Breaking News
Home / मनोरंजन / वडील आणि मुलीचे हे भांडण पाहून तुम्हीदेखील हसू आवरणार नाही, बघा कशी भांडते हि मुलगी

वडील आणि मुलीचे हे भांडण पाहून तुम्हीदेखील हसू आवरणार नाही, बघा कशी भांडते हि मुलगी

आई वडील होणं ही किती आनंदाची बाब असते प्रत्येक जोडप्यासाठी. येणारं मुल त्यांच्या आयुष्यात नवनवीन आनंदाचे क्षण आणत असतं. हे क्षण आपसूकच कॅमेऱ्यात कैद करण्याकडे प्रत्येक आई वडिलांचा कल असतो. कारण हे दिवस पुन्हा अनुभवता येणार नाहीत याची त्यांना कल्पना असते. सोशल मीडियामुळे हे आनंदाचे क्षण आता त्यांना परिवार, मित्र मंडळी यांच्यासमवेत ही शेअर करता येतात. या क्षणांमध्ये अनेक वेळेस लहान मुलांच्या निरागस बोलण्याचा व वागण्याचा, त्यांना अवगत असलेल्या एखाद्या कलेचा किंवा अगदी त्यांच्या खोड्यांचा समावेश असतो. सोशल मिडियावर यात अजून एका बाबीची भर पडलेली दिसून येते – ही बाब म्हणजे पालक आणि त्यांच्या लहानग्यांच्या लुटुपुटू भांडणाचे व्हिडियोज. यातून जे निखळ मनोरंजन होतं ते इतर कोठेही होत नाही. आज आपल्या टीमने असाच एक व्हिडियो बघितला आणि आम्ही हसून हसून लोटपोट झालो. या व्हिडियोत आपल्याला भेटतात ते एक वडील आणि त्यांची लहानगी. या दोघांचं गंमतीदार संभाषण म्हणजे हा व्हिडियो. या संभाषणाची सुरुवात होते तेव्हा हे वडील आपल्या लहानगीशी बोलण्याचा प्रयत्न करत असतात. पण तिचं लक्षच नसतं.

ती आपली समोरच्या भिंतीकडे बघत असते. पण ते तिला वळायला सांगतात. मुलीने त्यांचं काही तरी ऐकलेलं नसतं म्हणून ते खोटे खोटे दरडावत असतात. पण त्यांच्या दरडावण्याचा अजिबात परिणाम होऊ न देता मुलगी त्यांना उत्तर देत असते. तिच्या बोबड्या बोलांमुळे आपल्या सुरुवातीचे काही कळत नाही. पण तिचं अवसान बघून मात्र हसायला येतं. एवढी छोटूशी आहे पण बोलते बघा कशी चटाचटा हे आपल्या मनात येऊन जातं. मग तिचे वडील तिला ओरडत असतात ते तिने दुसऱ्या रूममध्ये केलेल्या अस्ताव्यस्तपणाचे. पण त्यावर आपण असं काहीच केलं नाही अशी तिची भूमिका असते. तिच्या वागण्यावरून हे कळून येतं. बरं आक्रमक अवसान ही कायम असतं. ती आजूबाजूला पाहत पसारा नाहीये कुठे हे सांगत राहते. त्या दरम्यान ती गोल फिरते तेव्हा तिचे वडील तिला सरळ उभं राहायला सांगतात. समोरासमोर बोल असं सांगतात. स्वतः खाली बसतात आणि तिच्याशी बोलायला जातात. पण या छोटुलीचं गोंडस अवसान बघून एवढा वेळ दाबून ठेवलेलं हसू बाहेर येतं. पण इथे तर हि चिमुकली हट्टाला पे-टलेली असते. काहीही पसारा केलेला नसताना ऐकून थोडी घेईल ती.

आपण एवढे हसतो ना तिच्या वागण्यावर. कारण पुढचा बराच वेळ इथे पसारा नाहीये याच वाक्याचा तिचा पाढा सुरू असतो आणि तेही अगदी वरच्या आवाजात. एव्हाना तिचे वडील हसून हसून खरंच गुडघ्यावर येतात. आपण या छोटीला एवढं चेतवलं आहे की आता ती थांबत नाहीये हे पाहून त्यांना हसणं अनावर झालेलं असतं. आपली अवस्था तरी वेगळी थोडी असते. या वडील मुलीचं संभाषण आपण अगदी आनंदाने बघतो. दोन मिनिटांपेक्षा ही कमी वेळ असलेला हा व्हिडियो खूप मनोरंजन करून जातो.

आपल्या टीमने हा व्हिडियो पाहिला तेव्हाच वाटलं की आपल्या वाचकांना याविषयी वाचायला आवडेल. आपणही हा व्हिडियो आवर्जून बघा, मजा येईल. तसेच मंडळी, नेहमीप्रमाणे आपल्या टीमचा हा लेखही शेअर करा. आपल्या प्रतिक्रिया आणि सकारात्मक सूचनांची आम्ही आतुरतेने वाट बघतो आहोत. तेव्हा आपल्या कमेंट्स नोंदवायला विसरू नका. आपला वाचक म्हणून आमच्या टीमप्रति असलेला स्नेह असाच वाढत राहू दे ही सदिच्छा. लोभ कायम असावा ही विनंती. धन्यवाद !!!

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *