Breaking News
Home / मनोरंजन / वधूने स्वतःच्या हळदी कार्यक्रमात केला अप्रतिम डान्स, व्हिडीओ पाहून तुम्हीही कौतुक कराल

वधूने स्वतःच्या हळदी कार्यक्रमात केला अप्रतिम डान्स, व्हिडीओ पाहून तुम्हीही कौतुक कराल

कलेचा आपल्या आयुष्यावर खूप मोठा प्रभाव असतो. खासकरून सिनेमा, मालिका यांचा. यात दाखवल्या जाणाऱ्या चांगल्या गोष्टी सत्यात उतरवण्यासाठी आपल्यातले अनेक जण प्रयत्नशील असतात. खासकरून एखाद्या समारंभ प्रसंगी आखले जाणारे विविध कार्यक्रम. अगदी लग्नसमारंभांचं उदाहरण घ्या ना. आपल्याकडे आधी लग्नसमारंभ म्हणजे नवरा नवरी, त्यांचे पालक, वर्हाडी मंडळी यांच्या सोबतीने होणारे विधी आणि वरात. पण आता या समारंभांचं स्वरूप बदलत चाललं आहे. सध्याचा काळात संगीत, हळदी हे विधी सुद्धा मोठ्या प्रमाणावर साजरे केले जात आहेत. त्यात कुठे ना कुठे तरी फिल्मी झाक असलेली दिसून येते. लग्नात नवरा नवरी सुद्धा आता मस्त मजा मस्ती लुटत त्यांच्या आयुष्यातील या दिवसाची मजा घेत असतात. अनेक वेळेस नवरा नवरी अगदी नटून थटून नाचत गात मंडपात प्रवेश करतात हे ही आपण पाहिलं आहे.

यातील पुढचं पाऊल म्हणजे लग्नापूर्वीच्या हळदी समारंभात केला जाणारा डान्स. आता तुम्ही म्हणाल हळदी ला तर डान्स ठरलेला असतो. पण स्वतःच्या हळदीत अगदी मस्त कोरिग्राफ केलेला डान्स करणारी वधू आपण पाहिली आहे का? उत्तर कदाचित नाही असेल. पण जरा स्मरणशक्तीला जरा जास्त ताण दिला तर काहींना काही महिन्यांपूर्वी पाहिलेला एक व्हिडियो आठवत असेल. नसेल आठवत तरीही हरकत नाही. आता जाणून घ्या. हा व्हिडियो आहे सौम्या शर्मा यांचा. सौम्या या एक युट्युबर आहेत. त्याआधी त्या झुओलॉजी विषयातील स्कॉलर असून उत्तम गायिका सुद्धा आहेत. त्यांना डान्सची प्रचंड आवड. त्यांनी कथक या नृत्य प्रकारात प्राविण्य मिळवलेलं आहे. जवळपास चार वर्षांपासून त्या स्वतःच्या डान्सचे व्हिडियोज त्यांच्या फॉलोवर्स सोबत शेअर करत होत्याच. आज त्यांच्या फॉलोवर्सची संख्या दीड लाखांच्या घरात आहे. त्यांच्या घरी एखादा कार्यक्रम असेल, समारंभ असेल तर त्या प्रसंगी सुदधा त्या जेव्हा जेव्हा डान्स करत, तेव्हाचे व्हिडियोज त्यांनी पोस्ट केले आहेत. काही काळापूर्वी त्यांचं स्वतःचं लग्न झालं.

अर्थात यावेळीही डान्स परफॉर्मन्स आणि त्यावरचे व्हिडियोज तर हक्काने तयार केले गेले. पुढे हे व्हिडियो केवळ प्रसिद्ध ठरले नाहीत तर वायरल ही झाले. इतके की सौम्या यांच्या हळदीच्या समारंभातील व्हिडियो तर ११ लाख लोकांचे व्ह्यूज मिळवून गेला आहे. या व्हिडियोत सौम्या आपल्याला ‘माईने माईन’ या हम आपके हैं कौन या सुप्रसिद्ध सिनेमातील गाण्यावर डान्स करताना दिसतात. आधीच हळदी समारंभासारखा उत्तम प्रसंग, त्यास सौम्या यांना लाभलेली नृत्याच्या कौशल्याची जोड आणि जवळपास चार मिनिटं पूर्ण डान्स करण्याची मुभा. मग काय, परफॉर्मन्सच्या सुरुवातीपासून सौम्या गाण्यातील बिट्स योग्य वेळी पकडत डान्स करत असतात. त्यात त्यांचे हातवारे अगदी लयदार वाटतात. त्यांत भर पडते ती त्यांनी वेळोवेळी घेतलेल्या गिरक्यांची. कारण गिरकी घेत नाचणं बघायला छान वाटतं, पण ते योग्य वेळी आणि योग्य वेळेत जमणं महत्वाचं असतं, तर त्यात बघणाऱ्यास आनंद मिळतो. सौम्या या मनापासून डान्स करतात हे कळून येतं, कारण वर उल्लेख केलेला आनंद आपल्याला त्यांच्या डान्स परफॉर्मन्स मधून मिळतो. त्यांची प्रत्येक स्टेप अगदी एकामागोमाग एक अशी योग्य रीतीने पडत जाते. त्यामुळे जेव्हा त्यांचा परफॉर्मन्स संपतो तेव्हा आपण नकळतपणे त्यांचं कौतुक करत असतो.

आपल्या लक्षात येतं, की तिथे उपस्थित असलेले सगळेच त्यांचं कौतुक करत असतात. हे केव्हा होतं, जेव्हा परफॉर्मन्स उत्तम असतो. सौम्या यांच्या डान्सचं खरंच कौतुक करावंसं वाटतं. तसेच स्वतःच्या हळदीच्या कार्यक्रमात मस्तपणे आनंद घेण्याचा त्यांचा स्वभावही आवडून जातो. त्यांचे इतर डान्स व्हिडियोज ही अतिशय उत्तम आहेत. यापुढेही सौम्या आपल्या उत्तमोत्तम डान्स स्टेप्स सकट विविध व्हिडियोज अपलोड करत राहतील आणि ते व्हिडियोज ही वायरल होत राहतील यात शंका नाही. त्यांच्या पुढील वाटचालीसाठी आपल्या टिमकडून त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा !!

आपल्याला सौम्या यांचा डान्स आवडला असणार यात शंका नाही. सोबतच आपल्या टीमने लिहिलेला हा लेखही आपल्याला आवडला असणार हे नक्की. यानिमित्ताने आपली टीम आपल्या तमाम वाचकांना त्यांनी दाखवलेल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद देऊ इच्छिते. आपण आपल्या टीमचे हे लेख शेअर करता, सकारात्मक कमेंट्स देऊन आम्हाला प्रोत्साहन देत असता, यांमुळे आम्हाला नवनवीन विषयांवर लेखन करण्याचा हुरूप येतो. तेव्हा आपला हा पाठींबा आमच्या पाठीशी यापुढेही कायम असू द्या. लोभ असावा.

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *