Breaking News
Home / जरा हटके / लहान मुलाच्या अंगावरून चक्क गाडी गेली, पुढे जे घडलं ते पाहून तुमचा देखील विश्वास बसणार नाही

लहान मुलाच्या अंगावरून चक्क गाडी गेली, पुढे जे घडलं ते पाहून तुमचा देखील विश्वास बसणार नाही

‘देव तारी त्याला कोण मारी’ हे वाक्य अनेकदा आपण ऐकलं असेल. अनेकदा असे प्रसंग आपल्यासमोर घडतात ज्यातून समोरची व्यक्ती बचावेल असं वाटत नाही मात्र तरीही ती व्यक्ती यातून सुखरुपणे बाहेर येते. ही गोष्ट आसपासच्या सगळ्यांसाठीच आश्चर्याची ठरते. अनेकदा या घटनांचे व्हिडीओदेखील मोठ्या प्रमाणात व्हायरल झालेले आपल्याला पाहायला मिळत असतात. आता अशीच आणखी एक घटना समोर आली आहे.

आपल्या डोळ्यादेखत आपल्या प्रिय व्यक्तीला काही होणं यापेक्षा वेदनादायी प्रसंग दुसरा कोणताच नाही. आई-बापासमोरच त्यांच्या मुलाचं काही बरं-वाईट होणं, हा धक्का ते सहनही करू शकत नाही. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. ज्यात बापाच्या डोळ्यादेखत चिमुकल्या लेकाच्या अंगावरून गाडी गेली (Accident Video). बाबा लेकाकडे धावला पण पुढे जे घडलं ते शॉकिंग होतं.

आपण अशा अनेक घटना बऱ्याचदा पाहिल्या आहेत, ज्यात आपल्याला विश्वास ठेवणे कठीण होते. या घटनेत एका माणसाच्या वाईट सवयीमुळे छोट्या लेकराचा जीव जाता जाता राहिला. आता तुम्ही म्हणाल की, हा तर सिनेमातील सिन असावा परंतु असे नाही, ही खरी गोष्ट आहे. या घटनेशी संबंधित सीसीटीव्ही फुटेज सुद्धा समोर आले आहे. दरम्यान, या संपूर्ण घटनेचा थरार कॅमेऱ्यात कैद करण्यात आला आहे.

व्हिडीओ पाहत असताना आपल्या मनात कालवा-कालव सुरू असते आणि नको तेच घडते. तर व्हिडीओत नेमके काय घडले, ते जाणून घेऊयात. सीसीटीव्ही फुटेजमध्ये आपल्याला असे दिसते की, एक चारचाकी कार एका घरासमोर थांबलेली आहे. कारच्या पुढील भागात एक मुलगा खेळत आहे. घरातून बाहेर पडणारा व्यक्ती थेट कारमध्ये बसतो. आजूबाजूला प्राणी, लहान मुले आहेत की नाही, हे तो चेक करत नाही. गाडीच्या पुढे बसलेला मुलगा आपल्या तंद्रीत खेळत असतो. गाडीत बसलेल्या माणसाला बोनेट (गाडीचा पुढचा भाग) मोठे असल्याने तो मुलगा दिसत नाही. परिणामी गाडी थेट मुलाच्या अंगावरून जाते.

तरीही गाडीत असलेल्या व्यक्तीला अंदाज येत नाही की, आपल्या गाडीखाली मुलगा आला. गाडी चालवणाऱ्या व्यक्तीला याचा काहीच अंदाज न आल्याने तो सनाट पुढे निघून गेला. या व्यक्तीला गाडीपाशी सोडवायला आलेला व्यक्ती मात्र समोरचं दृश्य पाहून हैराण होतो. कारण चक्क त्याच्या मुलाच्या अंगावरून गाडी गेलेली असते आणि कुणालाही याची भनक सुध्दा लागत नाही. मात्र त्या मुलाचं नशीब समजा, तो गाडीखाली आडवा झाल्याने त्याला जास्त लागले नाही. जेव्हा या व्यक्तीने आपल्या मुलाची अवस्था पाहिली, तेव्हा तो वाऱ्याच्या वेगाने मुलाकडे धावला. आता हा व्हिडीओ पाहून तुमच्याही अंगाचा थरकाप होईल. पण महत्वाची गोष्ट अशी की, या व्हिडीओत जे घडलं ते आपल्या जवळच्या कुणासोबत घडू नये, म्हणून काळजी घ्या. आता हा व्हिडीओ बघा आणि आपल्या जवळच्या लोकांना शेअर करा. रोडचे, वाहतुकीचे नियम पाळा आणि अपघा’त टाळा.

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *