Breaking News
Home / मनोरंजन / लग्न झाल्यावर रडू येत नव्हते म्हणून रडण्याचा अभिनय करत होती नवरी, व्हिडीओ पाहून हसू आवरणार नाही

लग्न झाल्यावर रडू येत नव्हते म्हणून रडण्याचा अभिनय करत होती नवरी, व्हिडीओ पाहून हसू आवरणार नाही

व्यक्ती विनोदी स्वभावाच्या असतील तर त्यांच्यासोबत वावरायला, राहायला मजा येते. आयुष्यात थोडी तरी का होईना गंमत येते. आयुष्यात जेव्हा धीर गंभीर व्हावं लागतं, तेव्हा व्हायला ही पाहिजे. पण अन्यवेळी आयुष्याची मजा ही घेता आली पाहिजे. आणि ही मजा या विनोदी स्वभावाच्या व्यक्तींमुळे नेहमीच येत असते. आपल्या आयुष्यातही अश्या विनोदी स्वभावाच्या व्यक्ती असतीलच. कारण बाकी कोणी नाही तरी निदान आपला एखादा मित्र किंवा एक मैत्रीण ही तरी विनोदी असतेच असते.

अनेकवेळा त्यांचं अतरंगी वागण बघून आपल्याला हसू आवरत नाही. बरं कधी काय करतील नी कधी काय बोलतील याचा नेम नसतो. बरं त्यातही जिथे हशा, मजा, मस्ती हवा तिथे ठीक आहे हो. पण जिथे धीर गंभीर वातावरण हवं आहे तिथेही ही मंडळी काही तरी पुटपुटतात. नशीब चांगलं असेल तर केवळ आपणच ऐकतो. पण मग पंचाईत असते. आता सगळ्यांच्या समोर हसायचं कसं? यापेक्षा वाईट अवस्था म्हणजे आपलं कुजबुजत बोलणं अचानक शांतता पसरल्याने सगळ्यांना ऐकू जाणं. द्विधा अवस्थाच असते ती ! हसायला ही येतंय आणि वाट ही लागलीये. पण हे असे काही प्रसंगच आयुष्यात किस्से घडवतात. कारणीभूत असतात अर्थातच आपली विनोदी बुद्धीची मंडळी !

अशाच एका गंमत्या मुलीचा व्हिडियो आमच्या टीमने आज बघितला. खोटं सांगत नाही वाचकहो, केवळ दोन मिनिटांत यावर लिहायला बसलोय. कारण त्याआधी जवळपास पाच मिनिटं आम्ही केवळ हसतच होतो. बरं हा व्हिडियो काही फार मोठा वगैरे नाहीये. केवळ काही सेकंदांचा आहे. पण त्यातील जी गंमत आहे ती त्यापेक्षा ही जास्त वेळेची आहे. हा व्हिडियो म्हणजे एका मुलीची बिदाई दाखवणारा व्हिडियो आहे. खरं तर बिदाई किंवा पाठवणी हा लग्न सोहळ्यांतील सगळ्यांत भावुक क्षण असतो. संपूर्ण सोहळाभर लपवून ठेवलेले अश्रू आता बाहेर येत असतात. हा क्षण येऊच नये असं मुलीच्या पालकांना वाटल्यास नवल नाही. अतिशय भावुक असे हे क्षण असतात. पण नेमक्या याच क्षणी कोणी मस्करी केली तर? खरं तर त्या व्यक्तीला ओरडलं जाईल. पण ही व्यक्ती खुद्द नवरी मुलगी असेल तर? अहो हो, खरंय ते ! या व्हिडियोत चक्क नवरी मुलगी गाडीत बसून सासरी जायला निघत असते. पहिले काही क्षण रडण्याचा अभिनय करत असते. बाकीच्यांना याची कल्पना असल्याने ते खुदुखुदु हसत असतात. नवरीच्या मागे बसलेल्या मुलाला या सगळ्यांची कल्पना असावी. तसेच गाडी बाहेरील व्यक्तींना ही याची कल्पना असणार. त्यामुळे एक जण तिचा हा अभिनय असल्याचं दाखवायला जातो. ती पण त्याला हटकते. हे सगळं अर्थातच मजेमजेत चाललं असल्याने सगळ्या वातावरणात हस्यकल्लोळ उमटलेला असतो.

आजूबाजूला कॅमेरा फिरला की बाजूला उभ्या असलेल्या ताई माई अक्का सगळया जणी हसत असतात. पण हे वागणं स्वतः नवरी मुलीला नवीन नसतं. तिचा स्वभाव गमत्याच असावा. त्यामुळे तिचा मजेशीर अभिनय चालू असतो. आम्ही हा व्हिडियो बघून खूप हसलो. म्हंटलं याविषयी लिहायला हवं. आपल्या वाचकांना ही याविषयी जाणून घेऊन मजा वाटेल. बरं नुसतं वाचून मनोरंजन होण्यासोबत हा व्हिडियो बघता आला तर किती उत्तम, आपल्या वाचकांना आवडेलच. हाच विचार करून सदर व्हिडियो या लेखाच्या शेवटी शेअर केला आहे. आपण तो व्हिडियो बघून त्याचा आनंद घेऊ शकता.

बरं तर मंडळी हा होता आजचा आपला लेख !आपल्या टीमने लिहिलेला हा लेख आपल्याला आवडला असेल अशी अपेक्षा आहे. आपली टीम नेहमीच उत्तमोत्तम विषयांवर लेखन करत असते आणि करत राहील. त्यासाठी अर्थातच आपला पाठिंबा अपेक्षित आहे आणि जो आम्हाला मिळतो ही आहे. हा पाठींबा येत्या काळात ही मिळत रहावा ही सदिच्छा. आपली टीमही नेहमीच उत्तमोत्तम लेख आपल्या भेटीस घेऊन येत राहील याची खात्री बाळगा. लवकरच एका नवीन विषयासह भेट होईलच. तोपर्यंत आपल्या टीमचे अन्य नवनवीन लेख वाचत राहा. आठवणीने सगळे लेख शेअर करत राहा आणि आनंद वाटत राहा. धन्यवाद !!!

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published.