देशात को’रोनाची महामारी येऊन जवळपास दीड वर्ष होत आली. पोलीस कर्मचारी आपले कर्तव्य न चुकता, न थकता पार पाडत आहेत. पोलीस सतत बारकाईने रस्त्यारस्त्यांवर लक्ष देत आहेत. जरी हा काळ सोडला तरी पोलीस दल देशसेवेसाठी नेहमीच तत्पर असते. सध्या को’रोनापासून सुरक्षित राहण्यासाठी लॉकडाऊनचा पर्याय देशाच्या अनेक भागांत चालू आहे. अशामध्ये को’रोना कर्फ्यूत विनाकारण लोकं घराबाहेर पडू नये, ह्यासाठी पोलिसांना जातीने लक्ष द्यावे लागत आहे. सोबतच त्यांना स्वतःच्या तब्येतीची देखील काळजी घ्यायची आहे. हे तर सर्वांनाच माहिती आहे के लॉकडाऊनच्या दरम्यान विनाकारण घरातून बाहेर कोणी पडू नये, ह्यासाठी पोलीस दल कार्यरत आहेत. विनाकारण बाहेर पडल्यावर पोलिसांद्वारे कारवाई सुद्धा केली जात आहे. मग ते समज देऊन सोडणे असो किंवा मग लाठीचा सौम्य प्रसाद असू दे.
सध्याची घटना राजस्थानातील भिलवाडा येथील आहे. भिलवाडाचे नाव घेताच कदाचित तुम्हांला को’रोनाच्या पहिल्या लाटेवेळी चर्चेत राहिलेला ‘भिलवाडा मॉडेल’ आठवलं असेल. होय, आम्ही त्याच भिलवाडा बद्दल बोलत आहोत, परंतु आताची गोष्ट भिलवाडा मॉडेल पेक्षा वेगळी आहे. झालं असं कि भिलवाडा येथेसुद्धा लॉकडाऊन लागलेला आहे. ह्याच दरम्यान भिलवाडामधून पोलिसांच्या तत्पर कर्तव्याची एक झलक समोर आली आहे. राजस्थानमध्ये को’रोनाच्या वाढत्या घटनांना आळा घालण्यासाठी कठोर लॉकडाऊन लावले आहे. प्रत्येक जिल्ह्याच्या कलेक्टर पासून पोलीस कॉन्स्टेबल पर्यंत सर्व जण आपापले काम तत्परतेने करत आहेत. अश्यामध्येच भिलवाडा येथील एक घटना चर्चेचा विषय ठरत आहे. होय, सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ खूप वायरल होत आहे. ज्यात एक महिला पोलीस कर्मचारी दिसत आहे जी एका सायकलस्वाराला थांबवते.
त्यानंतर ती महिला पोलीस कर्मचारी प्रश्न विचारू लागते. ‘हॅल्लो, कुठे जात आहेत ?’ महिला पोलीस कर्मचारी सायकलस्वाराला प्रश्न तर विचारते, परंतु महिला कॉन्स्टेबलला ह्या गोष्टीची माहिती नसते कि ती ज्यांना प्रश्न विचारत आहेत ते त्या जिल्ह्याचे कलेक्टरसाहेब आहेत. होय, सायकलस्वार असलेल्या ज्या व्यक्तीला महिला कर्मचारी प्रश्न विचारत असते ते दुसरे कोणी नसून भिलवाडा जिल्ह्यातील कलेक्टर शिवप्रसाद नकाते आहेत. जेव्हा महिला पोलीस कर्मचारीला हे माहिती पडतं कि हे जिल्ह्याचे कलेक्टर शिवसाद नकाते आहेत तेव्हा महिला कर्मचारी शांत झाल्या. परंतु कलेक्टर साहेबांनी ह्या महिला पोलीस कर्मचारीची खूप प्रसंशा केली आणि त्यांना अश्याच प्रकारे काम करत राहण्यास सांगितले. त्यानंतर हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप वायरल होत आहे.
ह्या महिला कॉन्स्टेबलचे नाव निर्मला असे आहे. ज्या पूर्ण निष्ठेने को’रोनाकाळात आपली ड्युटी निभावत आहेत. अशामध्ये भिलवाडा येतील कलेक्टर साहेब सुद्धा प्रशंसा करण्यायोग्य आहेत, जे स्वतः सायकलवर स्वार होऊन जिल्ह्यातील परिस्थितीवर देखरेख करत आहेत. आणि कलेक्टर साहेबांची कर्तव्यनिष्ठा अशी कि ते स्वतः सायकलवरूनच कोरोना काळात आपल्या पोलीस कर्मचाऱ्यांची परीक्षा घेण्यास बाहेर पडले.
ह्या दरम्यान ते जेव्हा टीशर्ट वर सायकलवरून गुलमंडी येथून जात होते, तेव्हा महिला कॉन्स्टेबलने त्यांना थांबवलं आणि विचारले कुठे जात आहेत ? इतक्यात मागे असलेल्या कॉन्स्टेबलने एका बाहेर फिरणाऱ्या स्त्रीला सांगितले, ‘मॅडम, इथे तिथे नका फिरू. कलेक्टर साहेब राउंड वर आहेत.’ नंतर पोलीस कर्मचाऱ्याची नजर कलेक्टरवर गेली तेव्हा त्याने हळूच सांगितले कि, ‘मॅडम कोणाला थांबवत आहेत ? हे तर साहेब आहेत.’ इतक्यात कलेक्टर साहेबांनीच सांगितले कि, ‘मी डीएम आहे.’ हे ऐकताच महिला कर्मचारी शांत झाल्या. परंतु इतक्यातच कलेक्टर बोलले, ‘खूप छान. अशीच ड्युटी करा.’ हा व्हिडीओ खूप वायरल होत आहे. सोबतच कलेक्टर आणि महिला कर्मचारी दोघांचीही खूप प्रशंसा होत आहे.
बघा व्हिडीओ :