Breaking News
Home / मनोरंजन / वरमाला घालतेवेळी नवरदेवाची मस्ती करणं नवरीला पडलं महागात, सर्वांसमोर झालं हसू

वरमाला घालतेवेळी नवरदेवाची मस्ती करणं नवरीला पडलं महागात, सर्वांसमोर झालं हसू

लग्नसमारंभात अनेकदा असे काही भन्नाट किस्से घडत असतात जे आजन्म साऱ्यांच्याच लक्षात राहतात. बऱ्याचदा हे किस्से आठवून आपण हसतो आणि लग्नातील तो सारा सीन डोळ्यासमोर उभा राहतो. मात्र, सध्याच्या काळात प्रत्येकाच्या हातात मोबाईल फोन असतो. त्यामुळे असे काही मजेशीर किस्से घडले की लगेच ते कॅमेरा कैद होतात. त्यामुळ हे मजेशीर किस्से आठवण्यासोबतच पुन्हा एकदा पाहायला मिळतात. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ चर्चेत आला आहे. नवरदेव आणि नवरीची वरमाला घालताना अशी काही फजिती झालो की, ती त्यांना सुद्धा समजली नाही. नवरीच्या या वेंधळेपणामुळे केवळ वऱ्हाडीच नव्हे तर नवरदेवदेखील खो-खो करुन हसू लागला. सोशल मीडियावर लग्नाचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. विशेषत: वधू-वरांशी संबंधित व्हिडिओला खूप पसंती दिली जाते.

कधी लग्नामधील एखादा गोंडस क्षण व्हायरल होतो, तर कधी नववधूच्या डान्सचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतो. सध्या एका लग्नाचा असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे, जो लोक खूप शेअर करत आहेत. जास्त शायनिंग मारली की, फजिती होणारच होणार. वरमालाचा हा व्हिडिओ खूप व्हायरल होत आहे. जो पाहिल्यानंतर तुम्हाला ही भारी वाटेल आणि समजेल की, हा नवरदेव आपल्या होणाऱ्या बायकोवर किती जास्त प्रेम करतो. मात्र, बरेच लोक हा व्हिडीओ बघितल्यानंतर पोट धरून हसण्यापासून स्वत: ला रोखू शकत नाहीयेत. नवरदेव-नवरीव्यतिरिक्त कुटुंबातील सदस्य आणि काही मित्रमंडळीही स्टेजवर आणि खाली उभे आहेत. या व्हिडीओत आपल्याला दिसून येईल की, नवरीबाई लग्नात नवरदेवासोबत मस्ती करताना दिसली. पण तिची ही मस्ती तिला चांगलीच महागात पडली.

व्हिडीओत आपण पाहू शकता की, सुरुवातीला नवरी नवरदेवाला वरमाला घालते. त्यावेळी नवरदेव किंचितशी आपली मान मागे करतो. पण नवरी त्याला वरमाला घालते. त्यानंतर जेव्हा नवरदेव वरमाला घालायला जातो तेव्हा नवरी उड्याच मारू लागते. नवरदेवाला ती वरमाला घालू देत नाही. उड्या मारत मारत ती मागे जाते आणि तिचा तोल ढासळतो. ती धाडकन स्टेजवरून खालीच कोसळते. नवरदेव नवरीला पकडायला जातो पण त्याआधीच नवरी खाली पडते. नवरदेवही तिला पडण्यापासून वाचवू शकला नाही. आपलं लग्न आपल्या आणि प्रत्येकाच्या लक्षात राहावं, यासाठी काही लोक खर्च करतात तर काही लोग आपली मजा मस्ती करून आठवणी ठेवतात. मात्र या आठवणी बनवायच्या नादात, मजा मस्ती करायच्या नादात अशी काही फजिती होते की, खरोखरच आपलं लग्न लोकांच्या लक्षात राहते.

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *