आपल्या आई वडिलांकडून किंवा इतर पालकांकडून गोष्टी ऐकणं म्हणजे लहानग्यांना हक्काचं मनोरंजन असतं. त्यात आपले आई वडील जर उत्तम कथाकथनकार असतील तर ह्या गोष्टी ऐकायला अजून मजा येते. याच वर आधारित एक व्हिडियो आपल्या टीमने आज पाहिला. जवळपास अकरा वर्षे जुना व्हिडियो आहे. पण त्यात जी मजा आहे ती आजही कायम आहे. हा व्हिडियो जेव्हा बघितला तेव्हाच वाटलं की आपल्या वाचकांना यावरील लेख आवडेल. चला तर मग या व्हिडियोविषयी जाणून घेऊयात.
सुज्ञ वाचकांना लक्षात आलं असेलच की या व्हिडियोत आपल्याला गोष्ट ऐकणारं एखाद लहान बाळ भेटेल. बरोबर आहात आपण. आपल्याला या व्हिडियोतून एक छोटी मुलगी भेटते. ती तिच्या वडिलांकडून गोष्ट ऐकत असते. पण यात अजून गंमतीचा भाग असा की या गोष्टीवर तिच्याकडून अभिनय केला जात असतो. आहे की नाही धमाल. त्यात ‘दुधात साखर’ म्हणावी अशी बाब म्हणजे तिचे वडीलही उत्तमप्रकारे गोष्ट सांगण्यात पटाईत असतात.
व्हिडियो सुरू होतो तेव्हा ही वडील आणि मुलीची जोडी एका काऊचवर बसलेली असते. तिचे वडील गोष्ट सांगायला सुरुवात करतात. गोष्ट असते एका मुलीची. गोष्टीच्या सुरुवातीपासूनच चिमुकलीचा अभिनय सुद्धा सुरू होतो. कथेतील मुलगी धावत धावत पडते आणि आपल्या भावाला हाक मारते हा पहिला भाग. त्यातच कळून येतं, की पुढे गोष्ट कशीही असो, निरागस अभिनय बघायला मिळणार आहे. कारण अगदी समरसून जाऊन तिचा अभिनय सुरू असतो. गोष्ट पुढे सरकत जाते. त्यात मग कधी घोडा येतो, कधी ससा येतो. विविध प्रसंग घडत असतात. त्यात कधी एका पात्राचा कान पिरगळला जातो तर कधी कोणी तरी ओरडा दिल्याने त्या कथेतील मुलीला गुपचूप झोपून जावं लागतं. हे सगळे प्राणी, प्रसंग आपल्याला जिवंत करून दाखवले जातात ते या चिमुकलीकडून. तिच्या निरागस वागण्याने त्यात हसण्याचे प्रसंग बऱ्याच वेळेस येतात. ससा काहीतरी खात असतो हे तर बघण्यासारख आहे. पुढेही काही प्रसंग येतातच की ज्यातून तिचा अभिनय बघून हसून हसून पुरेवाट होते.
अर्थात त्याचवेळेस तिचं मनापासून कौतुक ही करावंसं वाटतं. कारण तिने ही गोष्ट आधी खूप वेळा ऐकली असेल किंवा अभिनय कसा करावा हे शिकवलं असेलही, पण त्यातही तिची अवलोकनशक्ती जबरदस्त असल्याचं दिसून येतं. घोडा, मासा यांच्या पात्रांसाठी बरोबर अभिनय करते ही छोटी पोर. तिचं खरं तर कौतुक करावं तेवढं थोडं आहे. पण हे कौतुक केवळ लेख वाचण्यातून आपल्याला कळेल असं नाही. या लेखासोबत आपण हा व्हिडियो बघावा. कारण तिचा अभिनय हा खरंच बघावा आणि त्याचं कौतुक करावा असा आहे. हे करून झाल्यावर दोन गोष्टी मात्र आपण नक्की कराव्यात ही विनंती.
एक म्हणजे हा व्हिडियो आणि लेख, आपल्याला कसे वाटले हे आम्हाला कमेंट्स मधून नक्की कळवा. दुसरं असं की आपण आम्हाला नेहमीच उत्तमोत्तम सूचना करत असता. त्यातून अनेक गोष्टी शिकायला मिळत असतात. यापुढेही आपल्या सकारात्मक सूचना आम्हाला कमेंट्स मधून कळवत चला ही विनंती. बाकी आपला जो लोभ आमच्या टीमप्रति आहे त्याबद्दल धन्यवाद. आपलं हे प्रेम, प्रोत्साहन आम्हाला यापुढेही सदैव लाभू दे हीच सदिच्छा. धन्यवाद !!
बघा व्हिडीओ :