उत्तरप्रदेश मधील उन्नाव येथे एका लग्न समारंभात तेव्हा गोंधळ माजला जेव्हा वरमालेच्या दरम्यान नवरदेवाचे विग खाली येऊन स्टेजवर पडले. टकला नवरा पाहताच नवरी भडकली आणि लग्नाला नकार दिला, तर दुसरीकडे नवरीकडच्यांनी वरातीला बंधक बनवून ठेवले. शेवटी हे प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचले.
उन्नाव येथे एका वधूने आपली वरात परत माघारी पाठवली. नवरीला वरमालेच्या दरम्यान माहिती पडलं कि नवरदेवाचे केस बनावट आहेत. नवरी मुलीला जसे हे माहिती पडले तशी तिच्या पायाखालची जमीनच सरकली. तिने लग्न करण्यास स्पष्टपणे नकार देत वरात माघारी घेऊन जाण्यास सांगितले. नवरदेवाच्या केसांना घेऊन गोष्ट इतकी वाढली कि पोलिसांना बोलवावे लागले. खूप समजावल्यानंतर पोलिसांनी वधूपक्षाला शांत केले आणि वरातीला माघारी पाठवले. हि घटना उन्नाव येथील सफीपूर येथील आहे. येथे शुक्रवार रात्री दिल्ली येथून वरात आली होती. वधूपक्षाने वरातींचे जोरदार स्वागत केले. नाचत गात वरात वधूच्या दरवाज्यावर पोहोचली. थोड्यावेळाने वरमालेचा कार्यक्रम सुरु झाला.
रात्री जवळजवळ १० वाजता नवरदेव पंकज आणि वधू स्टेजवर पोहोचले. दोघांनी एकमेकांना वरमाला घातली. त्यानंतर स्टेज फिरणार होता. काही वेळपर्यंत स्टेज चोहोबाजूंनी फिरत राहिला. ह्यानंतर वर-वधू स्टेजवरून उतरू लागले. तेव्हा नवरदेव पंकज बेशुद्ध होऊन खाली पडला. अशी चर्चा आहे कि त्याला आकडी आली होती. नवरदेवाच्या अचानक पडण्याने गोंधळ माजला. लगोलग वधू-वरांच्या लोकांनी त्याला उठवलं आणि सोफ्यावर झोपवले. चेहऱ्यावर पाणी टाकले. नवरीसुद्धा तिथे उभी होती. ती सुद्धा घाबरली होती. तिने काळजीपोटी नवरदेवाच्या डोक्यावरून हाथ फिरवला तर त्याचा विग निघाला. आणि मग तिथूनच संपूर्ण प्रकरण समोर आले. आपला होणाऱ्या नवऱ्याचे टक्कल पाहून नवरी हादरली. ती मोठ्या-मोठ्याने ओरडू लागली आणि तिने लग्न करण्यासाठी नकार दिला.
मुलीच्या घरच्यांनी सुद्धा पहिल्यांदा नवरदेवाला विग शिवाय पाहिले तेव्हा ते सुद्धा अचंबित झाले. नवरीने लग्नाला नकार देताच दोन्हीकडची मंडळी समोरासमोर आली. दोन्ही पक्षातील मंडळींनी नवरीला समजावण्याचा खूप प्रयत्न केला. परंतु ती लग्नासाठी तयार झाली नाही. नवरीमुलीच्या वडिलांनी नवरदेवाचे वडील अशोक कुमार ह्यांच्यावर फसवणुकीचा आरोप लावून लग्नाला नकार देत वरातींना बंदी बनवले.
गोंधळ इतका वाढला कि कोणीतरी पोलिसांना तक्रार दिली. पोलीस सुद्धा घटनास्थळी पोहोचली. परियर चौकी येथील इन्चार्ज रामजीत यादव गेस्ट हाऊस मध्ये पोहोचले. दोन्ही पक्षाला समजावल्यानंतर वधूपक्षाला शांत केले. नवरदेव पंकज फेरे घेतल्याविनाच माघारी परतला. तो दिल्लीत राहून नोकरी करतो. नवरीमुलगी प्रायव्हेट महाविद्यालयात शिक्षिका आहे. बोललं जात आहे कि वराकडच्यांनी मुलीकडच्यांना ५ लाख ६० हजार रुपये सुद्धा दिले. ह्यानंतर दोन्ही पक्षात सेटलमेंट झाले.