लग्न म्हणजे धमाल, मजा मस्ती आणि बरंच काही. लग्नात 2 लोकांची सगळ्यात जास्त मजा असते. पहिले म्हणजे नवऱ्याचे मित्र आणि दुसऱ्या म्हणजे नवरीच्या मैत्रिणी. एकतर त्यांना लग्नात विशेष काही काम नसतं. दुसरं म्हणजे लग्नाच्या पत्रिकेत जिथे ‘व्यर्थ लुडबुड’ म्हणून लहान मुलांची नावे असतात तिथे खरंतर नवरा-नवरीच्या मित्र-मैत्रिणींची नावे टाकायला हवीत. कारण काम शून्य आणि यांची नुसती व्यर्थ लुडबुड असते. पण एक गोष्ट हे मित्र-मैत्रिणी मन लावून करतात. ती गोष्ट म्हणजे डान्स.
आता लग्नाच्या डान्सचे खूप वेगवेगळे प्रकार असतात. काही ठिकाणी हळदीला डान्स केला जातो, लग्नात तर सगळीकडेच करतात आणि काही ठिकाणी वरातीत डान्स केला जातो. (ज्यांना वरात माहिती नसेल त्यांनी गावाकडे राहणाऱ्या कोणत्याही मित्राला फोन करून माहिती घ्या.) तर विषय असाय मंडळी… आमच्या टीमकडे जवळपास 5 मिनिटाचा एक व्हिडिओ आला. सर्वसाधारणपणे 2-3 मिनिटात बोर होणारे आम्ही, तो व्हिडीओ आम्ही पूर्ण होईपर्यंत पापणी न लवता बघितला.
आता त्या व्हिडीओत असं काय होतं की, ज्यासाठी आमची पापणी पण लावली नाही, हे पहायचं असल्यास आधी लेख वाचा. तर एकदम लग्नाचा माहोल आहे. लग्न जरा अप्पर मिडल क्लास फॅमिलीतल आहे, असं जाणवतं. नवरा-नवरीच्या घरातील सदस्यांना आणि मित्र-मैत्रिणींना नाचण्यासाठी एक स्पेशल डान्स फ्लोअर सजवला आहे. गाणी वाजवण्यासाठी तगडा आवाज असलेली साउंड सिस्टीम सज्ज आहे. मध्ये मध्ये बडबड करायला आणि नाचणाऱ्यांचा जोश वाढवण्यासाठी एक निवेदक बोले तो अँकर पण आहे. मस्तपैकी आजूबाजूला लोक आहेत आणि एक एक जण येऊन नाचून जात आहे. आणि अशातच एन्ट्री होते २ पोरींची. ग्रँड एन्ट्री बोलतात ना, तशी एकदम सज-धज के या पोरी एन्ट्री घेतात. आता यांचा घागरा ओढणी एवढा सगळा पसारा आवरून या नाचणार, कशा असा प्रश्न आपल्यालाही सहजपणे पडतो. “नवराई माझी लाडाची लाडाची गं” हे गाणं लागतं, पोरी मोठ्या जोमाने नाचायला सुरू होतात.
एवढे जड कपडे आणि ज्वेलरी घालूनही त्यांची नाचतानाची एनर्जी भन्नाट होती. या गाण्यावर ज्या पद्धतीने त्या डान्स करत आहेत, ते पाहून आजूबाजूची पब्लिकही बसल्या जागी या गाण्याची मजा घेत आहे. आणि या गाण्याला टाळ्यांचाही उस्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. मुळातच गाणं एकदम भारी आहे त्यातही साऊंड सिस्टीम तगडी असल्याने गाण्याचा फील भारी येतो. एवढा सगळा माहोल झाला असल्यावर आपले पाय आपोआप थिरकायला लागतात. हे गाणं संपलं की, सुरू होतं दुसरा गाणं… पुरा लंडन ठुमकदा… या गाण्यावरही पोरी एकदम उत्स्फूर्तपणे नाचतात. सर्वसामान्य लग्नात अशा कार्यक्रमात नाचताना स्टेप्स चुकल्या किंवा मिस झाल्या तरी चालतं. मात्र तरीही या मुलींकडून एकही स्टेप मिस झालेली नाही. सर्वात महत्वाचे म्हणजे शेवटपर्यंत प्रत्येक जण ह्या दोघींचे डान्स एन्जॉय करत असतो. पुढे त्यांनी सोलो डान्स पण केला आहे. आता कोणत्या गाण्यावर डान्स केलाय आणि कसा केलाय, हे तुम्ही व्हिडीओतच बघा.
बघा व्हिडीओ :