Breaking News
Home / मनोरंजन / वडील आणि मुलीचा हा व्हिडीओ होतोय खूप वायरल, पाहून तुमचा देखील दिवस बनून जाईल

वडील आणि मुलीचा हा व्हिडीओ होतोय खूप वायरल, पाहून तुमचा देखील दिवस बनून जाईल

आपण कामावरून घरी येतो तेव्हा इतके प्रचंड थकलेले असतो की विचारू नका. दिवसभराचा शिणवटा आपल्या देहबोलीतून आणि बोलण्यातून सहज कळून येईल असाच असतो. दिवसभराची कटकट डोक्यात गेलेली असते. पण घरी जर लहान मूल असेल तर मात्र पुढच्या काही क्षणांत हा थकवा, शिणवटा कुठच्या कुठं निघून जातो. या लहान मुलांचे बोबडे बोल, निरागस वागणं यांमुळे प्रसन्न वाटतं. त्यावेळी सहज वाटून जातं की आपल्या ताणाचा यांच्यावर परिणाम नको व्हायला आणि पालक म्हणून आपण यांना वेळ द्यायलाच हवा. मग काय थकलेले असूनही आई बाबा आपल्या लहानग्यांसाठी वेळ काढतातच काढतात. त्यातून मग गंमती जंमती होतात.

याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे आपल्या टीमने पाहिलेला एक व्हिडियो. हा व्हिडियो आहे एका वडील आणि मुलीमधल्या संवादाचा ! ही मुलगी आहे एकदमच छोटी. चिमुकलीच आहे म्हणा ना ! पण तिची बुद्धी अगदी तल्लख आहे. याचमुळे की काय तिचे वडील तिला गाण्याचे थोडेसे प्रशिक्षण देऊ इच्छितात. अर्थात त्यांना गाण्याची आवड असणार हे ओघाने आलंच. सोबतच त्यांचा या व्हिडियोतील आवाज ऐकून त्यांना गाण्याची सवय असावी असा अंदाज बांधायला हरकत नाही. असो.

तर मुद्दा काय तर ही वडील मुलीची जोडी बसलेली असते रियाज करायला. व्हिडियो सुरू होण्यापूर्वीच रियाज सुरू झालेला असतो. व्हिडियो सुरू झाल्यावर या छोटीचे वडील पुन्हा एकदा तिला सरगम गाऊन दाखवतात. या छोटीचं त्यांच्या प्रत्येक बोलाकडे लक्ष असतं. ‘सा रे ग म प’ ऐकताना तिच्या चेहऱ्यावर असलेले भाव हे स्पष्टपणे दाखवून देतात. तसेच ‘नि सा’ म्हणत असताना काही तरी समजल्याचे भाव असतात. गंमत वाटते या चिमुकलीची. मग वेळ असते ती तिने सरगम म्हणण्याची. छोटीच असल्याने तिची सरगम अगदी एकसारखी वाटते. पण हे अपेक्षितच असतं. पण गंमत जरूर वाटते. पण सरगम म्हणताना आरोह झाले. आता अवरोह म्हणजे, ‘सा नि ध प म ग रे सा’ म्हणण्याची वेळ येते. तिचे वडील ते ही म्हणून दाखवतात. पण एव्हाना या लहान मुलीचं लक्ष हे कॅमेऱ्याकडे लागलेलं असतं. त्यामुळे तिची वेळ आल्यावर ती काहीच बोलत नाही. पण वडील तिचं लक्ष वेधून घेतात आणि पुन्हा सुरुवात होते. पण यावेळी ही चिमुकली त्यांना त्यांची सरगम पूर्णच करू देत नाही. मधेच तोडत, आपल्या बोबड्या बोलांनी काही तरी म्हणते. वडिलांना तर हसणं आवरत नाही. आपणही हसत असतोच.

खरं तर हा असा रियाज अजून काही वेळ पाहता आला असता तर बरं वाटलं असतं. पण त्यामानाने हा व्हिडियो चट्कन संपतो. अगदी अर्ध्या मिनिटात. पण त्यातही आपल्याला जो आनंद देऊन जातो तो मन प्रसन्न करून जातो. कारण आजूबाजूला जो काही कृत्रिमपणा आहे त्यावर या लहान मुलांचा निरागसपणा हा जणू एखाद्या उताऱ्यासारखं काम करतो. आपला ताण घालवतो. पुन्हा एक नवीन ऊर्जा देतो. यामुळे आम्हाला तर हा व्हिडियो खुप आवडला. आपणही हा व्हिडियो पाहिला असेल तर आपल्यालाही आवडला असणार हे नक्की. पण नसेल पाहिला तर नक्की बघा. तेवढाच क्षणभर विरंगुळा आणि मन हलकं होतं.

सोबतच मंडळी आपल्या टीमने लिहिलेला हा लेख आपल्याला कसा वाटला हे आम्हाला कळवायला विसरू नका. शेवटी काय आहे ना, की आपलं प्रोत्साहन आम्हाला नवनव्या विषयांवर लेखन करायला मदत करतं. तेव्हा आपलं हे प्रोत्साहन, प्रशंसा आम्हाला कायम मिळत राहू द्या. आम्हीही उत्तमोत्तम लेख आपल्या भेटीस आणत राहूच. तोपर्यंत आपले अजतागायचे लेख वाचा, शेअर करा आणि आनंद वाटत राहा. धन्यवाद !!!

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *