Breaking News
Home / मनोरंजन / वधू वरांनी गोंडी गाण्यावर धरला जबरदस्त ठेका, व्हिडीओ होत आहे तुफान वायरल

वधू वरांनी गोंडी गाण्यावर धरला जबरदस्त ठेका, व्हिडीओ होत आहे तुफान वायरल

लग्न म्हटलं की डान्स आलाच त्यात पारंपारिक समाज असला की सगळं कसं रितीरिवाज पार पडतं. या सगळ्यात एक गोष्ट म्हणजे जिथं प्रथा परंपरांचा आदर केला जातो, तिथं समाज तुमचा आदर करायला लागतो. जमाना कितीही पुढे जाऊ द्या तुम्ही तुमचे पाय जमिनीवर ठेवले की तुमच्यासमोरही जग नतमस्तक व्हायला विसरत नाही. या वधू-वराच्या जोडीला असंच काहीसं करायचं होतं. त्यांनी उगाचच लग्नामध्ये पैशांचा बडे जाव न करता अत्यंत साध्या पद्धतीत लग्न करत जगासमोर एक आदर्श उभा केला. या मंडळींनी पाहिलेल्या एकमेकांसोबतच्या स्वप्नात साधेपणा असलेल्या पायावर आपल्या संसाराची इमारत उभी करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. गोंडी या वनवासी परंपरेतील एका गाण्यावर ताल धरल्यावर हे वधू-वर अगदी राजाराणी सारखे शोभून दिसत होते. त्यांच्या बाजूला सोबत नाचणारे आठ दहा आदिवासी भगिने आणि बांधव गाण्यावरती ताल धरत त्यांच्या ह्या विवाह सोहळ्याची शोभा वाढवत होते. बऱ्याचदा हल्ली लग्न हा दिखाव्यासाठी केला जाणारा एक उत्सव मानला जातो.

आपल्याकडे काय आहे काय नाही ते दाखवण्याचे लग्नाशिवाय दुसरी संधी नसल्यामुळे अनेक सुशिक्षित तरुण तरुणी शो ऑफ मध्ये बडेजाव करताना दिसतात. अगदी कर्ज काढून हौस-मौज पुरवली जाते. लग्नामध्ये प्रीमियम लोकेशन वर हॉल निवडायचा, हजारो रुपयांची एक थाळी ठेवायची, आलेल्या निमंत्रितांवर वारेमाप पैसे उधळायचा, या सगळ्यात हुंडा प्रथेला प्रोत्साहन मिळेल, अशा पद्धतीने देवाण-घेवाण करायचे, असले चोचले आजही पुरवले जातात. मात्र या जोडप्याने अत्यंत साधेपणाने लग्न करत समाजापुढे एक आदर्श निर्माण केला आहे. तसेच समाजातील अंतिम घटकाच्या सोबत राहण्याचा आणि त्या घटकाला सबल करण्याचा संदेशही या जोडप्याने दिला आहे. गोंडी नृत्य हा वनवासी बांधवांच्या पारंपारिक नृत्याचा एक प्रकार मानला जातो. शुभप्रसंगी वनवासी बांधव हे नृत्य करत आपापले सण साजरे करतात. वधूवराने त्यांच्या ठेक्याला ताल धरत नृत्य केले आहे. हे नृत्य सर्वांचा मन आकर्षित करून इंटरनेटवर व्हायरल झालेले आहे. वधू-वराच्या नृत्याला पाहून अनेकांनी कौतुकही केला आहे.

अनेक आयाबायांनी नव्या नवरीची दृष्टही काढली आहे. पारंपारिक नृत्याचा हा अविष्कार पाहण्यासाठी वराडी मंडळ हे उत्सुक होते. त्यांनी वधू-वराला त्यांच्या नवीन संसाराबद्दल शुभेच्छा तर दिल्याच, सोबतच या गाण्यावर त्यांनीही ताल धरला. अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने सुरू असलेल्या या नृत्य प्रकारात कुठेही धांगडधिंगा नव्हता. त्यामुळे अत्यंत साधेपणाने साजरा झालेल्या या लग्न सोहळ्याचा सगळीकडेच विशेष चर्चा झाली. लग्न मंडपात अत्यंत साधेपणाने सगळ्या परंपरा प्रथा पार पडण्यात आल्या. सोशल मीडियावरही वधू-वराच्या या अनोख्या उपक्रमाचे कौतुकही करण्यात आले. बऱ्याचदा काय होतं की कोणी हेलिकॉप्टर, तर कोणी स्पेशल क्रूजसारख्या गोष्टी लग्नासाठी मागवून त्यावर आपलं बडे जाऊ दाखवण्याचा प्रयत्न करतात. परंतु या सगळ्यात नव्या जोडप्यानं घालून दिलेला आदर्श सगळ्यांसाठी अनुकरणीय असा आहे. तसेच सार्वजनिक विवाह सोहळ्या निमित्त वधू-वराने अत्यंत साध्यापणाने केलेल्या या पारंपारिक विवाहाचा सर्वांना लाभ घेता आला, त्याबद्दल वनवासी बांधवांनी वधू-वराचे आभार मानले आहेत.

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *