Breaking News
Home / मराठी तडका / वयाच्या तिशीनंतरही ह्या मराठी अभिनेत्रींनी अजून केले नाही लग्न, बघा कोणकोण आहेत त्या अभिनेत्री

वयाच्या तिशीनंतरही ह्या मराठी अभिनेत्रींनी अजून केले नाही लग्न, बघा कोणकोण आहेत त्या अभिनेत्री

मनोरंजन क्षेत्रात पूर्वी एक अलिखित नियम असल्यासारखा एक नियम होता. नायिकांची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री अनेक वेळेस लग्न झाल्यावर अभिनय क्षेत्रात अगदी कमी काम करत असतं. आता मात्र जमाना बदलतो आहे. अनेक अभिनेत्री लग्न झाल्यानंतरहि आपलं अभिनय क्षेत्रातील काम सुरु ठेवतात. इतकेच नाही तर स्वतःचे अभिनयाव्यतिरिक्त इतर व्यवसायातही अग्रेसर राहतात. पण हे हि तितकंच खरं आहे कि कित्येक अभिनेत्रींचं लग्न लवकर होतं तर काही अभिनेत्री अजूनही लग्नाच्या बोहल्यावर उभ्या राहिलेल्या नाहीत. कलाक्षेत्रातलं सतत येणारं काम, त्यामुळे व्यस्त होत जाणारं आयुष्य यांमुळे असेल कदाचित. पण यांमुळे जेव्हा या सुप्रसिद्ध अभिनेत्रींचं लग्न ठरतं तेव्हा त्यांच्या लग्नाविषयी बातम्या प्रसिद्ध होतात. सध्या सई लोकूर या सुप्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेत्रीच्या होऊ घातलेल्या लग्नामुळे, इतरही अभिनेत्रींच्या लग्नाविषयी प्रेक्षकांची उत्सुकता वाढू शकते. याच निमित्ताने मराठी गप्पाची टीम आपल्या भेटीस घेऊन आली आहे काही नावं. ज्यांनी कलाक्षेत्र गाजवलंय पण अजूनही लग्नाच्या बेडीत त्या अडकल्या नाहीयेत. पाहूया तर या तारका कोण आहेत त्या.

सुरुची आडारकर (जन्म – २५ एप्रिल १९८८) :

चला हवा येऊ द्या या सुप्रसिद्ध कार्यक्रमाचं सध्या लेडीज झिंदाबाद हे पर्व सुरु आहे. यात मराठी मनोरंजन क्षेत्रातील गुणी अभिनेत्री आपल्याला विनोदाची आतषबाजी करताना दिसत आहेत. यातलं एक आघाडीचं नाव म्हणजे सुरुची आडारकर. सुरुचीने जेष्ठ नाट्यकर्मी प्रभाकर पणशीकर यांच्या ‘अवघा रंग एकची झाला’ या नाटकातून पदार्पण केलं. पुढे का रे दुरावा मधील अदितीची भूमिकाही गाजली. तसेच अंजली या मालिकेतील मध्यवर्ती भूमिकेनेही प्रेक्षकांची वाहवा मिळवली. या गाजलेल्या मालीकांसोबतच तिने ‘नारबाची वाडी’, ‘तथास्तु’ या सिनेमांमध्येही अभिनय केला आहे. इतर अनेक मालिकांतून तिने अभिनयाची छाप पाडली आहे. अभिनयासोबत तिने सामाजिक जाणीवही जपली आहे. नुकत्याच झालेल्या जागतिक अंधत्व निवारण दिनानिमित्त तिने आपल्या परीने नेत्रदानाबद्दल जनजागृती करण्यास हातभार लावला होता. कलाक्षेत्रातील झगमगाटातही स्वतःचं सामाजिक विषयांबद्दल डोळसपण जपणाऱ्या सुरुचीला पुढील वाटचालीसाठी मराठी गप्पाच्या टीमकडून खूप खूप शुभेच्छा !

शर्मिला शिंदे (जन्म – ५ एप्रिल १९८७ ) :

सध्या प्रेक्षकांमध्ये No Breaking News हि नवीन युट्युब वेब सिरीज गाजते आहे. या वेबसिरीजच्या माध्यमांतून वृत्तनिवेदकांनी घरची कामे करता करता जर बातम्या सांगितल्या तर कशा असतील या धर्तीवर प्रहसन सादर केलेलं आहे. शर्मिला यात मध्यवर्ती भूमिकेत आहे. या विनोदी भूमिकेप्रमाणे तिने चला हवा येऊ द्या चे सेलिब्रिटी पर्व सुद्धा गाजवलेले आहे आणि त्यातील सर्वोत्तम स्पर्धकांत तिची गणना होत होती. सध्या ती साई बाबांवर आधारित एका मालिकेत आणि ‘माझ्या नवऱ्याची बायको’ या मालिकांच्या शुटींग्स मध्ये व्यस्त आहे. या मालिकांच्या आधीही तिने, कृपा सिंधू, स्वप्नांच्या पलीकडले या मालिकांतून स्वतःच्या अभिनयाची छाप पाडली आहे. तिच्या पुढील यशस्वी वाटचालीसाठी मराठी गप्पाच्या टीम कडून खूप खूप शुभेच्छा !

