Breaking News
Home / मनोरंजन / लग्न झाल्या झाल्या वहिनींनी सर्वांसमोर केला अप्रतिम डान्स, बघा व्हिडीओ

लग्न झाल्या झाल्या वहिनींनी सर्वांसमोर केला अप्रतिम डान्स, बघा व्हिडीओ

आपल्या मित्र किंवा मैत्रिणीचं लग्न असेल तर आपल्या काही ठरलेल्या इच्छा असतात. हळदी च्या दिवशी ‘टल्ली’न होता यावं ही जशी पुरुषांची इच्छा असते तशीच स्त्रियांची इच्छा असते की आपण मस्त साड्या आणि दागिने घालून मिरवाव. पण यांच्यात एक समान धागा ही असतो. हा समान धागा म्हणजे दोघांनाही आपल्या मित्रमैत्रिणी च्या लग्नात धमाल डान्स करायचा असतो. मग ते नवरा नवरी मंडपात दाखल होताना असो वा इतर कोणत्या वेळेस असो. डान्स तो बनता है. मित्र आणि मैत्रिणींप्रमाणे घरचेही यात आघाडीवर असतात. खासकरून आपल्या एखादया उत्साही वहिनी वगैरे असतील तर मग धमाल. आज आपल्या टीमने अशाच एका उत्साही वाहिनींचा त्यांच्या दिराच्या लग्नातील डान्स व्हिडियो बघितला. त्यांनी डान्स अगदी उत्तम केला. म्हंटलं याविषयी आपल्या वाचकांना वाचायला नक्की आवडेल म्हणून हा लेखप्रपंच.

हा व्हिडियो आहे ,VV Bhangra या डान्स जोडीमधील वरूण यांच्या लग्नातला. यातील अजून एक जो V आहे तो म्हणजे विनय. या दोघांचं एक युट्युब चॅनेल असून भांगडा या लोकप्रिय नृत्यप्रकाराला वाहिलेलं चॅनेल आहे. याच चॅनेलवर वरुण यांच्या लग्नातील व्हिडियो सुद्धा बघता येतो. या व्हिडियोत आपल्याला वरुण यांच्या वहिनी डान्स करताना दिसतात. बहुधा वरुण हे मंडपात येत असताना त्यांनी हा डान्स केला असावा. व्हिडियो सुरू होतो तेव्हा आपल्याला समोर उभे वरुण दिसत असतात. नवऱ्याला शोभेल असा पेहराव, सोबत तलवार अशा पोषाखात एकदम राजबिंडे दिसत असतात. त्यांच्या समोरून वहिनी डान्स करत येत असतात. गाणं असतं – लो चली मैं, अपनी देवर की बारात ले के’. बऱ्याच वर्षांपूर्वी आलेलं हे गाणं आजही तितकंच लोकप्रिय आहे याची साक्ष म्हणजे हा व्हिडियो. या गाण्याला शोभेल असा उत्तम डान्स ही वहिनींकडून केला जातो. प्रत्येक ओळ समजून घेत त्यांनी डान्स केला आहे हे लक्षात येतं. तसेच अगदी प्रसन्न मनाने त्या नाचत असतात. जेव्हा एखादी व्यक्ती अगदी प्रसन्न मनाने नाचते ना, तेव्हा आपसूक आजूबाजूला असणाऱ्यांना ही आपण ही नाचावं असं वाटतं. हेच इथेही होताना दिसून येतं. या वहिनी इतक्या उत्तम नाचतात की दुल्हे राजसोबत असलेली दोन मंडळी ही नाचायला लागतात.

एक तर सुरुवातीपासून टाळ्या वाजवतच त्यात सामील झालेला।असतो. मग दुसरा ही सामील होतो आणि वहिनींच्या स्टेप्ससारख्या स्टेप्स करतो. मग पुन्हा काही क्षण शांत होतो. जणू काही त्याला जाणीव होते की आपण नाचायला नको आता, नंतर बघू. पण कसचं काय, मस्त डान्सचा माहोल बनलेला असतो. त्यालाही मग राहवत नाही आणि गडी पुन्हा नाचायला लागतो. मग अजून एक ताई येतात. त्या वहिनी सोबत डान्स करायला लागतात. खरं तर समोर उभा असलेला नवरदेव सुद्धा उत्तम डान्सर आहेच, त्यामुळे त्यालाही नाचावं वाटत असणार पण तसं करता येत नाही. असं असलं तरी बाकीचे मात्र मस्त मजा करत डान्स करून घेतात. व्हिडियोच्या शेवटी तर वहिनी आणि आजूबाजूला असणारे सगळे जण मस्त रिंगण घालत डान्स करत राहतात आणि हा व्हिडियो संपतो. लग्नात सगळ्यांत महत्वाचं असतं ते उत्साही वातावरण आणि ते निर्माण करण्यासाठी लागतात ती उत्साही माणसं. या लग्नात बाकीच्यांच माहीत नाही, पण या वहिनी हे काम अगदी बखुबीने करताना दिसतात. त्यांचा डान्स आपल्या टीमला तर आवडलाच आहे. आपण हा व्हिडियो पाहिला असल्यास, आपल्याला ही आवडेल हे नक्की.

तसेच आपल्या टीमने यावर लिहिलेला हा लेखही पसंतीला उतरला आहे अशी अपेक्षा आहे. आपली टीम सातत्याने आपल्या वाचकांसाठी नवनवीन विषयांवर लेख लिहीत असते. यामागे प्रेरणा असते ती आपल्या सूचनांची आणि प्रतिक्रियांची. तेव्हा या लेखांवरील आपल्या प्रतिक्रिया आणि सकारात्मक सूचना आम्हाला कमेंट्स द्वारे कळवत राहा. त्यांचा विचार करून आपली टीम आपल्यासमोर नवनवीन आणि उत्तमोत्तम लेख सादर करत राहीलच. आपला आमच्या टीमवर असलेला लोभ मात्र याकाळात कायम राहू दे ही विनंती. आपल्या प्रोत्साहनासाठी मनःपूर्वक धन्यवाद !!!

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *