Breaking News
Home / मनोरंजन / वरमालेच्या वेळी वधू स्टेजवर चक्क कबड्डीच खेळू लागली, नवरदेव सुद्धा थक्क झाला

वरमालेच्या वेळी वधू स्टेजवर चक्क कबड्डीच खेळू लागली, नवरदेव सुद्धा थक्क झाला

मध्यंतरी आपल्या टीमने काही लग्नाचे वायरल व्हिडियोज बघितले होते ज्यात नवरा नवरी एकमेकांशी भांडत असतात. त्यातील एक व्हिडियो हा मुद्दामहून केलेल्या एका प्रहसनाचा भाग होता. पण नंतर नंतर हे असेच व्हिडियो दिसायला लागले. म्हंटलं हे काही बरोबर नाही. कारण आपल्या वाचकांसाठी आपण काही तरी खेळकर, विनोदी आणि मन प्रसन्न करणारं लेखन केलं पाहिजे. त्यासाठी तसे व्हिडियो ही वारंवार बघितले पाहिजेत, जसे आम्ही आधी करत होतो. मग काय, आमची टीम चट्कन असे गंमतीशीर व्हिडियो मिळतात का ते बघायला लागली.

आता लग्न म्हंटलं की गंमती जंमती असतातच. कारण साधी चार टाळकी जमली तरी किस्से आणि विनोद होत असतात. त्यात इथे तर नातेवाईक, इतर आप्तस्वकीय, मित्रमंडळी ही आलेली असतात. त्यात कोणी ना कोणी व्यक्ती ही विनोदी असतेच. काही जण तर त्यापुढे जाऊन जरा अतरंगी असतात. त्यामुळे समोर आलेल्या प्रत्येक क्षणांची मजा ते घेत असतात. अर्थात काही वेळेस अशा लोकांमुळे मजा कमी आणि डोक्याला ताप होतो. पण तरीही अशी मंडळी असावी लागतात. कारण त्या धावपळीत थोडासा विरंगुळा सगळ्यांनाच हवा असतो. तसेच लग्नात मजा तर हवीच असते. मग काही वेळा लग्नात छोटेखानी खेळ होतात. तर कधी कधी नवरा आणि नवरी यांच्याकडच्या बाजूंमध्ये मैत्रीपूर्ण चढाओढ असते. त्यातही वरमाला घालताना तर ही चढाओढ प्रचंड असते.

यात नवरा नवरी वरमाला घालताना दोघांनाही उचलून घेतलं जातं आणि मग वरमाला घालण्यास मजेशीर विरोध होतो. यावर अनेक सिनेमे, मालिका आणि अगदी जाहिरातीत ही सीन्स तयार केलेले दिसून येतात. पण या अशा प्रसंगी सहसा नवरा बायको हे कठपुतळ्यांसारखे असतात. बाकीचेच त्यांना खांद्यांवर नाचवत असतात. पण प्रत्येक गोष्टीला अपवाद असतातच की ! असाच एक अपवादात्मक व्हिडियो आमच्या टीमने आज पाहिला. व्हिडियो सुरू होतो तेव्हा आपल्याला लग्नाचा सुंदर असा सजलेला मंचक दिसून येतो. नवरा नवरी यांच्या बसण्यासाठी उत्तम आसन व्यवस्था असते. तेवढ्यात वरमाला विधी होण्याची वेळ आलेली असते. एका बाजूला असतो धिप्पाड, उंचापुरा आणि दमदार नवरदेव ! तर दुसऱ्या बाजूला नटलेली सुंदर अशी नवराई उभी असते ! पार्श्वभूमीवर संगीत ही वाजत असतं. या दोघांव्यतिरिक्त बाकीचे काही जण मंचावर असतात पण काहीसे लांब उभे राहून या दोघांना केंद्रस्थानी ठेवत असतात. तेवढ्यात विधी सुरू होतो आणि नवराई आपल्या हातातील वरमाला नवरोबाच्या गळ्यात घालते. आता तिची वरमाला घालून घेण्याची वेळ असते. स्टेजवर फटाके फुटू लागलेले असतात. पण याच क्षणी त्या नवराईला मजा करण्याची लहर येते.

एरवी बाकीच्यांनी तिला उचलून घेतलं असतं आणि नवरदेवाला हाल घालायला अटकाव केला असता. अर्थातच गंमत म्हणून ! पण इथे तसं कोणी नसत. पण म्हणून आपली नवराई थांबते होय. ती चक्क पाठी पाठी जाऊ लागते. अर्थातच नवरोबा हा तिच्या पाठी जाऊ लागतो. एक वेळ तर अशी येते की मंचावर असलेली बाकीची लोकं, ती आसनव्यवस्था उचलून दुसरीकडे ठेवतात. या दोघांच्या पकडापकडीत कोणाला लागू नये म्हणून असावं. पण कसलं काय? नवराई तिथे पण जाते. नवरदेवाला बराच वेळ फिरवते. एव्हाना डीजे ने ही गाणं बदललेलं असतं. पण या गाण्याची खासियत अशी की एका क्षणी हे गाणं वाजायला लागतं तेव्हा, बनवाबनवी चित्रपटातलं, ‘हृदयी वसंत फुलताना’ हे गाणं वाजवलं जातंय की काय अस वाटू लागतं. पण नंतर मात्र ते वेगळंच गाणं असल्याचं लक्षात येतं. असो. पण या सगळ्या धांदलीत नवरोबाची चांगलीच दमछाक होते. चांगल्या दणकट नवरोबाला ताई घुमवते आणि दमवते. मग मात्र एके ठिकाणी थांबते आणि आपला नवरदेव भाऊ तिला वरमाला घालतो. सरतेशेवटी लग्न संपन्न होतं. कोणत्याही लग्नात वरमाला घालण्याचा कार्यक्रम हा तसाही गंमतीने घेतला जातो आणि मग वरमाला घातली जाते. पण त्यातही या व्हिडियोत दिसणारा प्रकार मात्र एकमेव म्हंटला पाहिजे. आमच्या टीमने हा व्हिडियो बघितला आणि लक्षात आलं की आपल्या वाचकांना याविषयी जाणून घ्यायला आवडेल. त्यातूनच आजचा हा लेख लिहिला गेलेला आहे.

आपल्या टीमचा हा प्रयत्न आपल्याला आवडला असेल अशी अपेक्षा आहे. आपली टीम नेहमीच उत्तमोत्तम विषयांवर लेखन करत असते आणि करत राहील. त्यासाठी अर्थातच आपला पाठिंबा अपेक्षित आहे आणि जो आम्हाला मिळतो ही आहे. हा पाठींबा येत्या काळात ही मिळत रहावा ही सदिच्छा. आपली टीमही नेहमीच उत्तमोत्तम लेख आपल्या भेटीस घेऊन येत राहील याची खात्री बाळगा. लवकरच एका नवीन विषयासह भेट होईलच. तोपर्यंत आपल्या टीमचे अन्य नवनवीन लेख वाचत राहा. आठवणीने सगळे लेख शेअर करत राहा आणि आनंद वाटत राहा. धन्यवाद !!!

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published.