काहीही असो पण लग्न झाल्यामुळे आपल्या आयुष्यात महत्वाचे बदल होतात हे निश्चित. त्यात एखाद्या नवऱ्या मुलाची बायको अगदी कडक शिस्तीची असेल आणि तो नवरा मुलगा बेशिस्त असेल तर मग काय बघायला नको. पण सहसा बायकोने नवऱ्याला शिस्त लावणं हे त्यांच्या घरात होत असतं, चारचौघात नाही. पण काही वेळेस नवरोबा एवढी हद्द करतात की काय विचारू नका. मग त्या माउलीला जगदंबेचे रूप घेऊन धडा शिकवावा लागतो. याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे नुकताच वायरल झालेला एक व्हिडियो. चला त्याविषयी सविस्तर जाणून घेऊयात. हा व्हिडियो आहे एका लग्नातला. या लग्नात सगळे विधी चालू असतात. जवळच नवरी मुलगी बसलेली असते. तिच्या डाव्या हाताला एक स्त्री आणि अजून थोडं बाजूला नवरा बसलेला असतो. तर उजवीकडे भटजी असतात.

सगळे विधी सुरू असतात आणि तेवढ्यात या नवरीच्या नजरेत एक गोष्ट येते. बाजूचा भटजी आणि होणारा नवरा तंबाखू हातात घेऊन बसले आहेत. त्यात नवरा तर खुशाल तंबाकुची मळी तोंडात घेऊन बसलेला आहे हे लक्षात येत. भर लग्नात हे असले प्रकार सहन होत नाहीत तिला. आयुष्यात सहसा एकदाच होणारा हा सोहळा आणि त्यात ही थेरं, कशी सहन करून घेईल ही माऊली. ती त्या भटजीला बडबडते. वाईट संगतीमुळे माणसाला वाईट सवयी लागतात हे सूनवते. बरं केवळ बोलूनच नाही तर हाताचा प्रसादही देते. डाव्या हाताची जी थप्पड बसते त्याच्या गालावर की सगळे गालातल्या गालात हसायला लागतात. तिथे नवरोबाची भीतीने गाळण उडालेली असते. आधीच तो किडकिडीत दिसत असतो. पण त्याचा अंदाजही बरोबर येतो. त्यालाही पडते. इथे नवरीच्या बाजूला बसलेल्या स्त्रीला हसू गालातल्या गालात दाबताना कष्ट पडत असतात. आपणही हसत असतो. शेवटी या माऊलीचा अवतार बघुन नवरा तो तंबाखू थुंकायला उठतो आणि हशा पिकतो. कारण झाल्या प्रसंगाने तो सर्द झालेला असतो. त्याच्या पाठी उभ्या असणाऱ्या सगळ्या स्त्रिया आणि पोरी हसत हसत बाजूला होतात. तेवढ्यात तो आपला तोंडातील तोबरा रिकामा करतो आणि लग्नाला पुन्हा बिचकत बसतो. याच वेळी हा व्हिडियो संपतो आणि आपण मात्र हसून हसून लोटपोट झालेले असतो.

खरं तर असा प्रसंग कोणाच्याच बाबतीत घडू नये. तसेच कोणावरही थेट फटके देण्याची वेळही येऊ नये. असो. जे झालं ते आपण बघितलं असेलच. अर्थात हा खऱ्या लग्नातील प्रसंग आहे की एखादया चित्रपटातील प्रसंग आहे हे सांगता येत नाही. पण एक मात्र खरं की काही क्षण करमणुकीचे जातात हे मात्र खरं. हा व्हिडियो एका इन्स्टाग्रामवर इन्फ्लुइन्सरने त्याच्या सोशल मीडिया अकाउंट वर शेअर केला होता. त्याबद्दल त्याचे आभार.

आपणही हा व्हिडियो बघितला असल्यास आपल्या प्रतिक्रिया आम्हाला कळवा. तसेच काही सकारात्मक सूचना असतील तर त्याही कळवा. या दोहोंतून आमची टीम सतत नवनव्या गोष्टी शिकत असते. चांगले बदल करत असते आणि आपलं मनोरंजन नेहमी उत्तम होत राहील याकडे आमचा कटाक्ष असतो. पण त्यासाठी आपल्याकडूनही प्रतिक्रिया आणि सूचना यांच्या माध्यमातून सहभाग अपेक्षित आहे. तेव्हा कमेंट्स मध्ये आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना नक्की लिहा. आपला हा स्नेह असाच वाढत जाऊ दे ही सदिच्छा. आजचा दिवस आपल्यासाठी उत्तम असो या शुभेच्छा !!!

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *