Breaking News
Home / मनोरंजन / वरमाला घातल्यानंतर नवरदेवाने जे कृत्य केले त्यामुळे नेटकरींकडून नवरदेवाचे होतेय कौतुक, नवरी मात्र लाजली

वरमाला घातल्यानंतर नवरदेवाने जे कृत्य केले त्यामुळे नेटकरींकडून नवरदेवाचे होतेय कौतुक, नवरी मात्र लाजली

सध्या अनेक सिंगल मुलामुलींना सोशल मीडियावर जाणं म्हणजे नकोस वाटायला लागलंय. अहं, सोशल मिडियावरचं प्रेम कमी झालेलं नाहीये. ते आहे तसच आहे. पण सध्या ऑनलाईन गेलं आणि कोणाच्या लग्नाची बातमी कळली नाही, असं क्वचितच होत असेल. अगदी काही वेळा तर आपल्या मित्रांच्या लग्नाची नसली तरी त्यांच्या नातेवाईकांची किंवा त्यांच्या मित्रांच्या लग्नाच्या बातम्या सुद्धा बघायला मिळतात. गंमतीचा भाग सोडला तरी खरी परिस्थिती फारशी वेगळी नाही.

तसाही सध्याचा काळ हा लग्नांचा असतोच. त्यामुळे लग्नांच्या बातम्या येणं काही नवीन नाही. किंबहुना या बातम्यांसोबतच येणारे किस्से ही आपल्याला काही नवीन नाहीत. मुळात चार टाळकी जमली तरी काही ना काही किस्से हे होतंच असतात. इथे तर नातेवाईक, आप्तस्वकीय आणि मित्रपरिवार असा सगळा गोतावळा जमलेला असतो. त्यामुळे किस्से घडले नाहीत असं होत नाही. कारण आपल्या या सगळ्या गोतावळ्यात कोणी ना कोणी गमत्या माणूस हा असतोच.

काही जण त्यापुढे एक पाऊल जाऊन, अतरंगी सुद्धा असतात. त्यामुळे अशा प्रसंगी गंमत जंमत ही ठरलेली असते. पण अनेकवेळा काही जण अगदी अनपेक्षितरित्या समजुतदारपणा दाखवतात तेव्हा ही किस्से घडतातच. त्यात या वागण्यास नर्मविनोदी वागण्याची झाक असेल तर अजून गंमत येते. याचाच प्रत्यय आमच्या टीमने आणि बहुतांश नेटकर्यांनी घेतला. हा अनुभव आमच्या टीमला घेता आला तो एका वायरल व्हिडियो मुळे ! लग्नातले व्हिडियो तसेही वायरल ठरतात. पण हा व्हिडियो वेगळा आहे. या व्हिडियोत घडलेली घटना तर नेटकर्यांच्या कौतुकाचा विषय ठरली आहे. व्हिडियो सुरू होतो तेव्हा आपल्याला एक लग्न मंचक दिसून येतो. नवपरिणीत नवरा नवरी मंचकावर उपस्थित असतात. अजूनही त्यांनी एकमेकांना वरमाला घालयची असते. व्हिडियो सुरू होताना तोच विधी सुरू होणार असतो. सुरुवातीला वधू हातातील वरमाला घेत नवरोबाच्या गळ्यात घालते. तिथपर्यंत ठीक असतं. पण मग ती त्या वराच्या पाया पडते. खरं तर हल्ली लग्नांमध्ये अस काही होताना दिसत नाही आणि त्याची गरज ही नसते. नवरा बायकोचं नातं हे मैत्रीचं असावं. त्यात समानता असावी. पण नवराई त्या वेळी पटकन पाया पडून मोकळी होते. अर्थात त्या गडबड गोंधळात एरवी ही बाब कदाचित दुर्लक्षित झाली ही असती. पण त्या ठिकाणी असलेला नवरा मुलगा मात्र सतर्क असतो.

ती चट्कन पाया पडून उभी राहते आणि बाजूला उभ्या असलेल्या एका ताईंशी तिचं काही तरी जुजबी बोलणं सुरू होतं. आता नवरदेवाची वरमाला घालण्याची वेळ असते. त्या दोघींचं बोलणं संपायच्या आत आत, तो ती वरमाला घालतो सुदधा ! पण पुढे जे करतो त्यामुळे बिचारी लाजून बाजूला ही जाते. कारण त्या पठ्ठ्याने तिला वाकून नमस्कार केलेला असतो. तिच्या नमस्काराची परतफेड ही त्याने अशी केलेली असते. खरं तर त्याच्या जागी दुसरा कोणी असता तर छाती फुगवून उभा राहिला असता. पण हा भाऊ खूपच समजूतदार असतो आणि म्हणूनच सगळ्यांच्या कौतुकास पात्र ठरतो. त्याच्या या कृतीने लग्न मंडपात हि त्याला प्रोत्साहन दिलं जातं आणि सोशल मीडियावर ही हे प्रोत्साहन मिळतंच मिळतं.

आमच्या टीमने हा वायरल व्हिडियो बघितला आणि त्यातील घटना लक्षात राहिली. म्हंटलं हा विषय डोक्यातून निघण्या आधी याविषयी लिहायला हवं. यातूनच आजचा हा लेख लिहिला गेलेला आहे. आपल्याला आमचा हा प्रयत्न आवडला असेल अशी अपेक्षा आहे. आमच्या या लेखासोबतच आमच्या टीमचे अन्य लेखही आपण आठवणीने वाचा. कारण आपली टीम आपल्या वाचकांसाठी त्यांच्या आवडीचे विषय निवडत असते. त्यावर माहिती घेऊन लिहीत असते. अनेकवेळा तर विविध विषयांवर लिहिताना खूप वेळ ही लागतो. पण आमची लिहायची आणि आपली वाचायची आवड यासाठी आम्ही हे अगदी मनापासून करत असतो. पुढेही करत राहू. गरज आहे ती आपल्या खंबीर पाठिंब्याची ! तो कायम मिळत राहू दे ही सदिच्छा ! लवकरच एका नवीन विषयासह भेटूच. तोपर्यंत काळजी घ्या, आमचे सगळे लेख वाचा आणि आठवणीने शेअर करा. धन्यवाद !!!

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published.