Breaking News
Home / मनोरंजन / वरातीत फोटो काढण्यासाठी पैश्यांच्या नोटा घेऊन सर्वांसमोर हवा करत होता तरुण, पण पुढे मित्राने जे केले ते पाहून हसू आवरणार नाही

वरातीत फोटो काढण्यासाठी पैश्यांच्या नोटा घेऊन सर्वांसमोर हवा करत होता तरुण, पण पुढे मित्राने जे केले ते पाहून हसू आवरणार नाही

म्हणता म्हणता, मे महिना संपायला आलाय. उन्हं पळायला लागलीत. म्हणजेच येत्या काही दिवसांत मान्सून अगदी धडकेलच. अशा परिस्थितीत आता अनेकांची लग्न पण झाली आहेत. हळूहळू, त्यांचं प्रमाण ही कमी होईल. पण अस असलं, तरी या लग्नांमध्ये केलेली धमाल, मजा, मस्ती मात्र पुढचा बराच काळ लक्षात राहील. त्यातही मित्रांसोबत केलेले किडे तर विशेष लक्षात राहतील. पण या अशा किश्यांचं एक वैशिष्ट्य असतं.

हे किस्से आपल्याला मजा वाटणारे असले तरी ज्यांच्या बाबतीत घडतात, त्यांना मात्र वेगळ्याच कारणांसाठी लक्षात राहतात. अनेकवेळा याविषयीचा रागही त्यांच्या मनात बराच काळ राहतो. त्यातही मित्र दलिंदर असतील, तर बघायलाच नको. याचीच प्रचिती देणारा एक व्हिडियो, आमच्या टीमने नुकताच बघितला. व्हिडियो सुरू होतो तेव्हा, आपल्याला एका गावातील जागा दिसते. या गावातील लग्नात वाजंत्री आलेले असतात. तसेच खानपान – मद्यपान ही झालेलं असावं. कारण आपल्या समोरच, इथून तिथे रेंगाळणारी माणसं दिसत असतात. त्यांचे कपाळाला भिडणारे डोळे, त्यांची झुलती देहबोली, यावरून एकंदरच, यांना बरीच झाली असणार याची कल्पना येते. आता सहसा, अशावेळी, आपल्या हातात काहीही न ठेवलेलं बरं. कारण एकदा का यांच्या हाताला गोष्टी लागल्या की त्या आपल्या हातच्या गेल्याच म्हणून समजा. इथेही तेच होतं.

या सगळ्या मित्रांच्या घोळक्यात, एक माणूस हातात, नोटांची चळत घेऊन नाचत असतो. आता त्या नोटा खरंच, दौलत जादा करण्यासाठी असतात की दिखावा करण्यासाठी, कळत नाही. पण एक मात्र खरं, की त्यावेळी नाचताना उडवण्यासाठी म्हणून नक्कीच नसतात. कारण हा माणूस नाचता नाचता भान विसरतो आणि त्याची नोटांवरची पकड ढिली होते. त्याच्या बाजूचा आधीच भान विसरलेला असतो आणि त्याच नादात, त्या नोटांची चळत हातात घेऊन ती उडवतो ना महाराजा ! अबोबो… हे सगळं इतक्या पटकन घडतं, की आपल्याला हसू आलं नाही तरच नवल. कारण ज्याच्या हातातली नोटा उडवलेल्या असतात तो हवालदिल झालेला असतो. त्याच्या हातातील नोटा हवेत असतात आणि त्याचा जीव, त्याच्या कंठाशी आलेला असतो. बरं, आजूबाजूला कोणी नसेल असंही नसत. सगळी लहान पोरं उभी असतात. बरं, या लहान पोरांचं एक बघितलंय. अशा लग्नात वगैरे पैसे कोणी उडवले की पहिल्यांदा ही पलटण धावत सुटते. इथे तर काय, थेट पुढ्यातच पैसे उडवले जातात.

या चपळ, लहान मुलांच्या समोर ते दादा काय करणार. चरफडण कशाला म्हणतात ते यावेळी कळतं. गंमतीचा भाग असा की जो पैसे उडवतो तो सुमडीत निघून जातो. फुल्ल पोबारा ! पुढचा पूर्ण वेळ हे दादा, मग आपली ‘संपत्ती’ कशी लुटवली गेली हेच बघत राहतात. त्यांचे मित्र , ‘टल्ली’न झाल्याने त्यांना काही फरक पडत नसतो. पण या दादांची न पिता उतरलेली असते. असो. लग्नात काय एकेक गंमती जंमती बघायला मिळतील सांगू शकत नाही. हे त्याचं केवळ एक उदाहरण.

बरं तर मंडळी, हा होता आपल्या टीमने लिहिलेला लेख ! आपल्या टीमने लिहिलेला हा लेख आपल्याला आवडला असेल अशी अपेक्षा आहे. आपली टीम नेहमीच उत्तमोत्तम विषयांवर लेखन करत असते आणि करत राहील. त्यासाठी अर्थातच आपला पाठिंबा अपेक्षित आहे आणि जो आम्हाला मिळतो ही आहे. हा पाठींबा येत्या काळात ही मिळत रहावा ही सदिच्छा. आपली टीमही नेहमीच उत्तमोत्तम लेख आपल्या भेटीस घेऊन येत राहील याची खात्री बाळगा. लवकरच एका नवीन विषयासह भेट होईलच. तोपर्यंत आपल्या टीमचे अन्य नवनवीन लेख वाचत राहा. आठवणीने सगळे लेख शेअर करत राहा आणि आनंद वाटत राहा. धन्यवाद !!!

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published.