Breaking News
Home / मनोरंजन / लग्न चालू असताना ह्या नवरीने रागाने जे केले ते पाहून तुम्हालासुद्धा नवरदेवाची दया येईल, बघा हा चक्रावून टाकणारा व्हिडीओ

लग्न चालू असताना ह्या नवरीने रागाने जे केले ते पाहून तुम्हालासुद्धा नवरदेवाची दया येईल, बघा हा चक्रावून टाकणारा व्हिडीओ

आपली टीम जेव्हा जेव्हा लग्नाच्या वायरल व्हिडियोज विषयी लिहिते तेव्हा तेव्हा एक वाक्य कायम असतं. आपल्या नियमित वाचकांना तर त्या वाक्याची सवयच झाली असेल. हे वाक्य म्हणजे ‘लग्न म्हणजे किस्से हे एक अतूट समीकरण आहे’. आणि हे खरंच आहे. कारण असा एखादा विवाह सोहळा नसेल ज्यात गंमत जंमत, फटफजिती आणि किस्से घडले नसतील. यापैकी निदान एक तरी गोष्ट घडतेच घडते. याला अनेक कारणं असतात. पण यातलं प्रमुख कारण म्हणजे माणसं असतात हे आपणही मान्य कराल.

बरं त्यात या माणसांचे जसे स्वभाव असतात त्याप्रमाणे गोष्टी घडतात. आता एखादी व्यक्ती वेंधळी असेल तर हमखास काही तरी विसरलं जातं. मग त्यासाठी पुन्हा विवाह स्थळ आणि इतर ठिकाणी ये जा करा. तर काही वेळा माणसं अगदी अतरंगी असतात. मुद्दामहून खोड्या काढतात. त्यात मानपान वगैरे असतो अशा ठिकाणी ही माणसं असली तर डोक्याला ताप झालाच समजायचा. तर काही माणसं ही स्वभावाने शांत असतात पण एकदा त्यांना काही विशिष्ट पेयं चढली की मग त्यांचा नूर बदलतो. अचानक त्यांच्यातील एकतर डान्सर जागा होतो किंवा मनातील भडास बाहेर निघते, त्यामुळे किस्से न होतात तर नवलच. असे एकापेक्षा एक अनेक उदाहरणे देता येतील. पण त्यातील काही जण खास लक्षात राहतात ते त्यांना आलेल्या रागामुळे.

काहींचा स्वभावच तसा असतो किंवा काहींना काही गोष्टींचा राग येतो. त्यात मानपानवाले तर बघायलाच नको. पण राग जर खुद्द नवरा नवरीला आला तर ? होय, असं काही घडलं तर चर्चा होते आणि घटना लक्षात ही राहते. अशीच एक घटना एके ठिकाणच्या लग्नात चित्रित झाली. म्हणता म्हणता हा व्हिडियो वायरल ही झाला. एवढंच काय तर या व्हिडियोचा दुसरा भाग ही प्रदर्शित केला गेला. पण असं काय होतं या व्हिडियोत ? या व्हिडियोत आपल्याला भेटते ती बऱ्यापैकी रागावलेली नवरी. व्हिडियो सुरू होतो तेव्हा ती चालत येत असते. भरजरी पोशाख आणि दागिने यांनी मढलेली ही नववधू हळूहळू पुढे येत असते. तोपर्यंत सगळं वातावरण शांत असतं. पण तेवढ्यात तिला समोर नवरा मुलगा दिसतो. तत्क्षणी काय होतं ते माहीत नाही पण तिची रागीट प्रतिक्रिया बाहेर पडते. इतका राग असतो की क्षणभर हे असं काय झालं याचाच प्रश्न आपल्याला पडतो. आता यावर सोशल मीडियावर बऱ्यापैकी कमेंट्स आलेल्या दिसून येतात. दुसऱ्या व्हिडियोत ही , नवरीचा राग अजूनही तसाच असतो असच म्हणावं लागेल. दोन्ही व्हिडियोत नवऱ्या मुलाकडून मात्र फारशी अशी प्रतिक्रिया येताना दिसत नाही. ती का येत नाही वगैरे काहीही माहिती उपलब्ध नाही.

तसेच घटनेची पार्श्वभूमी माहीत नसल्याने यावर केवळ काही तर्क लावून निष्कर्ष काढणे वा टिप्पणी करणे योग्य वाटत नाही. त्यामुळे आपली टीम याविषयी काहीही भाष्य करू इच्छित नाही. असो. पण अशा काही घटना किस्से मात्र बनून जातात हे नक्की. त्यात हल्लीच्या काळात सोशल मीडियामुळे ते वायरल ही होतात आणि त्यांची चर्चा ही होते. आणि आपली टीम वायरल व्हिडियोज वर लिहितच असते. त्यातूनच हा लेख लिहिला गेला आहे.

आपली टीम नेहमीच विविध विषयांवर लेखन करत असते आणि करत राहील. त्यासाठी अर्थातच आपला पाठिंबा अपेक्षित आहे आणि जो आम्हाला मिळतो ही आहे. हा पाठींबा येत्या काळात ही मिळत रहावा ही सदिच्छा. आपली टीमही नेहमीच उत्तमोत्तम लेख आपल्या भेटीस घेऊन येत राहील याची खात्री बाळगा. लवकरच एका नवीन विषयासह भेट होईलच. तोपर्यंत आपल्या टीमचे अन्य नवनवीन लेख वाचत राहा. आठवणीने सगळे लेख शेअर करत राहा आणि आनंद वाटत राहा. धन्यवाद !!!

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *