Breaking News
Home / मनोरंजन / वरळीच्या आजींनी ‘इश्क तेरा तडपावे’ गाण्यावर केला अप्रतिम डान्स, आजींचा उत्साह तर तरुणांनाही लाजवेल

वरळीच्या आजींनी ‘इश्क तेरा तडपावे’ गाण्यावर केला अप्रतिम डान्स, आजींचा उत्साह तर तरुणांनाही लाजवेल

आयुष्यातील प्रत्येक चांगल्या क्षणाचा आनंद घ्यायचा असेल तर एक गोष्ट अगदी आवर्जून करावी लागते. ती म्हणजे त्या क्षणी लोकं काय म्हणतील आणि त्यांना काय वाटेल याचा विचार न करणे. कारण तुम्ही जेव्हा तुमच्या आयुष्यातील क्षणांचा आनंद घेत असता तेव्हा आपसूक बाकीची मंडळी सुदधा मनात कुठे तरी या आनंदात सहभागी होत असतात. याचंच उदाहरण देणारा एक वायरल व्हिडियो आपल्या टीमला सापडला. खरं तर त्याला व्ह्यूज तसे कमी आहेत. पण हा व्हिडियो जवळजवळ एका तपाच्या जवळपास जुना व्हिडियो आहे. तेव्हा तो जवळपास वायरलच म्हणूयात. पण ते काही असो. त्यातील एका आजींनी केलेला डान्स इतका अफलातून आहे की विचारता सोय नाही. आजचा हा लेख याच आजींच्या या मनमुराद डान्स साठी.

व्हिडियो सुरू होतो तेव्हा एक मस्त असं पंजाबी गाणं सुरू असतं. त्यावर डान्स करण्यासाठी आजूबाजूला बऱ्याचश्या महिला आणि मुली उपस्थित असतात. कदाचित एखाद्या चाळीतील समारंभ असावा. पण या सगळ्यांत जास्त लक्ष जातं ते एका आजीबाईंकडे. कारण कॅमेरामन स्वतः त्या आजींवर कॅमेराचा फोकस ठेऊन असतो. कारण त्याला माहिती असतं, आजींचं वय दिसतंय पण डान्स तर अशा जोमाने डान्स करतील की तरुण पण नाही एवढी ऊर्जा वापरू शकणार. ही बाब खरी ठरते.

गाणं सुरू झाल्यापासून आजी जे काही डान्स स्टेप्स करायाला सुरुवात करतात की दे धमाल. त्यांची डान्स करण्याची उर्मी बघून आपण थक्क होतो. आजी मात्र अगदी सहजगत्या डान्स करत असतात. त्यातही मान पुढे मागे करत त्या जेव्हा डान्स करतात तेव्हा मजा येते. एव्हाना त्यांच्या आजूबाजूला उपस्थित असलेल्या बायका मुली पण मस्त डान्स करत असतात. पण या आजींची सर येईल असं कोणीही नाचू शकत नाही. त्यामुळे त्या एकत्र नाचत असल्या तरीही छाप मात्र आजींची पडते. त्या क्षणी जणू आजींनी ठरवलेलं असतं, या गाण्यातील प्रत्येक बिट्स पकडत पकडत डान्स करायचा आणि मनमुराद आनंद घ्यायचा. एका क्षणी कॅमेऱ्यामागून काही मुली आणि बायका पुढे येत असतात. पण आजी डान्सच्या नादात त्यांना थांबायला सांगतात की काय असं वाटून जातं. या संपूर्ण डान्स मध्ये अजून एक गोष्ट भारी वाटते ती म्हणजे आजींच्या चेहऱ्यावरील बदलणारे भाव. कधी ते विनोदी असतात तर कधी मनमोकळेपणाने हसत असतात. त्यात एक गोष्ट मात्र कायम राहते ती म्हणजे त्यांचा उत्साह. त्यांच्याकडे पाहून त्या एवढा डान्स करतात त्याचं अप्रूप आणि कौतुक वाटतं. पण खरंच हा व्हिडियो अगदी मनापासून आवडून जातो.

आपल्या टीमला तर हा व्हिडियो एकदम आवडला. आपणही हा व्हिडियो बघितला असेल तर आपल्यालाही आवडला असेलच. या आजींची प्रत्येक क्षणात आनंद शोधायची वृत्ती दिसून येते. त्यांच्या डान्ससोबत ही वृत्ती सुद्धा आपलं मन जिंकून जाते. आपण अनेक वेळा ऐकतो किंवा वाचतो की Age is just a number, म्हणजे वय हे केवळ आकडे आहेत. याचा अर्थ असा की मन तरुण असेल कोणत्याही वयात आनंदाने जीवन व्यतीत करता येतं. आज या व्हिडियोच्या निमित्ताने याचा अनुभव घेता आला. या आजींना आपल्या टीमचा मानाचा मुजरा. तसेच हा व्हिडियो ज्यांनी रेकॉर्ड केला आणि या आजींना आपल्या समोर आणलं त्यांचे मनापासून धन्यवाद !! लेखाच्या समारोपापूर्वी आपण आमचे वाचक आहात त्याबद्दल धन्यवाद. कारण आपण ज्या मोठ्या प्रमाणावर आपले लेख शेअर करत असता, त्यामुळे आम्हाला सतत प्रोत्साहन मिळत राहतं. नवनवीन विषयांवर लिहिण्याची उर्जा कायम राहते. तेव्हा आपला हा पाठींबा आमच्या पाठीशी कायम असू द्या. लोभ असावा. धन्यवाद !!!

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *