Breaking News
Home / मनोरंजन / लठ्ठ असूनही ह्या भाऊने सर्वांसमोर स्टेजवर केला अफलातून डान्स, पाहिल्यावर तुम्हीदेखील कौतुक कराल

लठ्ठ असूनही ह्या भाऊने सर्वांसमोर स्टेजवर केला अफलातून डान्स, पाहिल्यावर तुम्हीदेखील कौतुक कराल

आजकालचे तरुण-तरुणी कधी काय करतील हे सांगता येत नाही. आजच्या तरुणाईची गोष्टच काहीशी वेगळी आहे. कुणाचा कधी काय मूड असेल ते सांगता येत नाही. सध्या एका तरुणाचा एकदम साध्या पद्धतीने केलेला डान्स सोशल मीडियावर भन्नाट व्हायरल होताना दिसत आहे. या डान्समध्ये काहीच वेगळेपण नाही, हा डान्स साधा आहे मात्र तरीही तो का व्हायरल होत आहे, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. ज्या तरुणाने हा डान्स केला आहे, त्याच वजन जवळपास 1 क्विंटलपेक्षा जास्त आहे. तरीही त्याने ज्या पद्धतीने डान्स केला आहे, तो पाहून एकदम आपल्याला पण नाचण्यासाठीची एनर्जी मिळते. कसय ना.. आयुष्यात एकदा आनंदाने जगायचं ठरवलं की मग वय, पैसा-अडका आणि इतर भौतिक सुखं या गोष्टी गौण ठरतात. त्याचं फार काही मोल आपल्या आयुष्यात उरत नाही. अगदी उतारवयातही अनेक लोक जीवनाचा आनंद भरभरून लुटतात. मग तरुण तरी कसे मागे राहतील. सध्या अशाच एक मनमौजी स्वभावाच्या तरुणाचा एक व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

आता सर्वसाधारणपणे व्हायरल डान्सचा व्हिडीओ म्हटल्यावर तुमच्यासमोर एखादा सडपातळ, ढगाळ कपडे घातलेला आणि एकदम फिट फाईन असलेला पोरगा तुमच्या डोळ्यासमोर उभा राहिला असेल. पण नृत्य ही कला जाड माणसांना पण अवगत असते किंवा अवगत करता येते, हे आपल्या कधीच मनीध्यानी नसतं. वजनदार लोकांनी डान्स करायचा नसतो, असा काही नियम नाही. मात्र तरीही वजनदार लोक नाचू लागले की त्यांना चिडवलं जातं. पण आज या भावाचा डान्स बघून तुम्हीही या बॉडी शे’मिंग ला इग्नोर करून डान्स कराल, हे नक्कीच. आजच्या व्हायरल व्हिडीओत या भावाने कुठे लग्नात वगैरे डान्स केलेला नाही तर एका भव्य दिव्य सार्वजनिक कार्यक्रमात स्टेजवर जाऊन जमेल तसा डान्स केला आहे. पण पुरेपूर आनंद घेऊन. या भावाने डान्सरची तथाकथित प्रतिमा झुगारून बिनधास्तपणे नाचत सगळ्यांना नाचायला भाग पाडेल असा डान्स केला आहे. वजन जास्त, शरीर कथितार्थाने मोठं असलं की अनेकांना चारचौघांसमोर नाचताना वावरताना अर्थातच अवघड जातं. पण दुनियादारीचा कसलाही विचार न करता या भावाने एकदम अफलातून डान्स केला आहे.

लोकांना काय वाटेल, हा विचार त्याने केला असता, तर तो परफॉर्म करूच शकला नसता. मी नेहमीच सांगतो त्याप्रमाणे, नाचणाऱ्या लोकांचे 2 ग्रुप्स पडतात. पहिल्या ग्रुपमध्ये येतात ते स्वतः साठी नाचणारे आणि दुसरे लोकांसाठी, टाळ्यांसाठी नाचणारे… तर हा व्हायरल झालेला तरुण यातील पहिल्या ग्रुप कॅटेगरीमध्ये येतो. तो स्वतःसाठी नाचत आहे, त्यामुळे त्याचा डान्स एकदम खुलला आहे. म्हणूनच त्याला जोरदार टाळ्याही मिळाल्या आहेत. एवढंच नाही तर त्याने केलेला डान्स बघून शेजारी बसलेले वाजवणारे पण मोकार ढोल बडवत आहेत. ज्यामुळे त्याला नाचण्याची एनर्जी मिळत आहे.

सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने प्रत्येक जण याचं कौतुक करत आहे. हा व्हिडीओ लाखो लोकांनी बघितला आहे. मात्र हा तरुण कोण, कुठला याबाबतची माहिती नाही. त्याच्या डान्सिंग व्हिडीओमुळे तो तुफान चर्चेत आहे. आता हा व्हिडीओ तुम्हीही बघा, मजा घ्या आणि महत्वाचं म्हणजे असं मनसोक्तपणे जगत राहा. तोपर्यंत काळजी घ्या आणि आमचे लेख वाचून, व्हिडीओ पाहून आनंदी राहा.

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published.