चित्रपटसृष्टीत सौंदर्यवतींची कमी नाही आहे आणि त्यांना चाहणाऱ्यांची सुद्धा. तसेही सुंदरतेच्या मागेतर सर्व जग वेडे आहे आणि ह्या तर बॉलिवूडच्या सुंदऱ्या आहेत. तसे तर आज आम्ही तुम्हांला अश्या सौंदर्यवतींबद्दल सांगणार आहोत कि, ज्यांनी लग्नाचे वय खूप अगोदरच पार केले आहे. ज्या वयात सामान्यतः कोणत्याही मुलीचे लग्न व्हायला पाहिजे, परंत्तू ह्या वयात सुद्धा ह्या अभिनेत्री आतापर्यंत अविवाहित आहेत. खरंतर, वेळेवेळेला इतर सर्वांसारखे ह्या अभिनेत्रींचे सुद्धा अफेअर्सचे किस्से समोर आलेत. परंतु त्यांच्या लग्नाबद्दल अजूनपर्यंत बातमी नाही येऊ शकली. चला तर जाणून घेऊया कोण कोण आहेत त्या अभिनेत्री.
तब्बू
चित्रपटसृष्टीत जेव्हा सिंगल अभिनेत्रीबद्दल जेव्हा सुद्धा चर्चा होते तेव्हा लोकप्रिय अभिनेत्री तब्बूचे नाव सर्वात पहिले येते. तसं पाहिलं तर तब्बू जसजसे वयाचा टप्पा पार करत चालली आहेत तसतशी ती अजूनच सुंदर दिसू लागली आहे. खरंतर, चित्रपटसृष्टीत असल्याकारणाने तब्बूचे नाव अनेक लोकांसोबत जोडले गेले आहे, परंतु अजूनपर्यंत कोणासोबत सुद्धा तिने लग्न केले नाही आणि लग्नाचे कोणतेही संकेत सुद्धा तिने दिले नाहीत. ४७ वर्ष होऊन सुद्धा अजूनपर्यंत तब्बू अविवाहित आहे.
एकता कपूर
टीव्ही जगतातील सर्वात लोकप्रिय आणि नावाजलेली प्रोड्युसर एकता कपूर ला कोण ओळखत नाही, असे कोणी नसेल. तसे तर एकता कपूरची लोकप्रियता इतकी मोठी गोष्ट राहिली नाही, कारण ती अगोदर तर पहिल्यापासून लोकप्रिय अभिनेता जितेंद्र ह्यांची मुलगी आहे. परंतु एकताने स्वतःच्या मेहनतीच्या जोरावर टीव्ही जगतामध्ये आपली एक वेगळी ओळख बनवली आहे. तसे तर एकता एक प्रोड्युसर जरूर आहे, परंतु ती रूपाने सुदंर सुद्धा आहे. आणि तिला पसंत करणाऱ्यांची सुद्धा कमी नाही. तिच्यासोबत लग्न करणाऱ्यांची सुद्धा खूप मोठी रांग लागलेली आहे. परंतु ४४ वर्षे असलेली एकता कधी लग्न करेल ह्याचा कोणताच अंदाज नाही आहे.
साक्षी तन्वर
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री साक्षी तन्वर आपल्या अभिनयामुळे नेहमी चर्चेत असते. सध्या साक्षीचे वय ४६ असूनदेखील तिने अजूनही लग्न केलेले नाही. साक्षीने एका मुलीला दत्तक सुद्धा घेतले आणि त्या मुलीची देखभाल ती स्वतः एकटी करते. आणि साक्षीचे अजूनही लग्न करण्याचा कोणताच विचार नाही आहे.
नगमा
बॉलिवूड आणि टॉलिवूड मध्ये आपल्या सुंदरतेने एकापेक्षा एक अभिनेत्यांना घायाळ करणारी अभिनेत्री नगमाचे जलवे सुद्धा काही कमी नाहीत. तुमच्या माहितीसाठी आम्ही सांगतो कि, नगमाचे नाव भारताचे माजी कर्णधार क्रिकेटपटू सौरभ गांगुली सोबत सुद्धा जोडले गेले होते. परंतु सौरभ गांगुलीने डोना सोबत लग्न केले. सध्या नगमाचे वय ४४ असून आजही ती अविवाहित आहे. नगमा कधी लग्न करेल ह्याबाबत कोणताच खुलासा नाही आहे.
सुश्मिता सेन :
माजी विश्वसुंदरी सुंदरी अभिनेत्री सुश्मिता सेनचे वय सध्या खूपच जास्त झाले आहे. परंतु आज सुद्धा तिच्या लग्नाबद्दल कोणतीच बातमी आली नाही. सुश्मिताचे वय भलेही ४४ वर्ष झाले असेल, परंतु ती ग्लॅमर आणि सौंदर्यतेच्या बाबतीत कुठेच मागे दिसत नाही. सूत्रांच्या माहितीनुसार सुश्मिताचे विक्रम भट्ट, रणदीप हुड्डा, बंटी सचदेव, इम्तियाज खत्री, मुदस्सर अजीज, शब्बीर भाटिया, संजय नारंग, हृतिक भसीन इत्यादींसोबत अफेअरच्या बातम्या समोर आल्या आहेत. परंतु ह्यापैकी कोणासोबत सुद्धा तिचे लग्न होऊ शकले नाही. सध्या सुश्मिता रोहमन शॉल ह्याला डेट करत आहे. आता हे पाहणं मनोरंजक असेल कि तिचे हे अफेअर लग्नापर्यंत पोहोचते कि नाही ते. असं बोललं जातं कि सुश्मिता सेनने जवळजवळ १२ जणांना डेट केले असल्याचे सांगितले जाते.