Breaking News
Home / मनोरंजन / वर्ग चालू असताना मध्येच घरी जाण्यासाठी ह्या मुलीची कारणे ऐकून तुम्हांलाही हसू येईल, बघा हा वायरल व्हिडीओ

वर्ग चालू असताना मध्येच घरी जाण्यासाठी ह्या मुलीची कारणे ऐकून तुम्हांलाही हसू येईल, बघा हा वायरल व्हिडीओ

लहान मुलं म्हणजे देवाघरची फुलेच. त्यांचं निरागस वागणं, बोलणं हे मनाला भुरळ पाडतं. तसेच त्यांच्या मनात काय चाललंय हे लपवताना त्यांची होणारी तारेवरची कसरत सुद्धा गोड वाटते. आता एका अनवी नावाच्या मुलींचंच घ्या की. एका गोड व्हिडिओ मध्ये ही अनवी शाळेतील कोणा बाईंना सांगते आहे की तिला घरी सोडा. पण थेट बोलण्याऐवजी ती तिच्या दादाचा दाखला देते. ती म्हणते तिला तिचा दादा व्यवस्थित बसला आहे की नाही, हे पाहायचं आहे म्हणून. समोरील बाई तिला तिचा दादा व्यवस्थित असल्याचं सांगतात. पण वर्गाबाहेर जायचं असं मनात पक्कं झालेली अनवी त्यांना खरं खरं सांगते.

आपल्याला या वर्गात बसायचं नाहीये हे तिचं म्हणणं. का म्हणून विचारलं तर म्हणे काही तरी दुखतंय. त्यावर काय दुखतंय असं विचारलं असता, आजी आणि अनवी ला त्रास होतोय असं काहीसं ती म्हणते. बरं दादाला भेटायला दप्तर ठेऊन जा सांगितलं तर तेही नाही. एकूण काय वर्गाबाहेर जाण्याची तिची गोड धडपड पाहून, नकळत चेहऱ्यावर हास्य उमटतं. तिच्या निरागसपणाचं वागणं पाहून हसू उमटतंच आणि काही अंशी बिचारीची किवही येते. त्यावेळी तिथे उपस्थित बाई, तिला समजावतात. या वर्गात इतर वर्गांच्या मानाने असलेल्या सुविधा कोणकोणत्या आहेत हे सांगतात. मग ती व्यवस्थित बसायची सुविधा असेल किंवा अगदी खेळण्याची. एकूणच काय तर या नटखट अनवीला मनवण्याचा प्रयत्न या बाई करतात. त्यांच्या या जुगलबंदीत व्हिडीओ संपतो खरा, पण चेहऱ्यावर एक हास्य देऊन जातो.

आम्ही हा वायरल व्हिडीओ खाली देत आहोत, तुम्ही एकदा नक्की पाहून घ्या. आणि हा व्हिडीओ आम्ही मनोरंजनपर हेतू टाकत असून ह्या व्हिडीओ टाकण्यामागे केवळ आणि केवळ प्रेक्षकांचे मनोरंजन करणे हा मुख्य हेतू आहे. त्यामागे कुणाच्या भावना दुखावण्याचा निश्चितच उद्देश नाही. या व्हिडियो सारखे अनेक गंमतीशीर व्हिडियो हे वायरल होत असतात. या वायरल व्हिडियोज वर मराठी गप्पाची टीम सातत्याने लेख लिहीत आलेली आहे. आपल्याला हे सदर लेख वाचायचे असल्यास आपण वर उपलब्ध असलेल्या सर्च ऑप्शनचा वापर करू शकता. यात आपण वायरल असं लिहून सर्च केल्यास आपल्याला वैविध्यपूर्ण लेख वाचावयास मिळतील. आपल्या वेळेसाठी आणि मराठी गप्पाचे नियमित वाचक होण्यासाठी मनःपूर्वक धन्यवाद !

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *