Breaking News
Home / मनोरंजन / लग्न झाल्या झाल्या नवरा नवरींनी रस्त्यावरच केला अतरंगी डान्स, नवरीचा डान्स पाहुन तर हसू आवरणार नाही

लग्न झाल्या झाल्या नवरा नवरींनी रस्त्यावरच केला अतरंगी डान्स, नवरीचा डान्स पाहुन तर हसू आवरणार नाही

सोशल मीडियाची एक गम्मत असते, ती म्हणजे सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल हे सांगता येत नाही. लग्नातील कॉमेडी आणि डान्सचे व्हिडीओ तर सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असतात. एवढ्यात तर नवरा आणि नवरीचेही जोमात डान्स करतानाचे व्हिडीओ व्हायरल होताना आपल्याला दिसून येतील. भारतातील लोकांमध्ये लग्नात नवरी-नवरीने बिनधास्त नाचण्याचा ट्रेंड सध्या व्हायरल होत आहे. परंपरांना फाटा देत नव्याने काही गोष्टी आत्मसात करण्यात भारतीय आनंद मानतात. आपल्यालाही वाटत असत की, बाहेरदेशात एकदम मोकळं वातावरण आहे, पण काही देशांमध्ये अजूनही लग्न-कार्यात अनेक बंधने असतात. पण तुम्ही जगात कुठेही जा… लग्नात नाचण्याचा कार्यक्रम फिक्स असतोय… आधी लग्नाच्या वरातीत पाहुणे मंडळी, दोस्त, नातेवाईक, गावकरी नाचायचे. आता नाचायला सुरुवातच नवरा-नवरी करतात. आणि ते असा काही डान्स करतात की, लग्नाचा माहोलच एकदम बदलून टाकतात.

सध्या एका नव्या नवरीचा व्हिडीओ समाजमाध्यमांवर बोले तो सोहळा मीडिया पे एकदम दणक्यात आणि मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक नवरी आपल्या नवरदेवासोबत लग्न झाल्यावर रस्त्यावर आली आहे आणि सगळ्यांना अतरंगी वाटेल असा अगदी मजेदार डान्स करत आहे. आता हा नवरीने केलेला डान्स एवढा दिलखुलास आहे की, त्यामुळे लग्नाला जमलेल्या पाहुण्यांचे डोळे विस्फारले गेले आहेत. हा व्हायरल झालेला व्हिडीओ बाहेरदेशातला आहे. मात्र सुरुवातीला म्युझिक ऐकून आणि नवरदेवाचा डान्स बघून असं वाटतं की, भारतातल्या एखाद्या राज्यातील असावा. मात्र मग पाहुण्यांवर नजर गेल्यावर आणि जसं म्युझिकमध्ये बदल होतो, त्यावरून लक्षात येतं की, हा व्हिडीओ बाहेर देशातील आहे. आता आपल्याकडे लग्नाच्या आधी मोकार उर बडवून नाचतेत. “हान की बडीव, धुरळा उडीव” अशी आपली नाचायची स्टाईल असते. म्हणजे कुठल्याही लग्नात जर नवरा-नवरीला नाचायला लावले तर नवरी थोडी लाजणार आणि जमेल तसा डान्स करणार. मात्र नवरा एकदम धुमशान नाचणार.

मात्र आमच्या हाती लागलेल्या या व्हायरल व्हिडीओत काहीतरी वेगळाच प्रकार बघायला मिळाला आहे. या व्हायरल व्हिडीओत नवरा-नवरीने चक्क हॉटेलसमोर असलेल्या रस्त्यावर डान्स केला आहे. या नवरीचा अतरंगी आणि दिलखूलास डान्स नेटकऱ्यांना चांगलाच आवडला आहे, असे दिसत आहे. नवरा एकदम पॅन्ट धरून मोकळ्यात नाचत आहे. नवरीला मात्र मोठ्या लांब ड्रेसमुळे आणि पायात असलेल्या चपलांमुळे नाचायला बंधने येत आहेत. मग एका पॉईंटला तिलाही नाचण्याचा मूड येतो आणि चप्पल काढून ती जो डान्स सुरू करते…. ते पाहून सगळेच आश्चर्यचकित होतात. अजून एक भारी गोष्ट म्हणजे तिथे उभे असलेले लोक तिला नृत्य करण्यास देखील सांगत आहेत. इंटरनेटवर व्हायरल झालेला हा व्हिडिओ पाहिल्यानंतर लोकांनी एकदम हटके प्रतिक्रिया दिलेल्या आहेत. जगताना माणसाने प्रत्येक गोष्ट अशीच मनसोक्तपणे केली पाहिजे, असाही संदेश या व्हिडीओतुन नकळत मिळतो. तर असाच आयुष्याचा असाच मनसोक्तपणे आनंद लु’टत राहा कारण हे आयुष्य एकदाच आहे. आता तुम्हीही हा व्हिडीओ पाहून मजा घ्या. आमचे लेख वाचून, व्हिडीओ पाहुन आनंदी राहा आणि काळजी घ्या.

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *