Breaking News
Home / माहिती / लाखोंची कमाई करणारा छोटू दादा असा झाला फेमस, बायको आहे खूपच सुंदर

लाखोंची कमाई करणारा छोटू दादा असा झाला फेमस, बायको आहे खूपच सुंदर

युट्युबवर छोटू दादा म्हणून लोकप्रिय असलेल्या ह्या कलाकाराचे खरे नाव शफिक नाट्या आहे. छोटू दादाचा जन्म २५ नोव्हेंबर १९९१ मध्ये महाराष्ट्रातील मालेगाव मध्ये झाला. त्याची उंची केवळ ३ फूट ९ इंच आहे. आपल्या गावातील शाळेत शिकत असताना त्याने शाळा सोडली होती. त्याने दहावी पर्यंतच शिक्षण घेतले, घरातील प्रॉब्लेम्समुळे त्याला अर्ध्यातच शाळा सोडावी लागली. आपल्या कमी उंचीमुळे त्याच्या आयुष्यात खूप समस्या आल्या. त्याने जितक्यावेळा सुद्धा नवीन काहीतरी करायचा प्रयत्न केला तितक्या वेळा त्याला अपयश येत होते. मग ते कोणता व्यवसाय असो व कोणते काम. त्याच्या आयुष्यात एकदा अशी सुद्धा वेळ आली होती कि त्याने विचार केला होता कि माझ्या कमी उंचीमुळे मी जगातील कोणत्याच कामाचा नाही आहे. छोटू दादा मध्ये एक खास वैशिष्ट्य होते कि तो लहानपणापासूनच लोकांना सहज हसवायचा. कॉमेडी करणे त्याचा फक्त एक छंद होता.


एके दिवशी त्याच्या एका मित्राने पार्टी आयोजित केली होती. पार्टीमध्ये छोटू दादा आणि त्याचे मित्र सुद्धा गेले होते. तिथेच एक दिग्दर्शक आसिफची शूटिंग चालू होती. तिथे छोटू दादाच्याच उंचीच्या एका कलाकाराला पाहून छोटू दादाच्या मित्राने दिग्दर्शकाला सांगितले कि तुम्हांला कोणत्याही चित्रपटासाठी छोटू दादाची गरज लागली तर मला नक्की संपर्क करा. दिगदर्शकाने सुद्धा त्याला सांगितले कि ठीक आहे, जेव्हा पण मला छोटू दादाची गरज असेल तेव्हा मी तुला संपर्क करेल. त्यांतर एके दिवशी दिग्दर्शकाने एका छोट्याश्या भूमिकेसाठी छोटू दादाला बोलावले. छोटू दादाने खूप चांगला अभिनय केला. दिग्दर्शकाला सुद्धा त्याचा अभिनय आवडला. त्यामुळे त्याने छोटू दादाला एका शॉर्टफिल्म मध्ये संधी दिली. छोटू दादासाठी हा प्रवासदेखील सोपा नव्हता. तो रात्रनरात्र रिहर्सल करायचा. त्याच्या अभिनयामुळे त्याचा पुढचा प्रवास थांबला नाही. त्याच्या विनोदी अभिनयामुळे त्याला सब टीव्ही वर ‘चिंटू बन गया जंटलमन’ सारख्या सीरिअल मध्ये काम करण्याची संधी मिळाली.


त्यानंतर तो युट्युबवर लोकप्रिय होऊ लागला. लोकांना त्याचा अभिनय आणि कॉमेडी इतकी आवडू लागली कि आजच्या घडीला तो ४ प्रोडक्शन हाऊस मध्ये काम करतो. ज्यांची नावे ‘खानदेशी मुव्हीज’, ‘डीएसएस प्रोडक्शन’, ‘जेकेके एंटरटेनमेंट’ आणि ‘खानदेशी फन’ आहेत. त्याच्या खानदेशी मुव्हीज ह्या युट्युब चॅनेलला १३ मिलियनपेक्षा जास्त सबस्क्रायबर्स आहेत. आजच्या घडीला त्याची महिन्याची कमाई लाखोंच्या घरात आहे. छोटू दादाने आयुष्यात जे काही मिळवलं आहे ते फक्त त्याच्या मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर मिळवलं आहे. ह्यामुळेच तो एक लोकप्रिय यूट्यूबर आणि यशस्वी कॉमेडी कलाकार आहे. ह्याच वर्षी छोटू दादाचे लग्न झाले आहे. त्याने १७ ऑगस्ट २०१९ ला त्याच्याच उंचीच्या मुलीसोबत लग्न केले. दोघांची जोडी खूपच सुदंर दिसत आहे. छोटू दादाला आयुष्यातील पुढील वाटचालीसाठी मराठी गप्पा कडून हार्दिक शुभेच्छा.

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *