कोविड-१९ या रोगाने पूर्ण जगाचा सध्या कायापालट केलाय. जे आधी होतं, त्याहून थोडं किंवा जास्त वेगळ असं न्यू नॉर्मल आयुष्य आपण सगळेच अनुभवतो आहोत. मग त्यापासून मनोरंजन क्षेत्र कसे वाचेल. सध्या नेमून दिलेले नवीन नियम पाळत मालिकांच पण शुटींग चालू आहे. पण लॉकडाऊनच्या काळात अनेक कलाकार काही ना काही कारणांमुळे मालिकांमधून रजा घेताना दिसले आहेत. चला तर मग जाणून घेऊयात त्यांच्याविषयी.
सृष्टी पगारे :
सूर नवा ध्यासं नवा या रियालिटी शो मधून सृष्टी पगारे आपल्या समोर आली. गाण्याबरोबर तिला अभिनयाचं अंग सुद्धा आहेच. म्हणूनच रमाबाई हि अजरामर ऐतिहासिक भूमिका स्वामिनी या मालिकेत करू शकली. शेंडीगोपाळ म्हणत माधवरावांना चीडवणारी रमा प्रेक्षकांना भावली. पण लॉकडाऊन आला आणि उठला. पण बालकलाकारांनी काम करण्यावर निर्बंध कायम राहिले. तेव्हा मालिकेने जी झेप घेतली ती थेट नवीन रमाबाईंसोबत.
या नवीन रमाबाई आहेत, रेवती लेले. रेवतीने या आधी वर्तुळ या मालिकेतही काम केलंय. तसेच ती एक कुशल नृत्यांगना सुद्धा आहे. लहानपणापासूनची नृत्याची आवड तिने जपली आहे. मानाच्या अशा गिरनार महोत्सव २०१९ मध्ये तिने आपली नृत्य कला सादर कलेली आहे. रमाबाई हि भूमिका इथपासून ते मालिका पूर्ण होईपर्यंत ती उत्तम निभावेल अशी आशा करूया. तिच्या वाटचालीसाठी खूप शुभेच्छा !
इशा केसकर :
“माझ्या नवऱ्याची बायको” हा कार्यक्रम बघितला नाही असा मालिकांचा प्रेक्षक तसा विरळाच असेल. गुरुनाथ आणि शनाया हि तशी पहिल्यापासुनची प्रेक्षकांची नावडती पात्र. पण शनाया आणि राधिका एकत्र आले कि मात्र शनायाच्या बाजूने पण प्रेक्षकवर्ग वाढला. भूमिकेतला हा बदल इशा केसकर हिने अगदी अप्रतिमरीत्या दाखवला होता. पण लॉकडाऊनदरम्यान तिला दातदुखीचा त्रास होऊ लागला. तिला तापही आला होता. तिने प्रयत्न केले पण तिच्या तारखांचा मेळ जुळेना आणि शेवटी तिला या मालिकेतून एग्झीट घ्यावी लागली. पण या ठिकाणी आलं कोण?
रसिका सुनील. म्हणजेच शनाया हे पात्र साकारणारी पहिली अभिनेत्री. रसिका आता, आपल्या जुन्या कंपूला येऊन पुन्हा दाखल झालीये आणि आता त्यात रोज नवनवे ट्वीस्ट येत आहे आणि येऊ घातले आहेत. त्यात अद्वैत दादकरच्या सौमित्र सोबतही शनायाची ओळख होतेय. त्यामुळे मालिकेत अजून रंग भरणार एवढं नक्की.
दिपाली पानसरे :
आई कुठे काय करते हि मालिका प्रेक्षकांच्या मनात घर करून बसली आहे. यातील, अनिरुद्ध, अनुराधा आणि संजना हि पात्र प्रेक्षकांच्या खास आवडीची. यात दिपाली पानसरे यांनी संजनाची भूमिका खूप उत्तम रीतीने वठवली होती. पण लॉकडाऊननंतर मात्र काही वैयक्तिक कारणांमुळे त्यांनी मालिकेतून बाहेर जाण्याचा पर्याय निवडला.
आता त्यांची जागा घेतली आहे मराठी बिग बॉस फेम रुपाली भोसले यांनी. रुपाली यांना आपण जसे मराठी बिग बॉस साठी ओळखतो तसेच, मन उधाण वाऱ्याचे, कन्यादान, कुलस्वामिनी यांसारख्या प्रसिद्ध मालिकांसाठी सुद्धा. त्यामुळे त्या संजनाच्या ग्रे शेड असलेल्या भूमिकेला नक्की उत्तम न्याय देतील यात शंका नाही.
दिलीप बापट :
रात्रीस खेळ चाले हि मालिका आणि त्यातली पात्र खूपच प्रसिद्ध. त्यातही अण्णांशी निगडीत पात्र तर अजूनच खास. मग ती शेवंताचं पात्र असूद्यात कि नेने वकिलांची भूमिका. अण्णांना सहकार्य करतो असं दाखवून त्यांच्या मालमत्तेवर डोळा असणारं हे पात्र. हि भूमिका आधी दिलीप बापट यांनी केली होती. पण लॉकडाऊन नंतर श्याम नाडकर्णी हे ते पात्र साकारताना दिसले होते.
शेखर फडके आणि रसिका धामणकर :
प्रेम पॉयजन पंगा हि धमाल मालिका आहे. यात कैलास भोळे आणि मालती देसाई हि पात्र खास लक्षात राहतात. ती साकारली होती अनुक्रमे, स्वप्नील राजशेखर आणि इरावती लागू यांनी. पण कोविड-१९ मुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे त्यांनी मालिकेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या जागी आता शेखर फडके आणि रसिका धामणकर कैलास आणि मालती हि पात्र निभावताना दिसतील.
(Author : Vighnesh Khale)