Breaking News
Home / मनोरंजन / लग्न चालू असताना नवरीचा एक्स-प्रियकर आला आणि नवरदेवासमोरच नवरीसोबत असं काही केले कि जे पाहून तुम्हीसुद्धा थक्क व्हाल

लग्न चालू असताना नवरीचा एक्स-प्रियकर आला आणि नवरदेवासमोरच नवरीसोबत असं काही केले कि जे पाहून तुम्हीसुद्धा थक्क व्हाल

लग्न म्हणजे एक आपल्या सगळ्यांच्या आयुष्यातील एक अतिशय महत्त्वाची घटना असते. या दिवशी आपण एका नवीन पर्वाला सुरुवात करत असतो. एक नवीन उमेद आणि मनात अनेक स्वप्न बाळगत आपण आपल्या जोडीदारासोबत पुढील जीवनाची लग्नागाठ बांधत असतो. त्यामुळे यासारखे महत्वाचे असे क्वचितच दिवस आपल्या आयुष्यात येतात अस म्हंटलं तरी वावगं ठरू नये.

त्यामुळे हा दिवस अविस्मरणीय असावा, सदैव लक्षात राहावा अस वाटण साहजिक असतं. त्यासाठी आपण प्रयत्नशील असतो. इतके की लग्न समारंभाची तयारी आपण मूळ समारंभाच्या बराच काळ आधी सुरू करतो. त्यातील प्रत्येक क्षणनक्षण कसा असावा याचे आपले आपले असे काही ठोकताळे असतात. त्यात नवरा आणि नवरी एकमेकांना वरमाला घालताहेत हा क्षण तर या समारंभातील सर्वोच्च क्षण असावा. कारण यावेळी लग्न संपन्न झालं असं आपण मानतो. मग त्यावेळी मजा मस्करी करणं वगैरे ही होतं. पण हे सगळं सहसा होतं. प्रत्येक गोष्टीस अपवाद हे असतातच. आणि त्यात हे अपवाद जर लग्न समारंभात घडत असतील तर बघायलाच नको. ते कायमस्वरूपी लक्षात राहतात.

असंच काहीसं झालं एका नवरी मुलीच्या बाबतीत. ही घटना घडली उत्तर प्रदेशातील एके ठिकाणी. झालं असं होतं की या मुलीचं लग्न सुरू होतं. समोर तिचा त्यावेळी होणारा नवरा उभा होता. विधी चालू होते. वरमाला घालण्याची वेळ आली. दोघांनी ही या वरमाला उचलल्या. आता तो सर्वोच्च क्षण येणार म्हणून सगळ्यांचं लक्ष या दोघांकडे लागून होतं. तेवढ्यात एक अघटित घडलं. एक मफलरधारी तरुण कुठूनसा आला आणि थेट वधूच्या पुढ्यात जाऊन उभा राहिला. क्षणभर कोणालाच काही कळेना. सगळेच अगदी स्तब्ध झाले होते. नवरा मुलगा ही जागीच थिजला होता जणू. आता हे काय लचांड आलं असं त्याच्या मनात आलं असाव बहुधा. असो. पण यातून नववधू मात्र सावरते. तिला हा तरुण काय करणार याची कुणकुण लागते. ती त्याला जोरात प्रतिकार करते. तेव्हा कुठे सगळे भानावर येतात. त्याचा प्रयत्न नाही म्हंटला तरी उधळला जातो. पण झाल्या प्रकाराने व्यवस्थित चाललेला सोहळा मात्र विस्कटतो हे नक्की. या तरुणाला आवरता आवरता सगळेच जण विधी चालू असलेल्या जागेत येतात. अगदी आतापर्यंत थिजलेला नवरा मुलगा ही या धामधुमीत बाजूला कुठे तरी ढकलला जातो. मंडपातील गोष्टी अस्ताव्यस्त होतात.

अर्थात उपस्थित सगळेच त्याला चांगला चोप देतात हे कळतं. पण त्याविषयी तथ्य माहीत नसल्याने आणि जास्त माहिती उपलब्ध नसल्याने काही भाष्य करता येत नाही. असो. हा सगळा प्रकार चालू असताना एका व्यक्तीकडून वरमाला विधीचं चित्रीकरण चालू असतं. त्यातूनच हा घडला प्रकार चित्रित होतो. हाच व्हिडियो पुढे वायरल झाल्याने आपल्या सगळयांना याविषयी कळतं. आमच्या टीमने ही हा व्हिडियो पाहिला. म्हंटलं आपली टीम लग्नाच्या व्हिडियोज विषयी लिहीत असते. तसेच वायरल व्हिडियो विषयी सुद्धा लिहीत असते. तेव्हा याविषयी ही लिहू जेणेकरून आपल्या वाचकांना घडली घटना ही कळेल.

तर मंडळी हा होता आजचा लेख. आपल्या टीमने लिहिलेला हा लेख आपल्याला आवडला असेल अशी अपेक्षा आहे. आपली टीम नेहमीच उत्तमोत्तम विषयांवर लेखन करत असते आणि करत राहील. त्यासाठी अर्थातच आपला पाठिंबा अपेक्षित आहे आणि जो आम्हाला मिळतो ही आहे. हा पाठींबा येत्या काळात ही मिळत रहावा ही सदिच्छा. आपली टीमही नेहमीच उत्तमोत्तम लेख आपल्या भेटीस घेऊन येत राहील याची खात्री बाळगा. लवकरच एका नवीन विषयासह भेट होईलच. तोपर्यंत आपल्या टीमचे अन्य नवनवीन लेख वाचत राहा. आठवणीने सगळे लेख शेअर करत राहा आणि आनंद वाटत राहा. धन्यवाद !!!

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published.