Breaking News
Home / मनोरंजन / लोकप्रिय डब्बू अंकल ह्यांनी घरात केलेला हा डान्स पाहून तुम्हीदेखील कौतुक कराल, बघा व्हिडीओ

लोकप्रिय डब्बू अंकल ह्यांनी घरात केलेला हा डान्स पाहून तुम्हीदेखील कौतुक कराल, बघा व्हिडीओ

संजीव श्रीवास्तव हे नाव ऐकलं तर आपल्यापैकी अनेकांना ही व्यक्ती कोण हे कदाचित चट्कन ओळखता येणार नाही. पण डब्बू अंकल असं म्हंटलं की मग मात्र आपल्या चेहऱ्यावर एक हास्य जरूर आलेलं असेल. होय, कारण हे डब्बू अंकल म्हणजे आपल्या सगळ्यांसाठी डान्सिंग अंकल आहेत. त्यांनी केलेला प्रत्येक डान्स हा आपल्याला आवडून जातोच. त्यामुळे त्यांच्या डान्सचे व्हिडियोज केव्हाही बघा, आपल्याला आनंद देऊन जातातच.

आज आपल्या टीमने डब्बू अंकलचा असाच एक जुना पण जबरदस्त व्हिडियो पाहिला. नकळत जुन्या आठवणी यानिमित्ताने ताज्या झाल्या. कारण त्यावेळी पाहिलेला हा व्हिडियो तेव्हाही आणि आजही तेवढाच आनंद देऊन गेला आहे. हा व्हिडियो म्हणजे अर्थातच डब्बू अंकल यांनी सादर केलेला एक परफॉर्मन्स आहे. याची खास बात म्हणजे हा परफॉर्मन्स त्यांनी सुप्रसिद्ध अभिनेते, डान्सर हृतिक रोशन यांच्यासाठी म्हणून सादर केला होता. या व्हिडियोतून डब्बू अंकल यांची जबरदस्त अशी ऊर्जा दिसून आली. तसेच स्टाईलश अंदाजात त्यांनी केलेल्या स्टेप्स ही लक्षात राहिल्या आहेत.

व्हिडियो सुरू होतो तेव्हा डब्बू अंकल आपल्याला एका विशिष्ठ पोज देऊन उभे असलेले दिसतात. उजवा हात वर उंचावलेला आणि डावा हात आडवा धरलेला अशा पोजमध्ये ते उभे असतात. गाणं सुरू होतं तसे ते उलटे फिरतात. आधीचीच पोज देऊन पण उलटे उभे राहतात. त्यावेळी गाण्यातील एक वाक्य ऐकायला येतं. त्यामुळे या वाक्यासाठी त्यांनी खास ही स्टेप तयार केल्याचं कळून येतं. कौतुक वाटतं. पुढेही कौतुक वाटावा असाच डान्स ते करत राहतात. तुरुतुरु धावत येत केलेली स्टेप गंमत निर्माण करते. मग मूळ डान्सच्या अनुसार अनेक स्टेप्स करत त्यांचा डान्स सुरू राहतो. एकंदरच काय तर डब्बू अंकल एकदम जोशात येऊन डान्स करत असतात. त्यांचा हा जोश आपल्यातही उत्साह भरतो. त्यामुळे होणारा आनंद एवढा जास्त असतो की आपसूकच आपण त्यांचा हा डान्स व्हिडियो एकदा नव्हे तर निदान तीनदा चारदा पाहतो. त्यांचं डान्सवर असलेले प्रेम सर्वश्रुत आहेच. हा व्हिडियो या गोष्टीची पुन्हा एकदा अनुभूती करून देतो. तसेच हृतिक रोशन यांच्या डान्सचे आपण सगळेच चाहते आहोत.

या व्हिडियोच्या निमित्ताने या गाण्याविषयीच्या आठवणी ही जाग्या होतात. एकूणच आनंदी आनंद आपण अनुभवतो. आपल्या टीमने तर या व्हिडियोचा आनंद घेतला आहे. जर आपणही हा व्हिडियो पाहिला असेल तर आपल्याला ही आनंद झाला असेलच. जर आपण हा व्हिडियो नसेल पाहिला तर जरूर पहा. आपल्याला नक्की आनंद होईल. तसेच या लेखाच्या निमित्ताने आपल्याला त्यांच्या डान्सने सदैव आनंद देणाऱ्या डब्बू अंकल यांना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा.

मंडळी, आपल्याला आमच्या टीमने लिहिलेला हा लेख आवडला असेल अशी सार्थ अपेक्षा आहे. आपली टीम आपण वाचकांसाठी नेहमीच उत्तमोत्तम विषय शोधून त्यावर लेखन करत असते. आपणही त्यास उत्तम प्रतिसाद देत असता. येत्या काळातही आपलं हे प्रोत्साहन आम्हाला मिळत राहू दे ही सदिच्छा. आपली टीमही उत्तमोत्तम लेखांतून आपलं मनोरंजन करत राहील याची खात्री बाळगा. लवकरच एका नवीन विषयासह भेट होईलच. तोपर्यंत आमच्या टीमचे आपण न वाचलेले लेख आवर्जून वाचा. आठवणीने सगळे लेख शेअर करा आणि आनंद वाटत राहा. धन्यवाद !!!

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published.