घर पाहावं बांधून आणि लग्न पाहावं करून म्हणतात ते काही खोटं नाही. त्यात हल्लीच्या काळात तर या दोन्ही गोष्टी करणं म्हणजे तारेवरची कसरत असते. बरं ही कसरत पूर्ण केली तरी सगळं आपल्या मनासारख होईल असं नाही. एकवेळ घर खरेदी किंवा बांधणीच तरी ठीक आहे. पण लग्न समारंभ सांभाळणं म्हणजे हातावरच्या फोडाला सांभाळण्यासारखं आहे. जरा नजर हटी की दुर्घटना घटीच म्हणून समजा.
आणि या सगळ्याला बहुधा फोडणी द्यायला मानपान करणारी माणसं आघाडीवर असतात. कामाच्या नावाने बोंब असते. पण मान घ्यायला पुढे असतात. ते नसले तर मग कधी कधी केटरर्सवाल्यांच्यी एकमेकांसोबत जुंपते. काही वेळा तर लग्नाला आलेली घोडी फटाक्यांना घाबरून पळत सुटते. काही वेळा नवरदेव ही तिच्यावर असतात. तेव्हा त्याचीही तारांबळ उडते. पण मंडळी, यातील बहुतांश गोष्टी आधीच लक्षात घेऊन त्यावर नियंत्रण मिळवता येऊ शकतं. कारण या गोष्टी बऱ्याच लग्नात होतात. तेव्हा आगाऊ सूचना देऊन ठेवल्या आणि नियोजन केलं की सगळं नियंत्रणात येऊ शकतं. पण मंडळी, विचार करा, बोहल्यावर चढणारे नवरा बायकोच भांडायला लागले तर ? बरं शब्दांचा वापर होत असेल तर ठीक आहे पण हातात जे मिळेल ते फेकण्यापर्यंत गोष्टी गेल्या तर? असंच काहीसं एका लग्नात झालं.
हे लग्न कुठे होतं कल्पना नाही. पण बहुधा उत्तर भारतात कुठे तरी असावं असं अंदाज करता येतो. आपण व्हिडियोत नीट बघतो तेव्हा कळून येतं की लग्नाचा मंडप अगदी भारी सजवलेला असतो. नवरा नवरी बसण्याची मंचक व्यवस्था उत्तम असते. हृदयाच्या आकाराला फुलांची जोड मिळालेली असते. सोबतच झुंबरांच्या जागी ही महागडी फुलं असतात. आणि या अशा थाटात होत असलेल्या विवाह सोहळ्याला अनेक जण उपस्थित असतात. एवढ्या प्रमाणात की नवरा नवरीच्या अगदी आजूबाजूला ही मंडळी उभी असतात. एवढी मंडळी एकत्र आली की गोंधळ हा उडतोच. या सगळ्या गोंधळात नवरा नवरी यांच्या सोबत एक रितभात म्हणून गोडधोड भरवण्याचा कार्यक्रम होत असतो. आम्ही पाहिलेल्या अन्य व्हिडियोत ही हे दिसून येतं. आपल्याकडे लग्नात जेवताना हा प्रकार होतो. या ठिकाणी मंचावर हे केलं जातं. पण वर उल्लेख केलेला विषय इथे असतो. नवरा नवरी दोघेही भडकलेले असतात. आपल्याला हे असं का याचं कारण शेवटपर्यंत कळत नाही. पण त्याचे परिणाम मात्र दिसून येतात. कारण नवरा त्या नवरीला पेढा म्हणून भरवायला जातो. तर पठ्ठी तो पेढा खायचा सोडून उपस्थित लोकांमध्ये तो भिरकावून देते. त्याआधी त्यांच्यात काही तरी बिनसलं असणार त्याची ही परिणिती असते.
बरं इथपर्यंत सगळं थांबावं की नाही. कसलं काय. आता नाराज होण्याची नवऱ्याची वेळ असते. नवरी त्याला पाणी भरवायला जाते. पण आता तो पाणी पिणं नाकारतो. मग काय पुन्हा नवरी हातातला पेला उपस्थित लोकांमध्ये भिरकावते. अहो एकवेळ पेढ्याच ठीक आहे. ज्याला मिळाला त्याला आयताच पेढा खायला मिळेल. पण पेला कुणाच्या टाळक्यात पडला असता तर? काय माहित, पडला ही असेल. पण हे अस सगळं होतं. आता या अशा प्रसंगी कोणी काय करावं? ज्यांची मनं एकत्र येणं आवश्यक असतं तीच मंडळी अस वागायला लागली तर झालंच की. अर्थात यांमुळे उपस्थित लोकांना तेवढंच खाद्य मिळतं चघळायला हे काही वेगळं सांगायला नको. अगदीच नाही म्हणायला आपली ही करमणूक होतेच. असो. आपल्याला सदर व्हिडियो बघायचा असल्यास आपल्या या लेखाच्या शेवटी बघा. आमची टीम आपल्यासाठी तो व्हिडियो शेअर करेल.
बरं तर मंडळी हा होता आजचा आपला लेख !आपल्या टीमने लिहिलेला हा लेख आपल्याला आवडला असेल अशी अपेक्षा आहे. आपली टीम नेहमीच उत्तमोत्तम विषयांवर लेखन करत असते आणि करत राहील. त्यासाठी अर्थातच आपला पाठिंबा अपेक्षित आहे आणि जो आम्हाला मिळतो ही आहे. हा पाठींबा येत्या काळात ही मिळत रहावा ही सदिच्छा. आपली टीमही नेहमीच उत्तमोत्तम लेख आपल्या भेटीस घेऊन येत राहील याची खात्री बाळगा. लवकरच एका नवीन विषयासह भेट होईलच. तोपर्यंत आपल्या टीमचे अन्य नवनवीन लेख वाचत राहा. आठवणीने सगळे लेख शेअर करत राहा आणि आनंद वाटत राहा. धन्यवाद !!!
बघा व्हिडीओ :