जुई गडकरी (जन्म – ८ जुलै १९८८ ) :

जुई गडकरी म्हणजे आजच्या आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक. पुढचं पाउल या मालिकेतील कल्याणी हि तिची व्यक्तिरेखा खूप गाजली. आजही प्रेक्षकांना तिचा या भूमिकेतील अभिनय आठवतो. याचप्रमाणे सरस्वती, माझिया प्रियाला प्रीत कळेना, तुज विण सख्या रे, वर्तुळ या प्रसिद्ध मालिकांतील तिच्या भूमिकाही लोकप्रिय झाल्या. या मालिकांसोबतच तिने बिग बॉस मराठी या प्रसिद्ध कार्यक्रमात भाग घेतला होता. एक उत्तम अभिनेत्री असण्यासोबतच जुईला पाळीव प्राण्यांविषयी विशेष प्रेम आहे. तिच्या स्वतःकडे दोन मांजरी आहेत. जुईने नुकताच एक विडीयो तिच्या सोशल मिडीयावरती शेअर केला होता. ज्यात ती एका प्राणीमित्र संघटनेच्या कौतुकास्पद कामाविषयी बोलताना दिसली होती. उत्तम अभिनेत्री असण्या सोबतच, एक संवेदनशील व्यक्ती असणाऱ्या या अभिनेत्रीला पुढील यशस्वी वाटचालीसाठी मराठी गप्पाकडून खूप खूप शुभेच्छा !

मंजिरी फडणीस (जन्म – १० जुलै १९८८ ) :

आपल्यातल्या अनेकांना ‘जाने तू या जाने ना’ हा सिनेमा तो प्रसिद्ध झाला तेव्हा आवडला असेल आणि आजही आठवत असेल. या सिनेमामधून एका मराठमोळ्या मुलीने प्रेक्षकांची तिच्या अभिनयासाठी वाहवा मिळवली होती. हि अभिनेत्री म्हणजे मंजिरी फडणीस. मंजिरीने या सिनेमाच्या आधीही कलाक्षेत्रात काम केलेलं होतं. पण लोकप्रिय अभिनेत्री म्हणून नावलौकिक मिळाला तो या सिनेमातून. तिने आत्तापर्यंत अनेक कलाकृतींतून आणि माध्यमांतून काम केलेलं आहे. सिनेमा, शॉर्ट फिल्म्स, वेब सिनेमा अशा विविध माध्यमांतून ती प्रेक्षकांपर्यंत पोहोचली आहे. तसेच रंगमंचावरही तिने देवदास या म्युझिकल शो मधून नृत्य कौशल्य सादर केलं आहे. तिच्या सोशल मिडिया अकाउंट वर एक सुंदर वाक्य लिहिलेलं आहे. ते म्हणजे Artist Beyond Medium. तिच्या अभिनय कारकिर्दीकडे पाहून याची खात्री पटते. कारण तिने वैविध्यपूर्ण भूमिका आणि नवनवीन माध्यमं हाताळली आहेत. यापुढेही तिचा हा प्रवास असाच माध्यमांच्या पलीकडे आणि यशस्वी रीतीने व्हावा हि मराठी गप्पाच्या टीमकडून तिला शुभेच्छा !

प्राजक्ता माळी (जन्म – ८ ऑगस्ट १९८९ ) :

युट्युब वर नुकताच एक मॅशअप विडीयो वायरल झाला. हा होता Faded या प्रसिद्ध इंग्रजी गाण्यासोबत प्राजक्ता माळी या आपल्या आवडत्या अभिनेत्रीने केलेला भरतनाट्यमचं सादरीकरण. नुकतेच या विडीयोने दहा लाख व्युजचा टप्पा ओलांडला आहे. प्राजक्ताने या विडीयो मध्ये जसं कलाकार म्हणून नृत्य केलं आहे तसेच ती या विडीयोच्या निर्मिती टीमचा सुद्धा एक भाग आहे. निर्मिती क्षेत्रातील हे तिचं पहिलं पाउल. तिच्या वैविध्यपूर्ण कारकिर्दीत अजून एक मानाचा तुरा खोवला गेला आहे असं आपण म्हणू शकतो. पाजाक्ताने अनेक मालिकांमध्ये काम केलेलं आहे. जुळून येती रेशीमगाठी, सुवासिनी या तिच्या गाजलेल्या मालिकांपैकी काही. तसेच तिने नाटक आणि सिनेमा ह्या माध्यमांतूनही अभिनय केला आहे. शिवपुत्र संभाजी, प्लेझंट सरप्राईज हि तिची गाजेलेली नाटकं. तसेच खो खो, संघर्ष हे सिनेमे. अभिनयासोबत तिने एका पेक्षा एक च्या मंचावर स्वतःची नृत्यकला सादर केली होती. भरतनाट्यम मध्ये विशारद असणारी प्राजक्ता जशी उत्तम नृत्यांगना आहे तशीच उत्तम निवेदक सुद्धा. महाराष्ट्राची हास्यजत्रा हा तिचा निवेदक म्हणून काम असणारा सध्या चर्चेत असलेला कार्यक्रम.

