शाहरुख खान अभिनयासोबतच आपल्या मुलांमुळेसुद्धा चर्चेत असतो. अलीकडेच त्याने अब्राहामचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. मुलांबरोबरचे त्याचे फोटो बर्याचदा सोशल मीडियावर पाहायला मिळतात. शाहरुख खान आपल्या मुलांबद्दल खूप गंभीर आहे. ज्याची चर्चा होत राहते. शाहरुख खान हे बॉलिवूडचे एक यशस्वी नाव आहे. शाहरुख जे काही करतो ते पूर्ण निष्ठेने करतो. मग चित्रपटांमध्ये अभिनय करण्याची बाब असो किंवा मुलांची जबाबदारी. मुलांच्या बाबतीत जर शाहरुख खानला जबाबदार वडील म्हटले तर ते चुकीचे ठरणार नाही. त्याला वडिलांकडून असे करण्याची प्रेरणा मिळाली.
शाहरुख खानच्या वडिलांचे नाव मीर मोहम्मद ताज खान होते, ते एक स्वातंत्र्यसैनिक होते. खुप कमी लोकांना माहिती असेल की शाहरुख खानचे वडील देशातील सर्वात कमी वयाचे स्वातंत्र्यसैनिक होते. ज्यांनी स्वातंत्र्यलढ्यात इंग्रजांशी संघर्ष केला होता. शाहरुख खानचे आजोबा देखील स्वातंत्र्यसैनिक होते आणि सुभाषचंद्र बोस यांच्या आझाद हिंद फौजशी त्यांचे संबंध होते. शाहरुख खानच्या वडिलांनी एकदा त्याला सांगितले होते की, “आम्ही तुझ्या वयात अनवाणी पायांनी डोंगर चढत होतो आणि तुला जर चढायचे असेल तर चढ. चढायचं नसेल तर काहीही नको करू, कारण जे काहीही नाही करत, ते चमत्कार करतात.”
ह्याचाच अर्थ असा कि जर ध्येय गाठायचे असेल तर मग ते सर्व मेहनतीने तो डोंगर पार करण्याचा प्रयत्न करा. कितीही कठीण लक्ष्य का असेना, ते पूर्ण करण्याची हिम्मत ठेवा. त्यासाठी कमी वयापासूनच मेहनत करण्याची तयारी ठेवा. आणि जर तुम्हांला काही करायचे नसेल तर मग फक्त चमत्कार घडेल हीच अपेक्षा ठेवा. त्यापैकी शाहरुखने मेहनत करून यशाचे ध्येय गाठले. वडिलांची हीच गोष्ट तो आजही इतका यशस्वी झाला तरी विसरलेला नाही आहे. आजही जेव्हा गरज पडल्यावर तो आपल्या वडिलांनी जे सांगितले ते स्वतःच्या मुलांना सांगायला विसरत नाही. ‘द लायन किंग’ या अॅनिमेशन चित्रपटात शाहरुख खान आणि त्याचा मुलगा आर्यन यांनी चित्रपटाच्या मुख्य पात्र ‘मुफासा’ आणि ‘सिम्बा’ साठी आवाज दिला होता. शाहरुख खान आणि गौरी खान यांचे प्रेम लोकांसाठी एक उदाहरण आहे, पण आता तो वडील म्हणूनही लोकांसाठी प्रेरणा बनण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे.