Breaking News
Home / मनोरंजन / वयाच्या अवघ्या 3 ऱ्या वर्षी हि मुलगी किती गोड आरती म्हणते बघा, व्हिडीओ पहा

वयाच्या अवघ्या 3 ऱ्या वर्षी हि मुलगी किती गोड आरती म्हणते बघा, व्हिडीओ पहा

यंदाचा गणेशोत्सव नेहमीप्रमाणेच मोठ्या उत्साहानं उत्साहाने साजरा करण्यात आला. गणपती बाप्पांच्या सेवेत भक्तगण अगदी बेधुंद झाले होते. पाहता पाहता पाच, सहा दिवस कसे गेले कळलंच नाही. पाहाता पाहाता बाप्पांच्या विसर्जनाची वेळही जवळ आली. त्यामुळे भक्तगण सध्या भावूक झाले आहेत. अशाच एका चिमुकल्या गणेशभक्ताचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. बाप्पांचं विसर्जन करताना या लहान मुलाला रडू कोसळलं होतं. बाप्पांची मुर्ती विसर्जित होऊ नये म्हणून तो आपल्या आई-वडिलांसोबत भांडत होता. या चिमुकल्याची अवस्था पाहून तुम्ही देखील भावुक व्हाल. यासोबतच अशाच एका मुलीचा व्हिडीओ आमच्याकडे आला, ज्यात तिने आपल्या लाडक्या गणपती बाप्पाची आरती म्हटली आहे. पण ज्या पद्धतीने तिने ही आरती म्हटली, ते पाहता तिचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होणार, हे नक्कीच झालं.

गणेशोत्सव म्हटलं की काही गोष्टी ओघाने आल्याच खरेदी, मखर, मोदक, आरती अशी बरीच मोठी यादी आहे. म्हणजे बाकी सगळ्या गोष्टींच ठिकं आहे पण आरती हा खूप जवळचा विषय पण तितकाच अनेकांना न जमणारा. पहिलं कारण म्हणजे अनेकांना आरती पाठच नसते आणि दुसरं म्हणजे पाठ असली तरी उच्चार आणि शब्द नीट ठाऊक नसतात.

अनेकजण बिनधास्त बाप्पासमोरही चुकीची आरती म्हणून मोकळे होतात. मग अगदी ‘फळीवरच्या वंदना’पासून ते ‘संकष्टी’लाच पावण्यापर्यंत अनेक मागण्या असे भक्त गणरायाकडे करतात. मोठ्ठ पोट आणि मोठे कान असणारा बाप्पा गपचूप ते ऐकून घेतो आणि तथास्तू म्हणतो. पण अनेकांना चुकीच्या पद्धतीने म्हटली जाणारी आरती खटकते. आणि सालाबादप्रमाणे दर गणेशोत्सवाआधी आरतीमधील उच्चारांचे विनोद व्हायरल करुन त्यांच्यामार्फत स्पष्ट उच्चार करण्याचे प्रबोधन केले जाते. मात्र आजच्या या लहान मुलीच्या व्हिडीओत म्हटलेल्या आरतीला खूप लोकांनी शेअर केला आहे. कदाचित तिचे शब्द चुकले असतील, उच्चारही चुकले असतील… आणि ताल, सूर, लय सगळं काही बिघडलं असलं तरी तिने ज्या प्रामाणिकपणे आरती म्हटली आहे, जी निरागसता तिच्या प्रार्थनेत आहे, ती अफलातून आहे. यावर्षी तिला बाप्पा पावणार, हे मात्र नक्कीच….

फुल्ल उत्साहात तरुण मंडळी आरती म्हणण्यात तल्लीन झालेले असतात. परंतु त्यातल्या किती जणांना आरती येते, ही खरी गमत असते. अशा या आरती न येणाऱ्यांसाठीचे अनेक ट्रोल्स सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. गणेशोत्सवात नैवेद्यावर ताव मारुन झाला की खरी मज्जा असते ती आरती म्हणताना. एकामागोमाग एक आरती म्हणत आणि टाळांच्या तालावर तो माहोल अधिक रंगत जातो. आरत्या म्हणताना तर तरुणाईचा जोश पाहाण्यासारखा असतो. फुल्ल उत्साहात तरुण मंडळी आरती म्हणण्यात तल्लीन झालेले असतात. परंतु त्यातल्या किती जणांना आरती येते, ही खरी गमत असते. अशा या आरती न येणाऱ्यांसाठीचे अनेक ट्रोल्स सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

पण कितीही झालं तरी प्रार्थनेतील शब्द महत्वाचे नसून त्यातील भावना महत्वाच्या आहेत. हा व्हिडीओ तुमचं मनोरंजन करेलच कारण यात तिचे बोबडे बोल तुम्हाला भावतील, याची खात्री आम्हाला आहे. म्हणूनच आता हा व्हायरल व्हिडीओ तुम्हीही बघा आणि मजा घ्या. काळजी घ्या तसेच आमचे लेख वाचून, व्हिडीओ पाहुन आनंदी राहा.

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *