आपल्या आयुष्यात कोणता प्रसंग कधी येईल आणि किती मोठ्या प्रमाणात त्याचा फ’टका आपल्याला बसू शकेल हे काही सांगता येत नाही. पण प्रसंगावधान जागृत असेल तर कोणत्याही परिस्थितीवर मात करता येते. निदान त्यातून होणारे नु’कसान कमी करता येऊ शकते. पण काही वेळेस प्रतिक्रिया देण्याचा कालावधी एवढा छोटा असतो की विचार आणि कृती काय करायची ते कळत नाही. अशा वेळी आपलं काही चालो न चालो देव मात्र कुठच्या ना कुठच्या रुपात धावून येतोच. हीच भावना एका माऊलीची मयूर शेळके या मध्य रेल्वेच्या पॉईंट्समन बद्दल झाली असणार हे नक्की. झालं असं की या ताई आपल्या लहान मुलासोबत वांगणी रेल्वे स्टेशन वर ट्रेन पकडण्यासाठी येतात. पण आपल्याच तंद्रीत त्या चालत चालत प्लॅटफॉर्मच्या कडेला कधी येतात हे कळतही नाही. सोबत लहान मूल असतंच.
पण प्लॅटफॉर्मचा अंदाज न आल्याने ताई पाठी राहतात पण मुलगा मात्र रुळांवर पडतो. ही घटना शनिवारी १७ एप्रिल रोजी सायंकाळी घडली. त्यावेळी ५ वाजून ३ मिनिटं आणि ५४ सेकंद होत होती. बाळ खाली पडल्याचं पाहून ताई आरडा ओरडा करायला लागतात. काय करावं सुचत नसतं. तेवढ्यात जी ची एवढा वेळ वाट बघत असतात ती ट्रेन अगदी भरधाव वेगाने येत असते. आत्ता पर्यंत जीवनवाहिनी वाटणारी ही ट्रेन क्षणात काळरूपाने पुढे सरकत असते. मूल लहान असल्याने त्यालाही वर चढता येत नाही. पण म्हणतात ना, दे’व तारी त्याला कोण मा’री. ही घटना घडत असताना मध्य रेल्वेचे तरुण तडफदार पॉइंट्समन मयूर शेळके पाहत असतात. ते तडक निर्णय घेतात आणि मुलाच्या दिशेने धावत सुटतात. हातात हिरवा झेंडा घट्ट पकडलेला असतो. धावतपळत ते त्या मुलाजवळ पोहोचतात. संपूर्ण ताकदीने त्याला वर ढकलतात आणि स्वतः ही प्लॅटफॉर्म वर चढतात. केवळ दहा सेकंदात हा थरार घडतो. एखाद्या चित्रपटातील कथानक वाटावं अशी ही घटना.
हा व्हिडियो पाहताना शेवटच्या क्षणापर्यंत मयूर आणि ते मूल जखमी होऊ नये म्हणून आपण प्रार्थना करत असतो. एका सेकंदाचा फरक आणि वेगळं काही चित्र दिसलं असतं हे जाणवतं पण आता त्याबद्दल बोलणंच नको. जे झालं ते अनाकलनीय होतं, पण मयुर यांच्या धा’डसामुळे अनर्थ टळला, हे नक्की. भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रेन ला पाहून मयूर यांना काय वाटलं असेल आणि त्या मुलाला वर ढकलून स्वतः प्लँटफॉर्म वर येताना त्यांना काय वाटलं असेल याची केवळ कल्पनाच करता येते. ऐन प्रसंगी अगदी देवासारखे धावून आलेल्या मयूर यांच्यावर आता सगळ्या स्तरांतून कौतुकाचा वर्षाव होतो आहे. खुद्द रेल्वे मंत्री पियुषजी गोयल यांनीही आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून मयूर यांचं कौतुक केलेलं आहे. तसेच अनेक प्रथितयश वृत्तसंस्थानी ही मयूर यांच्या प्रसंगावधानासाठी त्यांची पाठ थोपटली आहे.
या कौतुकात मराठी गप्पाची टीमही सामील आहे. ऐनप्रसंगी देवदूतासमान धावून येणाऱ्या मयूर यांना मराठी गप्पाच्या टीमचा मानाचा मुजरा. आम्ही हा व्हिडीओ खाली देत आहोत, एकदा पहा आणि तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा. त्याचसोबत आपली टीम सातत्याने विविध विषयांवर लिहीत असते. आपल्याला हा लेख आवडला असेल तर नक्की शेअर करा. सोबत अन्य लेखही आवर्जून वाचा आणि आवडले तर शेअर करा. आपल्या वेळेसाठी मनःपूर्वक धन्यवाद !!!
बघा व्हिडीओ :