अभिनय, नृत्य, निवेदन या तिच्या कला तिने विविध माध्यमांतून आपल्या समोर मांडल्या आहेत. येत्या काळातही ती हा सिलसिला कायम ठेवेल आणि तिच्या चाहत्यांसाठी आनंद देणाऱ्या अनेक कलाकृती साकारेल हे नक्की. नुकत्याच निर्मिती क्षेत्रात पदार्पण केलेल्या या अष्टपैलू अभिनेत्रीला मराठी गप्पाकडून पुढील यशस्वी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा !

मुक्ता बर्वे (जन्म – १७ मे १९७९ ) :

मुक्ता बर्वे. बस नाम हि काफी है. नाटक, मालिका, सिनेमा या सगळ्या माध्यमांतून प्रेक्षकांना आनंद देणारी अभिनेत्री. तिने पदार्पण केलं ते नाटकांतून. घर तिघांचं हवं, आम्हाला वेगळ व्हायचंय, देहभान, फायनल ड्राफ्ट हि तिची सुरुवातीची व्यवसायिक नाटके. पुढे अभिनेत्री म्हणून काम करता करता तिने नाट्यनिर्मितीही केली. छापा काटा हे तिचं अभिनित आणि निर्मिती असलेलं पहिलं नाटक. तिने केलेल्या नाट्यकृतींवर नजर टाकली तर प्रत्येक नाटक हे लोकप्रिय ठरलेलं आहे. तिच गोष्ट मालिका आणि सिनेक्षेत्राची. प्रत्येक कलाकृती हि लोकप्रिय आणि संस्मरणीय अशी असते. पण त्यातही विशेष उल्लेख करावा वाटतो तो जोगवा आणि मुंबई पुणे मुंबई या दोन सिनेमांचा. आजही मराठीतील सर्वोत्तम चित्रपटांत गणले जाणारे चित्रपट म्हणून या सिनेमांची नोंद होते. या सिनेमातील एका गाण्याचं नृत्यदिग्दर्शन म्हणजेच कोरिओग्राफर म्हणून सुप्रसिद्ध अभिनेत्री स्मिता तांबे यांनी काम पाहिलं होतं.

या माध्यमांसोबतच मुक्ता या नजीकच्या काळात अनेक वेळेस आपल्याला त्याच्या आवाजाच्या रूपाने भेटतात. त्यांनी स्टोरीटेल या नवीन उपक्रमाअंतर्गत ‘ऍडीक्ट’ या थरारक सिरीजचं वाचन केलं आहे. मयुरी वाळके या याच्या लेखिका असून, योगेश शेजवलकर याचे संवादलेखक आहेत. मुक्ताने तिच्या एका सोशल मिडीयापोस्ट मधून हा फारच थरारक अनुभव होता असं नमूद केलेलं आहे. तिच्या अन्य कलाकृतींप्रमाणे हि नवीन कलाकृतीही संस्मरणीय असेल हे नक्की. जे करायचं ते शंभर टक्के उत्तम आणि बदलत्या काळानुसार असा जिचा स्वभाव दिसून येतो त्या प्रगतिशील अभिनेत्रीला तिच्या येत्या काळातील वाटचालीसाठी मराठी गप्पाच्या टीमकडून खूप खूप शुभेच्छा !

मनोरंजन क्षेत्रात लक्षणीय कामगिरी करणाऱ्या या समस्त अभिनेत्रींना मराठी गप्पाच्या टीमचा मानाचा मुजरा. वर अजून एका अभिनेत्रीचा उल्लेख झाला. स्मिता तांबे यांचा. त्यांच्या अभिनय प्रवासाचा आढावा आपण मराठी गप्पावर प्रकाशित झालेल्या एका लेखात घेतला आहेच. आपण तो लेख वाचला नसल्यास वर उपलब्ध असलेल्या सर्च मध्ये जाऊन स्मिता तांबे असं लिहून शोध घ्या. तुम्हाला तो लेख सापडेल, त्याचेही वाचन करा. मराठी गप्पाचे सातत्याने वाचक असल्याबद्दल धन्यवाद.

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *