Breaking News
Home / मनोरंजन / वरळीच्या आजींचा अजून एक धम्माल व्हिडीओ, शांताबाई गाण्यावर केला डान्स

वरळीच्या आजींचा अजून एक धम्माल व्हिडीओ, शांताबाई गाण्यावर केला डान्स

वायरल व्हिडियोज वरील लेख म्हणजे आपल्या टीमची ओळख आणि खासियत बनत चालली आहे. खासकरून डान्सचे वायरल व्हिडियोज तर आपल्या वाचकांचा जीव की प्राण. आपल्या डान्स वायरल व्हिडियोज वरील लेखांना एवढा उत्तम प्रतिसाद मिळतो की त्याविषयी अजून लिखाण करण्याची ऊर्जा मिळते. मग त्यातून नवनवीन व्हिडियोज समोर येतात. आजही असंच झालं. आपल्या टीमने एक भन्नाट व्हिडियो पाहिला. आजचा हा लेख त्यावरच आधारित आहे तेव्हा चला मग जाणून घेऊयात त्या डान्स व्हिडियो विषयी.

हा डान्स व्हिडियो आहे एका आजींचा. आपल्या प्रत्येकाच्या घरात ज्या ज्या आजी असतात त्यांची डान्स करण्याची एक पद्धत असते. बहुतांश वेळा तर त्या डान्स करत नाहीत. पण केलाच तर मग आपलं जेवढ्यास तेवढं नाचल्या की मग त्यांना कसं तरी वाटतं. पण या व्हिडियोतील आजी मात्र एकदम बिनधास्त असतात. या आजींसोबत बाकीच्या स्त्रियाही असतात.

पण त्यांची ये जा चालू असते. कदाचित चाळीतील एखादा सण समारंभ असावा. कारण सगळ्यांच्या साड्या एकाच डिझाईनच्या दिसतात. तसेच आपल्या आजींसोबत असलेली मुलंही एकाच डिझाईनचे शर्ट घालून असतात. असो. तर मुद्दा आहे आजींच्या भन्नाट डान्सचा. व्हिडियो सुरू होतो तेव्हा ‘शांताबाई’ हे गाणं सुरू झालेलं असतं. आजींसोबत एक दादा असतो. सुरुवातीला त्याच्या हातात एक बाळ असतं. पण मग जशा आजी नाचायला लागतात तसा तो सुद्धा त्यांना साथ द्यायला लागतो. त्यामुळे बाळ जातं दुसरी कडे. पण या सगळ्यात आपलं लक्ष मात्र आजींवर असतं.वेगवेगळ्या स्टेप्स करत आजींचा डान्स चालू असतो. त्यांना ज्या ज्या स्टेप्स सुचतील त्या करत करत त्यांचा परफॉर्मन्स चालू असतो. आजूबाजूने येणाऱ्या जाणाऱ्या स्त्रिया त्यांच्याकडे कौतुकाने बघत असतात. एक ताई तर या आजींचा गालगूच्चा घेतात. पण आपल्या आजींचं मात्र ठरलेलं असतं. मस्त डान्स करायचा. त्यामुळे बाकीचे काय करतात याकडे त्यांचं फारसं लक्ष नसतं.

यात त्यांना साथ मिळते ती वर उल्लेख केला त्या दादाची. पण त्याचीही आजींच्या डान्स स्टेप्स मुळे हसून हसून पुरेवाट झालेली असते. इतका हसतो की त्यांना डान्स मध्ये साथ देता देता दादा ही एके ठिकाणी हात जोडतो. या आजींच्या उत्साहाला नकळतपणे त्याने केलेलं वंदन असतं ते असंच म्हंटलं पाहिजे. कारण आजींचा हा उत्साह बघून त्या दादा प्रमाणेच आपणही आजींचं कौतुक करत असतो. त्यांच्या या चिरतरुण वृत्तीसाठी त्यांना दाद देत असतो. असा उत्साह आपल्यातही आपल्या त्या वयात रहावा अस नकळत वाटून जातं. आपल्यालाही असच काहीसं वाटत असेल ना ?

मग वाट बघू नका मंडळी. आपल्याला हा व्हिडियो तर आवडला असणारच. पण सोबत काही निरीक्षणही आपण नोंदवली असतील. वर उल्लेख केल्याप्रमाणे काही विचारही आपल्या मनात डोकावून गेले असतील. आजींचं कौतुक करावंसं वाटलं असेल. यापैकी काही असेल ना तर ते आपल्या कमेंट्स मध्ये लिहा की. आजींचं जसं आम्हाला कौतुक वाटलं तसंच आपल्या मनातली कौतुकही कळू द्या. तसेच यानिमित्ताने एक बाब नमूद करावीशी वाटते. आपण आपल्या टीमने लिहिलेला प्रत्येक लेख मोठ्या प्रमाणावर शेअर करत असता. त्यातून आम्हाला प्रोत्साहन मिळतं आणि नवनवीन विषयांवर लेखन करण्याची ऊर्जा प्राप्त होते. तेव्हा आपला हा पाठिंबा आमच्या टीमच्या पाठी सदैव असू द्या ही विनंती. आपल्या पाठींब्यासाठी मनःपूर्वक धन्यवाद !!

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published.