Breaking News
Home / मनोरंजन / लोकल ट्रेनमध्ये पूजा शर्मा ह्यांनी ‘गंगुबाई काठियावाडी’ चित्रपटातल्या गाण्यावर केला अप्रतिम डान्स

लोकल ट्रेनमध्ये पूजा शर्मा ह्यांनी ‘गंगुबाई काठियावाडी’ चित्रपटातल्या गाण्यावर केला अप्रतिम डान्स

कलाकार मग तो कोणत्याही वयाचा असो वा कोणत्याही कलेशी निगडित असो, नेहमी एका गोष्टीच्या शोधात असतो किंवा असते. ही गोष्ट म्हणजे रसिकांच प्रेम! होय, आपल्या सारख्या प्रेक्षकांचं प्रेम हे प्रत्येक कलाकारासाठी अतिशय महत्वाच असतं. म्हणूनच तर प्रत्येक कलाकाराला लोकप्रिय होणं हे आवडतं. अर्थात लोकप्रिय व्हायचं तर लोकांना जे आवडेल ते सादर कराव लागतं. तसेच त्यात सातत्य ही असावं लागतं. तरच लोकांकडून लोकप्रियता मिळते आणि सातत्य असेल तर टिकुनही राहते.

सुदैवाने आपण सगळेच सोशल मीडियाच्या जगात राहतोय. सोशल मीडियाच्या काही नकारात्मक बाजू जरूर आहेत. पण कोणत्याही हाडाच्या कलाकाराला आपल्या हक्काचं व्यासपीठ मिळवून देण्याचे काम या नवीन माध्यमाने केलं आहे. कारण एरवीही मनोरंजन क्षेत्रात येणाऱ्यांची मांदियाळी भरपूर असते. अशावेळी स्वतःची कला सादर करण्यास लोकाभिमुख माध्यम असेल तर खूपच उत्तम असतं. हेच काम सोशल मीडिया करतो. अनेक उत्तम कलाकार त्यामुळे आपल्या समोर वेळोवेळी येत असतात. नजीकच्या काळातलं याचं अगदी ताजं उदाहरण म्हणजे पूजा शर्मा (रेखा) होय.

आपण सोशल मीडियावर वेळोवेळी येत जात असाल वा बातम्या बघत असाल तर हे नाव तुम्हाला ऐकल्यासारखं वाटेल. नसेल ऐकलं तरी हरकत नाही. आम्ही त्यांच्याविषयी थोडक्यात आपल्याला ओळख करून देणार आहोत. पूजा शर्मा या एक उत्तम नृत्यांगना आहेत. गेल्या काही काळापासून त्यांनी सादर केलेली विविध नृत्य ही खूपच वायरल झाली आहेत. बरं ही नृत्य इतकी वायरल झाली आहेत की लोकांमध्ये त्यांच्या नृत्याची जशी चर्चा असते तशीच त्यांच्या या कलेची दखल अनेक सेलिब्रिटीजनी ही घेतलेली आहे. पण पूजा यांच्या या प्रवासाची सुरुवात तशी अचानकच झाली. त्यांनी दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी नमूद केल्याप्रमाणे त्या तृतीयपंथी म्हणून काम करत असताना रस्त्यावर काम करत असत. पण काही कारणाने त्यांना आपण इथे काम करू नये असं वाटलं. त्यावर त्यांच्या गुरूंनी तोडगा देत त्यांना लोकल ट्रेनमध्ये काम करण्याचा सल्ला दिला. हाच सल्ला त्यांच्या आयुष्यातील एक मैलाचा दगड ठरला, अस म्हणायला हरकत नाही. कारण एकेदिवशी त्या एका लेडीज स्पेशल ट्रेनमध्ये गेल्या. त्यात मग दारारोज प्रवास करता करता त्यांचा उत्साह आणि आत्मविश्वास वाढत गेला.

तसेच आपल्यातील नृत्य कलेच सादरीकरण करावं हे ही त्यांना वाटलं. यातूनच मग पुढे त्यांची नृत्यांगना ही ओळख वाढीस लागली. त्यांच्या अन्य एका मुलाखतीत त्यांनी नमूद केल्याप्रमाणे त्या मनापासून आपली कला त्या ट्रेनमध्ये सादर करत असत आणि त्यावेळी त्यांच्या परफॉर्मन्सचे व्हिडियोज उपस्थित स्त्रियांकडून चित्रित केले जात. आता व्हिडियो चित्रीकरण झालं की ते सोशल मीडियावर येणार हे ओघाने आलंच. त्यातूनच मग पूजा यांच्या डान्सला लोकप्रियता मिळण्यास सुरुवात झाली. हळूहळू इतर माध्यमं आणि सेलिब्रिटीज यांच्याकडून त्यांची दखल घेतली गेली. तसेच त्यांच्या नृत्यासोबत त्यांच्या पेहरावाचं ही कौतुक झालंय. किंबहुना वर आपण त्यांचं नाव पहिल्यांदा वाचलं असेल तर त्यात कंसात रेखा असा उल्लेख केलेला आहे. याचं कारण त्यांचा एकंदर पेहराव हा लोकप्रिय अभिनेत्री रेखाजी यांच्या सारखा असतो. त्यात उत्तम साड्या आणि दागिने यांचा समावेश असतो. परिणामतः त्यांचे चाहते त्यांना रेखा या टोपण नावाने हाक मारतात. आमच्या टीमने पूजा यांचा एक व्हिडियो मध्यंतरी बघितला होता. ढोलीदा या गंगुबाई काठियावाडी चित्रपटातील गाण्यावर त्यांनी ट्रेनच्या डब्यातच हा डान्स केला होता. त्याचवेळी त्यांच्या विषयी कळलं आणि त्यांच्याविषयी थोडी माहिती घेतली असता वर लिहिलेली माहिती उपलब्ध झाली. त्यातूनच लक्षात आलं की आपल्या सुज्ञ वाचकांना पूजा यांच्याविषयी जाणून घ्यायला आवडेल. त्यातूनच आजचा हा लेख लिहिला गेलेला आहे.

आपल्या टीमने लिहिलेला हा लेख आपल्याला आवडला असेल अशी अपेक्षा आहे. तसेच आपल्यासाठी खास वर उल्लेख केलेला पूजा यांचा व्हिडियो आमची टीम खाली शेअर करेल. आपण त्यांच्या नृत्याचा जरूर आस्वाद घ्यावा. आपली टीम नेहमीच उत्तमोत्तम विषयांवर लेखन करत असते आणि करत राहील. त्यासाठी अर्थातच आपला पाठिंबा अपेक्षित आहे आणि जो आम्हाला मिळतो ही आहे. हा पाठींबा येत्या काळात ही मिळत रहावा, ही सदिच्छा. आपली टीमही नेहमीच उत्तमोत्तम लेख आपल्या भेटीस घेऊन येत राहील याची खात्री बाळगा. लवकरच एका नवीन विषयासह भेट होईलच. तोपर्यंत आपल्या टीमचे अन्य नवनवीन लेख वाचत राहा. आठवणीने सगळे लेख शेअर करत राहा आणि आनंद वाटत राहा. धन्यवाद !!! आपले ‘मराठी गप्पा’ हे युट्युब चॅनेल देखील सबस्क्रा’ईब करा.

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published.