Breaking News
Home / जरा हटके / लग्न झाल्यावर पळून गेली होती नवरी, काही दिवसानंतर प्रियकरासोबत पोलिस ठाण्यात पोहोचून हट्ट केला कि

लग्न झाल्यावर पळून गेली होती नवरी, काही दिवसानंतर प्रियकरासोबत पोलिस ठाण्यात पोहोचून हट्ट केला कि

उत्तरप्रदेश येथील चित्रकूटमध्ये एक नवरी लग्न झाल्यानंतर पुढच्या दिवशी निरोप घ्यायच्या अगोदरच घरातून फरार झाली. मुलाच्या व मुलीच्या घरच्यांनी तिचा खूप शोध घेतला परंतु तिचा कुठेच शोध लागला नाही. ज्यानंतर मुलीशिवायच वरातीला मागे परतावे लागले. तर काही दिवसानंतर फरार झालेली नवरी एका तरुणासोबत पोलिस स्थानकात पोहोचली आणि पोलिसांना लग्न लावून देण्याचा हट्ट करू लागली. त्यानंतर जे घडलं त्याची कल्पनाच कोणी केली नसेल. हि अजबगजब घटना उत्तरप्रदेशातील मऊ ठाणे क्षेत्रात घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार काही दिवसांपूर्वीच एका मुलीचे लग्न तिच्या कुटुंबीयांनी जबरदस्तीने करून दिले होते. मुलगी ह्या लग्नामुळे खुश नव्हती. परिणामी हि मुलगी लग्नानंतर ताबडतोब आपल्या घरातून फरार झाली. कुटुंबीयांनी आपल्या मुलीचा खूप शोध घेतला, परंतु ती त्यांना भेटली नाही. ज्यानंतर नवरीशिवायचं नवऱ्याला आपल्या घरी परतावे लागले. ह्या घटनेला एक नवीन वळण आले, जेव्हा फरारी नवरी पोलीस स्थानकात आपल्या प्रियकरासोबत पोहोचली. आणि तिने पोलिसांना त्यांचे लग्न लावून देण्याची मागणी केली.

सांगितले जात आहे कि, मऊ ठाणे क्षेत्रातील मवई खुर्द गावात शत्रुघ्न नावाच्या व्यक्तीने आपली मुलगी राणीचे लग्न सुरौंधा गावातील अजय नावाच्या मुलासोबत ठरवले होते. २९ मे रोजी अजय आपली वरात बँडबाजा घेऊन राणीच्या घरी पोहोचला. लग्नानंतर सर्व विधी पूर्ण झाल्या. अजय आणि राणी दोघांनीही सात फेरे सुद्धा घेतले. पुढच्याच दिवशी मुलीची पाठवणी होणार होती. परंतु ३० मे ला पाठवणीच्या अगोदरच नवरी राणी आपल्या प्रियकरासोबत फरार झाली.

शौचालयाच्या बहाण्याने घरातून निघाली :
जेव्हा सकाळी नवरीच्या पाठवणीची वेळ आली तेव्हा राणी शौचालयाला जाण्याच्या बहाण्याने आपल्या खोलीतून बाहेर आली. घराच्या थोड्या अंतरावरच राणीचा प्रियकर छुट्टन पटेल तिची वाट पाहत होता. तर दुसरीकडे, खूप वेळ होऊनही राणी घरी परतली नाही तेव्हा तिचे कुटूंबीय चिंतातुर झाले. त्यांनी तिचा शोध घ्यायला सुरुवात केली. परंतु तिचा कुठेच आत्तापता मिळाला नाही. ज्यानंतर संपूर्ण लग्न समारंभात हि बातमी वाऱ्यासारखी पसरली. बातमी माहिती होताच मुलाच्या घरच्यांनी खूप तमाशा केला.

छोट्या बहिणीसोबत करवून देत होते लग्न :
हे प्रकरण सोडवण्यासाठी मुलीच्या कुटुंबीयांनी नवरीच्या छोट्या बहिणीच्या लग्नाचा प्रस्ताव मुलाच्या कुटुंबीयांसमोर ठेवला. परंतु मुलाच्या कुटुंबीयांनी नवरीच्या बहिणीचे वय १८ वर्षांपेक्षा कमी असल्या कारणाने हा प्रस्ताव मान्य केला नाही आणि नवरीविनाच नवरा आपली वरात घेऊन पुन्हा आपल्या गावी परत गेला.

तर नवर्याच्या वडिलांनी मऊ येथील ठाण्यात राणीच्या वडिलांच्या विरोधात तक्रार देऊन कारवाई करण्याची मागणी केली होती. पोलिसांनी प्रेमी जोडप्याचा शोध सुरु केला. परंतु ह्या दरम्यानच प्रेमी जोडपे स्वतः पोलीस ठाण्यात पोहोचले. गुरुवारी आपल्या प्रियकरासोबत ठाण्यात पोहोचलेल्या नवरी राणीने सांगितले कि आमचे एकमेकांवर प्रेम आहे आणि लग्न करू इच्छितात. काही वेळानंतर त्यांचे कुटुंबीय सुद्धा ठाण्यात पोहोचले. जिथे पोलिसांच्या समोरच ह्या दोघांनी लग्न केले आणि दोघेही विवाहबंधनात अडकले.

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *