Breaking News
Home / मनोरंजन / वधूने स्वतःच्या साखरपुड्यात मैत्रिणींसोबत केला अप्रतिम डान्स, बघा व्हिडीओ

वधूने स्वतःच्या साखरपुड्यात मैत्रिणींसोबत केला अप्रतिम डान्स, बघा व्हिडीओ

आपली टीम वायरल व्हिडियोज वर लेख लिहिते हे आपण जाणताच. किंबहुना आपण वाचक म्हणून जो उदंड प्रतिसाद आपल्या टीमला देत असता, त्यामुळेच आम्हाला नवनवीन विषयांवर लेखन करण्याची उर्जा मिळते. त्याबद्दल सर्वप्रथम आपले मनापासून धन्यवाद. यापुढेही आपला लोभ आपल्या टीमवर कायम राहील हे नक्की. आजच्या लेखाचा विषय आहे एका साखरपुड्यात रंगलेला संगीताचा वायरल व्हिडियो. चला तर मग जाणून घेऊयात याविषयी. हा व्हिडियो आहे जवळपास दोन वर्षांपूर्वीचा. एका साखरपुड्याचा हा व्हिडियो. लग्न साग्रसंगीत होतं हे आपण बघितलं आहेच. पण मजा आणि धमाल करणारी उत्साही मंडळी असली की साखरपुडा ही मस्त मजेत साजरा करता येतो हे कळतं. हा व्हिडियो म्हणजे याची साक्षच जणू. व्हिडियो सुरू होतो तेव्हा या दोघांच्या सगळ्या कुटुंबातील सदस्यांनी आणि आप्तस्वकीयांनी हॉल अगदी भरून गेलेला दिसतो.

जवळच दोन गटांत विभागलेल्या काही मुली उभ्या असतात. लवकरच एक सुप्रसिद्ध गाण्याचे बोल कानावर पडतात. ‘गोव्याच्या किनाऱ्यावर’ हे गाजलेलं गाणं वाजत असतं. कोणीही ऐकलं तर नाचायला लावणारं हे गाणं. या मुली मस्त स्टेप्स करत गाण्याची सुरुवात करतात. मग काही काळाने आपली ताई सुद्धा त्यात सामील होते. त्यात तिने केलेल्या स्टेप्स तर अगदीच मस्त. भावोजींकडे बघत केलेल्या स्टेप्स तर भाव खाऊन जात असतात आणि आपले भावोजी गालातल्या गालात हसत असतात. पण आपली ताई एवढी मस्त नाचत असताना भावोजींना डान्स केल्याशिवाय सोडेल होय. ती त्यांना घेऊन येते. एव्हाना गाणं ही बदललेलं असतं. ‘मन धागा धागा रेशमी दुवा’ हे शब्द असलेलं अजून एक लोकप्रिय गाणं. या गाण्यावर आपले काहीसे बुजरे भावोजी ताईसोबत डान्स करायला सुरुवात करत असतात. ताई त्यांना प्रोत्साहन देत असते.

या प्रोत्साहनाचा परिणाम होतो आणि भावोजी थोडे मोकळे होत डान्स करतात. दोघांमध्ये संवादही चालू असतो. त्यामुळे त्यांचा डान्स बघताना मस्त वाटत कारण त्यात कोणताही कृत्रिमपणा जाणवत नाही. जोडी तर छान दिसत असतेच. आपण मनातल्या मनात दोघांनाही यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा देत असतो. आपल्या वाचकांना या व्हिडियोवरील लेख आवडेल असा विचार करून आज आपल्या टीमने हे लिखाण केलं आहे. आपल्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट्स मधून कळू द्या. तसेच नेहेमीप्रमाणे आपण हा लेखही मोठ्या प्रमाणावर शेअर करत आपल्या टीमचा उत्साह द्विगुणित करणार आहात, त्याबद्दल मनापासून धन्यवाद !! आपला आमच्या टीमवरचा हा लोभ असाच कायम असू द्या ही विनंती. धन्यवाद !!!

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *