Breaking News
Home / मनोरंजन / लॉकडाउनच्या काळात जे मोठ्यांना समजलं नव्हतं ते ह्या छोट्या मुलीने सांगितले होते, बघा व्हायरल व्हिडीओ

लॉकडाउनच्या काळात जे मोठ्यांना समजलं नव्हतं ते ह्या छोट्या मुलीने सांगितले होते, बघा व्हायरल व्हिडीओ

सध्या आपल्या आजूबाजुला परिस्थिती पूर्वपदावर येऊ पाहत आहे. आपणही या बदलत्या परिस्थितीचा एक अविभाज्य घटक आहोत. गेल्या वर्षात आलेल्या अनेक स्थित्यंतरांना आपण सामोरे गेलेले आहोत. यातून आपण काही गोष्टी अंगवळणी पाडून घेतल्या आहेत. त्यात हात सॅनिटाइझ करणे, मास्क बांधणे आणि अंतर पाळणे या गोष्टी यात आल्या. आपल्या पैकी अनेकांनी यांची सवय लावून घेतली असेलच. पण जेव्हा या सगळ्या गोष्टींची सुरवात झाली होती, तेव्हा मात्र आपल्या पैकी अनेकांना या गोष्टींच्या सवयी अंगवळणी पडवून घेताना त्रास झाला होता. तो काळ तर बाहेर अजिबात न फिरण्याचा म्हणजेच लॉक डाऊन चा होता. आता तरी निर्बंध शिथिल आहेत. तेव्हा बाहेर फिरणाऱ्यांना पोलीस प्रसाद देत होतेच. त्याकाळात वायरल झालेले व्हिडियो आठवून पहा बरं. पण एक व्हिडीओ मात्र यापासून काहीसा अलिप्त राहिला होता. पण आमच्या टीमने हा व्हिडीओ पाहिला आणि तो आपल्या वाचकांच्या भेटीस घेऊन यावा, अशी इच्छा आमच्या टीमला झाली.

हा व्हिडीओ आहे एका चिमुकलीचा. आधीच लहान, त्यात वयानुसार बोबडे बोल पण जे बोलते ते आईने सांगितल्याप्रमाणे, अगदी समजून उमजून. तर व्हिडियो सूरु होतो ते या चिमुरडीच्या वाक्याने. पोलीस दादा कुठे कुठे लाठीचा प्रसाद देतात हे ती सांगत असते. (लॉक डाऊन मुळे बाहेर पडण्यावर बं’दी असतानाही बाहेर येणाऱ्यांना लाठीने मारणारे पोलीस कर्मचारी हा संदर्भ इथे आहे). तिच्या सोबत संवाद साधायला कॅमेऱ्यामागून एक व्यक्ती बोलत असते. ही चिमुरडी बोलता बोलता सांगते, की बाहेर जाणं योग्य नाही असं आईने सांगितलंय आणि कारण म्हणजे क’रोना बाहेरच कुठे तरी असेल. यावरून तिच्या आईने तिला बाहेर पडू नये म्हणुन योग्य ती माहिती दिल्याचं कळतं. तसेच आपण त्यामुळेच बाहेर जात नाही, असंही ही मुलगी सांगते. त्यावर कॅमेऱ्यामागील व्यक्ती, पण मी तर बाहेर जातो असं सांगते. यास जुजबी समान सुमान आणण्यास जात असण्याचा संदर्भ असावा. पण तरीही ही चिमुरडी अशी काही प्रतिक्रिया देते की विचारता सोय नाही. ‘तुला कलोना होईल ना’, ‘अबे लेका’ ही दोन वाक्य म्हणते आणि तिच्या आजूबाजूचे खळखळून हसायला लागतात. व्हिडियो पाहणाऱ्यालाही आपसूक हसू येतं. त्यावर काय ग दीदी असं कॅमेऱ्यामागील व्यक्ती बोलते आणि हा व्हिडियो संपतो.

संपूर्ण व्हिडियोत जाणवणारी एक गोष्ट म्हणजे आपल्या आईने आपल्याला सांगितलेली गोष्ट ऐकणारी ही मुलगी तिच्या समंजसपणामुळे आपल्या लक्षात राहते. तिला सांगितलेलं उदाहरण किंवा क’रोना विषयीची माहिती यावरून बाहेर जायचं नाही, हे तिच्या डोक्यात किती फिट्ट बसलं असेल त्यावेळी याची कल्पना येते. आपल्या पैकी काहींनी अशाच पद्धतीने काही गोष्टी जसे की बाहेर वावरत असताना मास्क कायमस्वरूपी घालणे, वेळोवेळी हात स्वच्छ धुणे आणि शक्य असेल तिथे सोशल डिस्टनसिंग या सवयी अंगवळणी पडवून घेणे आवश्यक आहे. या सवयी आपल्या साठीच फायदेशीर आहेत. या लेखातून आणि व्हिडियो शेअर करण्यातून मनोरंजन आणि सोबत प्रबोधन करणे हा उद्देश आमच्या टीमचा आहे. इतर कोणताही उद्देश ठेऊन हा लेख लिहीत नाही आहोत, याची कृपया नोंद घ्यावी. तसेच ह्या लेखाप्रमाणेच आपल्याला इतर वायरल व्हिडीओज विषयीचे लेख वाचायचे असल्यास वर उपलब्ध सर्च ऑप्शनचा वापर करा. त्यात वायरल असं लिहून सर्च करा आपल्याला विविध लेख उपलब्ध होतील. तसेच मध्यंतरी आमच्या टीमला एक व्हिडियो मिळाला होता, ज्यात आपले पोलीस बांधव एका महिलेस आ’त्म’ह’त्या करण्यावाचून कसे परावृत्त करतात याचा वृत्तांत आला होता. आपल्याला हा लेख वाचायचा असल्यास वर उपलब्ध सर्च ऑप्शन मध्ये पोलीस असं लिहून सर्च करा. आपल्याला तो लेख उपलब्ध होईल. आपल्या वेळेसाठी धन्यवाद !

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *