सोनम कपूर आपला नवीन सिनेमा जोया फैक्टर मुळे चर्चेत आहे. हा सिनेमा 20 सप्टेंबर ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मध्ये ती दाक्षिणात्य सिनेमातील अभिनेता दुलकर सलमान विरुद्ध दिसेल. हा सिनेमा जोया सोलंकीची कादंबरी द जोया फैक्टर वर आधारित आहे. दुलकर आणि सोनम ह्या सिनेमा च्या प्रमोशन मध्ये बीजी आहेंत. ह्या सिनेमाच्या प्रमोशन साठी दोघे कपिल शर्मा च्या शो मध्ये दिसले. ह्या शो मध्ये सोनम ने सांगितलं कि, ती तिचे वडील अनिल कपूर चा सिनेमा बघून चक्क घाबरायची आणि खूप रडायची. शो मध्ये तिने सांगितले कि, तिचे वडील ती छोटी असताना तिला सिनेमाच्या चित्रीकरणाच्या वेळी घेऊन जात नसत. कारण, तिला ही गोष्ट माहिती नव्हती कि, चित्रीकरण कसं शूट करतात. तिने सांगितले कि ती आपल्या पप्पाना मार खाताना बघून खुप घाबरायची आणि रडायची व म्हणायची, “माझ्या बाबांना का मारत आहेत.”
सोनमच्या रोलबद्दल बोलायचं झालं तर चित्रपटात सोनम ऍडव्हर्टाइज एक्झिक्युटिव्ह जोया सोलंकी च्या भूमिकेत दिसणार आहे. तर दुसरीकडे दुलकर सलमान भारतीय क्रिकेटच्या कर्णधाराच्या भूमिकेत दिसणार आहे. चित्रपटात भारतीय क्रिकेट संघासाठी झोयाचा लकी चार्म दाखवला जाणार आहे. ती भारतीय क्रिकेटसाठी किती लकी आहे ह्या संदर्भात चित्रपटाची कथा आहे. शो मध्ये सोनमने सांगितले कि चित्रपट ‘द जोया फॅक्टर’ चित्रपटाप्रमाणेच तिचे पिता अनिल कपूर सुद्धा तिला स्वतःसाठी लकी मानतात. तिने ह्यामागे एक मजेदार किस्सा सांगितला. सोनमने सांगितले कि ज्या वर्षी ती जन्माला आली होती त्या वर्षातील वडील अनिल कपूरचे सर्व चित्रपट ब्लॉकबॉस्टर झाले होते.
त्याच बरोबर सोनमने आपलं वजन कमी करण्याचा प्रवास सांगितला. तिने सांगितले कि, ती बोर्डिंग शाळेत रहायची. तेव्हा तिला जंक फूड खुप आवडायचं. त्या वेळी ती खूप जाड होती. जेव्हा ती घरी यायची तेव्हा तिला घरचं जेवण जेवायच मन करीत असे. सोनम म्हणाली कि, मी एक वेळ 40 सामोसे खाल्ले होते. तिचं हे ऐकून कपिल आणि अर्चना पुराणसिंग आश्चर्य चकित झाले. त्या नंतर तिने सांगितले ते छोटे सामोसे होते. सोनम कपूर चा अगोदरचा सिनेमा ‘एक लडकी को देखा तो ऐसा लगा’ होता या मध्ये अनिल कपूर ने तिच्या वडिलांची भूमिका केली होती. या दोघांव्यतिरिक्त राजकुमार ने महत्वाची भूमिका निभावली होती. हि गोष्ट वेगळी कि हा सिनेमा पडद्यावर जास्त चालला नाही.