Breaking News
Home / मनोरंजन / लठ्ठ असूनही ह्या भाऊंनी केलेला हा अप्रतिम डान्स पाहून तुम्हीदेखील कौतुक कराल, बघा व्हिडीओ

लठ्ठ असूनही ह्या भाऊंनी केलेला हा अप्रतिम डान्स पाहून तुम्हीदेखील कौतुक कराल, बघा व्हिडीओ

आपल्या आजूबाजूला आपण अशी अनेक माणसं पाहतो ज्यांच्याकडे काही सुप्तकलागुण असतील याची जराशीही कल्पना आपल्याला नसते. अर्थात ही माणसं प्रसिद्ध वा यशस्वी होई पर्यंतच हा आपला चुकीचा ग्रह टिकून राहतो. याचं महत्वाचं कारण म्हणजे आपण प्रत्येकाला एका ठराविक पूर्वग्रहाने बघत असतो. आपल्या माणूस प्राण्याची ती एक खोडच आहे म्हणा ना. पण एकदा का माणसं यशस्वी किंवा प्रसिद्ध झाली की मग मात्र आपला त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो. मग आपसूक सगळंच शक्य वाटू लागतं. हे खासकरून आपल्या आजूबाजूला असणाऱ्या अगदीच किरकोळ किंवा अगदीच वजनदार शरीरयष्टीच्या व्यक्तींच्या बाबतीत तर हमखास होताना आपण पाहतो. त्यांच्या विषयी आपल्या मनात काही पूर्वग्रह बांधलेले असतात ते असतातच. त्यातलं एक उदाहरण म्हणजे वजनदार व्यक्तींना डान्स व्यवस्थित जमतोच असा नाही असाही एक पूर्वग्रह आपल्या मनात असतो. अर्थात गेल्या काही काळात यात बराच बदल झालेला आपण पाहत आलेलो आहोत.

अर्थात याचं श्रेय जातं ते आपल्या वजनाची पर्वा न करता आपली कला उत्तमरीत्या सादर करणाऱ्या कलाकारांना आणि त्यांच्या कलेप्रति असणाऱ्या समर्पक वृत्तीला. याचा सकारात्मक परिणाम असा की अनेक जण या कलाकारांपासून प्रेरणा घेतात. आपल्याला आवडणाऱ्या कलेची साधना करण्यास जणू त्यांना प्रोत्साहन मिळतं. बरं, त्यात हल्ली तर काय सोशल मीडियाचा जमाना आहे. त्यामुळे आपली कला सादर करून ती सामान्य प्रेक्षकांसमोर ठेवण्यासाठी अनेक सोप्पी माध्यमं ही उपलब्ध झाली आहेत. त्यामुळे त्यांना वेळोवेळी प्रेक्षकांकडूनही वाहवा मिळते. त्या उप्पर अजून एक गोष्ट म्हणजे मनाचं समाधान होतं. आज हे सगळं सांगायचं कारण म्हणजे आपल्या टीमने पाहिलेला एक वायरल व्हिडियो होय. हा व्हिडियो आहे एका अशा एका व्यक्तीचा ज्यांनी एका अप्रतिम गाण्यावर अगदी जबरदस्त म्हणावा असा डान्स केला आहे. व्हिडियो सुरू होतो तेव्हा आपल्याला समोरच उभे असलेले दिसून येतात. त्यांच्या पाठीशी असतो एक फिश टॅंक आणि त्यावर असतात ते स्पीकर्स. या स्पीकर्स मधून एक सुमधुर गीत बाहेर पडत असतं. चांदनी चित्रपटातलं हे गीत स्व. श्रीदेवी यांच्यावर चित्रित झालेलं होतं. या गाण्यावर हे दादा डान्स करताना दिसून येतात.

मुळात गाणं सुरू झालं असल्याने त्यांचा डान्स आपल्याला मध्यावरूनच बघता येतो. पण अस असलं तरी त्यातली मजा मात्र तसूभरही कमी होत नाही. कारण अगदी पहिल्या क्षणापासून ते शेवटच्या क्षणापर्यंत हे दादा अगदी मनापासून नाचतात. तसेच त्यांना हे गाणं प्रचंड आवडत असावं आणि यावर डान्स करण्याची सवय असावी. कारण या गाण्यातील प्रत्येक बिट पकडत हे दादा अगदी उत्तम नाचत असतात. याची उत्तम प्रचिती येते जेव्हा हे दादा हातातील चुडीया आणि पायातील पैंजणांच्या आवाजावर अगदी योग्य वेळी बिट्स पकडतात. त्यांचं टायमिंग हे अफलातून म्हणावं अस आहे. तसेच डान्स करत असताना त्यातून नजाकत दिसून येते त्यामुळे या डान्सला चार चांद लागतात हे नक्की. आपण जर हा व्हिडियो पाहिला असेल तर आम्ही सांगत असलेल्या गोष्टी आपल्याला पटत असतील. जर आपण हा व्हिडियो बघितला नसेल तर आवर्जून हा व्हिडियो बघा. हा व्हिडियो तसा जुना आहे पण तरीही त्यातील नृत्याची गंमत अनुभवता येते. तेव्हा ही संधी चुकवू नका.

तसेच मंडळी, आपल्या टीमने लिहिलेला हा लेख आपल्याला आवडला असेल अशी अपेक्षा आहे. आपली टीम नेहमीच उत्तमोत्तम विषयांवर लेखन करत असते आणि करत राहील. त्यासाठी अर्थातच आपला पाठिंबा अपेक्षित आहे आणि जो आम्हाला मिळतो ही आहे. हा पाठींबा येत्या काळात ही मिळत रहावा ही सदिच्छा. आपली टीमही नेहमीच उत्तमोत्तम लेख आपल्या भेटीस घेऊन येत राहील याची खात्री बाळगा. लवकरच एका नवीन विषयासह भेट होईलच. तोपर्यंत आपल्या टीमचे अन्य नवनवीन लेख वाचत राहा. आठवणीने सगळे लेख शेअर करत राहा आणि आनंद वाटत राहा. धन्यवाद !!!

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *