Breaking News
Home / मनोरंजन / वहिनीने दिराच्या लग्नात लग्नमंडपातच सर्वांसमोर केला अप्रतिम डान्स, बघा व्हिडीओ

वहिनीने दिराच्या लग्नात लग्नमंडपातच सर्वांसमोर केला अप्रतिम डान्स, बघा व्हिडीओ

लग्नाचे वायरल व्हिडियोज बघणं म्हणजे निखळ आनंद असतो. दोन प्रेमी जीव लग्नाबांधनात अडकत असताना आपण त्याचे कधी तरी साक्षीदार होत आहोत याचा आनंद खूप असतो. त्यात जर व्हिडियो मजा मस्ती आणि धमाल यांनी भरपूर असेल मग काय आनंद वाढतोच. या व्हिडियोज मध्ये सहसा आपल्याला दिसून येतात ते नववधू आणि वर. त्यांच्या डान्स आणि अभिनयाची चर्चा सतत होत असते.

पण यांच्यासोबतच अजून एक व्यक्ती असते जिच्यामुळे हे लग्नाचे व्हिडियोज वायरल होतात. ही व्यक्ती म्हणजे त्या लगीन घरातील वहिनीसाहेब. वहिनी आणि दिराच नात म्हणजे मायेचं आणि तेवढ्याच खेळकरपणाच. एखादया मोठ्या बहिणी किंवा आईसारखी माया लावणाऱ्या वहिन्यांची उदाहरण आपण बघतोच. त्यामुळे आपल्या दिराच लग्न असल्यावर त्या धमाल करणार नाहीत असं होणचं शक्य नाही. अशाच एका वहिनींच्या डान्सचा व्हिडियो आपल्या टीमच्या बघण्यात आला. व्हिडियो आहे लहान पण आनंद देणारा आहे. त्यामुळे म्हंटलं याविषयी आपल्या वाचकांना लेख वाचायला आवडेल. चला तर मग जाणून घेऊयात या व्हिडियो विषयी.

व्हिडियो सुरू होतो तेव्हा आपल्याला समोर एक रंगमंच आणि त्याजवळ बरीचशी माणसं दिसत असतात. त्यात आपल्या वहिनी असतात. आपल्या दिराच लग्न आहे म्हंटल्यावर त्यांच्यातला उत्साह दुणावलेला असतो. बरं गाणं पण धमाल लागलेलं असतं. ‘लो चली मैं, मेरे देवर की बारात ले के, लो चली मैं’ हे ते गाणं. एवढं सुप्रसिद्ध गाणं वाजत असताना त्याला साजेशा अशा छान स्टेप्स या वहिनींकडून केल्या जात असतात. त्यांच्या डान्सची सुरुवातच मुळी ठुमक्यांनी होते. मग वेगवेगळ्या स्टेप्स करत त्या छान डान्स करत राहतात. पण त्या एकट्याच थोडी डान्स करणार असतात? नाही. त्या गाण्यात जसे शब्द आहेत ‘देवर दुल्हा’ त्यांना अनुसरून त्या आपल्या दिराला या डान्स मध्ये सामील करून घेतात. तो ही मग त्यांना येऊन सामील होतो. राजेशाही शेरवानी घातलेला देवर आणि त्याच्या लग्नात मस्त डान्स करणारी वहिनी ही जोडी मग डान्स पूढे नेते. तरी हा दिर बराच वेळ जागीच उभा राहून वहिनीसोबत डान्स करत राहतो. मग मात्र वेळ असते ती नववधूने डान्स फ्लोरवर येण्याची. वहिनी तिला अगदी आवडीने डान्स फ्लोर वर घेऊन येतात.

हा कौतुक सोहळा नवऱ्यासकट सगळेच जण बघत असतात. आता तर धमाल येणार आणि या दोघी मस्त डान्स करत असतील असे वाटत असतं. नववधू पण डान्स करायच्या तयारीत असते. पण तेवढ्यात गाणं अचानक थांबत. क्षणभर काय होत कोणालाच कळत नाही. पण मग मात्र सगळेच जण हसायला लागतात आणि या दोन्ही जावा एकमेकांना आलिंगन देतात आणि व्हिडियो संपतो. त्या लग्नाच्या कार्यक्रमानुसार कदाचित काही ठरलं असावं आणि गाणं थांबलं असावं. असो. पण त्याआधी आपल्याला उत्तम डान्स बघायची संधी मात्र यानिमित्ताने मिळते हे मात्र खरं. आपल्या टीमला तर हा व्हिडियो खूप आवडला. आपणही हा व्हिडियो बघितला असल्यास आपल्यालाही पसंतीला उतरला असणार हे नक्की.

तसेच हा लेखही आवडला असेल अशी अपेक्षा आहे. आपली टीम आपल्या वाचकांसाठी नेहमीच विविध विषयांवर लेख लिहीत असते. हा लेख सुद्धा त्यातलाच एक आहे. आमच्या टीमला हे सगळं शक्य होतं ते आपल्या प्रोत्साहनामुळे. यापुढेही आपलं हे प्रोत्साहन आम्हाला मिळत राहो ही सदिच्छा. आपल्या या प्रोत्साहनाबद्दल मनःपूर्वक धन्यवाद !!

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *