Breaking News
Home / मनोरंजन / लग्न झाल्यानंतर वरातीतल्या लोकांनी नवरदेवाला ‘जोरू का गुलाम’ गाण्यावर डान्स करायला लावले, पाहून नवरीदेखील लाजली

लग्न झाल्यानंतर वरातीतल्या लोकांनी नवरदेवाला ‘जोरू का गुलाम’ गाण्यावर डान्स करायला लावले, पाहून नवरीदेखील लाजली

कलेचा वापर हा जसे स्वतःचे कलागुण दाखवण्यासाठी केला जातो. तसाच तो स्वतःच्या भावना व्यक्त करण्यासाठी केला जात असतो. बरं जेव्हा एखादे कलागुण प्रदर्शित करायचे असतात तेव्हा ती व्यक्ती कलाकार असते. किंबहुना ती तशी असावी ही आपली अपेक्षा असते. याचप्रमाणे जेव्हा आपल्या मनातील भावना व्यक्त करण्यासाठी एखादया कलेचा वापर करताना व्यक्ती कलाकार आहे की नाही हे तेवढं महत्वाचं नसतं. त्या व्यक्तीच्या भावना व्यक्त होण्यासाठी एक माध्यम मिळणं गरजेचं असतं आणि ही गरज कलेच्या अनुषंगाने पूर्ण होत असते.

म्हणूनच काही वेळा कलाकार नसलेल्या व्यक्ती ही चारोळ्या लिहून स्वतः ला व्यक्त करतात. अनेकवेळा गाणं गुणगुणण हे सुद्धा यातच येतं. पण या सगळ्यांपेक्षा एक कलाप्रकार असतो जो वरचेवर वापरला जातो. तो म्हणजे डान्स होय. आपला आनंद व्यक्त करण्यासाठी अगदी सर्रास वापरला जाणारा हा कलाप्रकार आहे. अर्थात बेभानपणे, भावना व्यक्त करताना त्यातील कला बाजूला राहते. पण असो. त्यातून नाचणाऱ्या व्यक्तीला आनंद मिळतोय हे महत्त्वाचं असतं. तसेच काही वेळा आपल्याला आनंदाने झालेला उत्साह ही एवढा असतो की तो नाचल्याशिवाय पूर्ण होत नाही.

आता आमच्या टीमने बघितलेल्या एका व्हिडियोच उदाहरण घेऊ. हा व्हिडियो काही काळापूर्वीचा आहे. एका लग्नातला व्हिडियो आहे. आता लग्न म्हंटलं म्हणजे डान्स ही आलाच आणि जबरदस्त डान्स करणारे ही आलेच. पण सहसा हा जबरदस्त डान्स करणारे बहुतेकवेळा वऱ्हाडी मंडळी असतात. कारण नवरा नवरी हे लग्न मंचावर विधी, भेटीगाठी यात व्यस्त असतात. अगदीच काही नाही तरी नवरी लग्नात एन्ट्री करताना नाचून घेते. पण नवरोबा लग्नात नाचल्याची उदाहरणं त्यामानाने कमी असतात. पण जेव्हा असतात तेव्हा जबरदस्त असतात. हा व्हिडियो ही याचंच एक प्रतिक आहे. या व्हिडियोत आपल्याला दिसणारा नवरा असा काही खुश झालेला असतो की विचारू नका. त्याच्या गाण्यातून ते दिसत असतं. बहुधा त्याला डान्सची आवड ही असावी. पण ते काहीही असलं तरी पठ्ठ्या त्यावेळेस असा काही नाचतो की सगळा माहोल हलवून टाकतो. बरं त्यात गाणं पण गंमतीशीर सुरू असतं. ‘जोरु का गुलाम बनके रहुंगा’ हे ते गाणं होय. पण कसला गुलाम नी कसला काय. जोरूला बघून या नवरूला जो काही आनंद झालेला असतो तो विचारता सोय नाही. त्यात ‘जोरु जोरू जोरू जोरू’ अशी एक ओळ येते. तेव्हा त्याचा हा आनंद सगळ्यांत जास्त ओसंडून वाहत असतो.

अर्थात आनंद व्हायला ही हवा आणि तो व्यक्त करायला ही हवा. आणि जर व्यक्त करायचा असेल तर या नवरदेवासारखा व्यक्त करायला हवा. कारण एवढ्या मोकळेपणाने नाचणारा नवरदेव आमच्या टीमने तर पहिल्यांदाच पाहिला. त्यातही त्याचा जो आत्मविश्वास असतो त्याचीही दाद द्यायला हवी. आपण डान्स करताना चुकु वगैरे भाव त्याच्या चेहऱ्यावर एकदा ही येत नाही. उलट तो त्याच्या लाजाळू नवरीला डान्स करण्यासाठी ओढून घेतो. पण त्या भावाच्या डान्सचा झंझावात एवढा असतो की ती ताई लाजून आपली मागेच राहते. पण या भावाचा तरीही डान्स चालू असतो. पण एक गोष्ट आहे. हा एक शॉर्ट प्रकारातील व्हिडियो आहे. त्यामुळे याची वेळ एका मिनीटापेक्षा कमी आहे. त्यामुळे त्या एका मिनीटापेक्षा कमी वेळात आपल्याला त्याचा जो डान्स दिसायचा तो दिसतो. पण खरं तर त्यांच्यातील ऊर्जा इतकी।जबरदस्त असते की कोणालाही त्याचा काही मिनिटांचा डान्स नक्की बघावासा वाटेल. असो. एखादी गोष्ट जितकी असते त्यातच समाधान मानायचं असतं. असो. आमच्या टीमला तर हा व्हिडियो प्रचंड आवडला. आम्ही हा लेख लिहिण्याआधी हा व्हिडियो किती तरी वेळा बघितला. त्याची मजा घेतली. आपणही हीच मजा अनुभव शकता. त्यासाठी आपल्याला या लेखाच्या शेवटी हा व्हिडियो शेअर केलेला दिसेल.

आमच्या वाचकांसाठी आम्ही हा व्हिडियो शेअर करतो आहोत. त्याचा जरूर आनंद घ्या. तसेच आपल्या टीमने लग्नातील मजेशीर व्हिडियोज या विषयावर असंख्य लेख लिहिले आहेत. तसेच अन्य मजेशीर विषयांवर ही लिहिलं आहे. तेव्हा हे लेख जरूर वाचा. कारण आपली टीम आपल्या वाचकांसाठी अगदी शोधून शोधून विषय निवडत असते. त्यावर माहिती घेऊन लिहीत असते. त्यामुळे दिसलं काही तरी आणि लिहून दिलं अस होत नाही. अनेकवेळा तर विविध विषयांवर लिहिताना खूप वेळ ही खर्ची पडतो. पण ते करण्याची आमची तयारी असते. कारण आमची लिहायची आणि आपली वाचायची आवड यासाठी आम्ही हे अगदी मनापासून करत असतो. पुढेही करत राहू. गरज आहे ती आपल्या खंबीर पाठिंब्याची ! तो कायम मिळत राहू दे ही सदिच्छा ! लवकरच एका नवीन विषयासह भेटूच. तोपर्यंत काळजी घ्या, आमचे सगळे लेख वाचा आणि आठवणीने शेअर करा. धन्यवाद !!!

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published.