काही कलाकार हे असे असतात की अल्पावधीतंच प्रेक्षकप्रिय होऊन जातात. त्यांच्या भूमिकांपासून ते इतर गोष्टींशी प्रेक्षक अगदी समरसून जातात. अशाच मोजक्या कलाकारांच्या मांदियाळीतील अभिनेत्री विषयी आपण जाणून घेणार आहोत. कधी तिच्या खळखळून हसण्याने आपल्याला मजा येते, तर कधी तिने साकार केलेली निरागस व्यक्तिरेखा पाहून प्रेमात पडायला होतं, तर कधी तिचे नवनवीन फोटो शुट्स, तिच्या चाहत्यांना तिची भुरळ पडतात तर कधी त्यांच्यावर मिम्स बनतात. अशी ही प्रेक्षकप्रिय अभिनेत्री म्हणजे गायत्री दातार. तिने ‘तुला पाहते रे’ मधील साकार केलेली भूमिका ही तिची कोणत्याही मालिकेतील पहिली भूमिका. त्याआधी तिने शालेय जीवनात रंगमंच, नाट्य शिबीरं यांतून अभिनय केलेला होता. पण पुढे उच्च शिक्षण घेत असताना अभिनय क्षेत्र काहीसं मागे पडलं.
पण, ‘तुला पाहते रे’ मधील ईशा निमकर ही व्यक्तीरेखा तिने साकार केली आणि तिचं नाव महाराष्ट्रातील घराघरात पोहोचलं. अमाप प्रसिद्धी मिळाली. यापुढे टीव्ही वर गायत्रीने ‘युवा डासिंग क्वीन’ या स्पर्धेत सहभाग घेतला होता. प्रथमतः स्पर्धक आणि मग सह सूत्रसंचालक म्हणून तिचा सहभाग हा तिच्या चाहत्यांसाठी आनंददायी होता. तसेच सध्या ती ‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमातील विविध प्रहसनांतून सातत्याने विविध भूमिका साकार करताना दिसते आहे. या सगळ्यांतून ती गंभीर, विनोदी भूमिका आणि नृत्यही उत्तम करू शकते हे लक्षात येतं. तसेच ‘निम्मा शिम्मा राक्षस’ या नाटकामार्फत तिने व्यावसायिक रंगभूमीवर पहिल्यांदा पाऊल ठेवलं. रत्नाकर मतकरी यांच्या सिद्धहस्त लेखणीतून साकार झालेल्या या कलाकृतीत तिने शहजादी ही मुख्य भूमिका साकार केली होती. तसेच Intolerance या लघु पटातही तिने अभिनय केलेला आहे. तसेच तिने ‘सये’ या म्युझिक व्हिडिओतही अभिनय केलेला आहे. गायत्रीने आजतागायत विविध माध्यमांतून अभिनय केलेला आहे. येत्या काळात ती चित्रपटातूनही दिसावी, असं तिच्या चाहत्यांना वाटत असणार हे नक्की.
अभिनयासोबतच तीने काही नांमुद्रांसाठी मॉडेलिंग ही केलेलं आहे. तेजाज्ञा ही त्यातील एक आघाडीची नाममुद्रा. तसेच गायत्री हिला ट्रेकिंग ची प्रचंड आवड आहे. एका मुलाखतीत तिने ट्रेकिंग चा कोर्स ही केल्याचं नमूद केलं होतं. तसेच मोकळ्या वेळेत वाचन करणं, सिनेमे पाहणं तिला आवडतं. तसेच एक आघाडीची कलाकार म्हणून सतत व्यस्त असणाऱ्या वेळापत्रकातून स्वतःच्या आरोग्यासाठीही वेळ देत असते. तसेच अनेक सामाजिक उपक्रमांचा ती भाग होत आलेली आहे. क’रोनामुळे लागू झालेल्या लॉक डाऊनमध्ये तिने वेळोवेळी गरजूंना मदत म्हणून सामाजिक कार्यात सहभाग घेतला होता. यातून तिची जमिनीवर पाय असण्याची वृत्ती अधोरेखित होते.
सध्या गायत्रीने केलेलं फोटोशूट हे चर्चेचा विषय बनलं आहे. याआधीही तिने केलेलं फोटोशुट्स हे तिच्या चाहत्यांच्या चर्चेचा विषय झाले होते. त्यामुळे गायत्रीने साकार केलेली एखादी व्यक्तिरेखा असो, फोटोशुट्स असो वा एखादं सामाजिक काम. तिला तिच्या चाहत्यांचा पाठिंबा नेहमीच मिळत आलेला आहे. या चाहत्यांमध्ये आमची टीमही समाविष्ट होते. गायत्रीच्या पुढील यशस्वी कारकीर्दीसाठी मराठी गप्पाच्या टिमकडून तिला मनःपूर्वक शुभेच्छा !