Breaking News
Home / जरा हटके / वाढत्या उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून नवरदेवाने चक्क मंडपच वरातीसोबत नेले, बघा नक्की काय शक्कल लढवली ते

वाढत्या उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून नवरदेवाने चक्क मंडपच वरातीसोबत नेले, बघा नक्की काय शक्कल लढवली ते

दोन तीन दिवसांपूर्वी आलेला गारवा हा मनाला जरा सुखद अनुभव देऊन गेला होता. गेल्या संपूर्ण मार्च आणि एप्रिल या दोन्ही महिन्यांत आपण अगदी होरपळून निघालो होतो. अगदी मे महिन्याच्या सुरुवातीला ही असंच वातावरण होतं. पण गेल्या आठवड्यात जरा त्यावर थंड हवेचा उतारा सापडला होता. आज हा लेख लिहीत असताना पुन्हा एकदा उष्णता वाढते आहे. किंबहुना आपल्याकडील तापमान ४५° अंश सेल्सिअस पर्यंत राहील की काय अशी शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे पावसाळा पूर्ण अवतरेपर्यंत उन्हाच्या झळा मोठ्या प्रमाणात लागणार आहेत हे नक्की.

बरं याच काळात नेमके लग्नाचे मुहूर्त असतात. एरवी ही हे समारंभ होत असत. त्यावेळी ही उन्हं असत. पण यावेळची परिस्थिती खूपच वेगळी आहे. पण म्हणून लग्न व्हायची थांबणार आहेत का? अजिबात नाही. कारण संकटे आली तरी त्यावर तोडगा काढायचा हा मानवी स्वभाव असतोच. त्यात भारतीय माणूस मुळातच जुगाडु उपाय शोधण्याची हातोटी असलेला असतो. पण अनेकवेळा याच बुद्धीचा वापर काही दीर्घकालीन उपाय शोधून काढण्यावर ही होतात. तसेच अनेकवेळा आधीच उपयोगात असलेली वस्तू पुन्हा नव्याने कशी वापरावी याचीही कल्पकता दाखवणारी अनेक कल्पक उदाहरणं आपल्या आजूबाजूला बघता येतील. याचंच एक प्रातिनिधिक उदाहरण म्हणजे लग्नाच्या वऱ्हाडिंसाठी तयार करण्यात आलेला चालता फिरता मंडप होय.

आता मंडप ही संकल्पना काही नवीन नाहीये. पण आतापर्यंत ते केवळ लग्नस्थळी असायचे. त्यातही एवढ्या प्रचंड उन्हात तर नक्कीच असायचे. पण वरात लग्नस्थळी येत असताना, वरातीत नाचणाऱ्या वऱ्हाडी मंडळी आणि खुद्द नवरदेवाच्या डोक्यावर फिरता मंडप असावा ही संकल्पना मात्र पहिल्यांदाच बघितली गेली आहे. आपणही ती बघितली असेलच. नसेल बघितली तरी हरकत नाही. आपली टीम या विषयी आम्ही बघितलेले व्हिडियो खाली शेअर करेलच. यातील एक व्हिडियो हा आपल्या औरंगाबाद जिल्ह्यातील आहे. साधारणतः तीन ते चार आठवड्यांपूर्वी हा व्हिडियो चित्रित करण्यात आला होता. यात वऱ्हाडी मंडळीसाठी दोन ते चार फिरत्या मंडपांची सोय केल्याचं दिसून येतं. हे मंडप कापडी असल्याने भर उन्हात ही कडक सूर्यकिरणांच्या झळा त्यामानाने कमी जाणवल्या असतील. याच मांदियाळीतला दुसरा व्हिडियो हा सुरत येथील आहे. या व्हिडियोत ही आपल्याला एक मंडपधारी वऱ्हाडी मंडळ चालत जाताना दिसतं. पिवळ्या रंगाचा हा मंडप सगळ्यांचं लक्ष वेधून घेणारा ठरला होता हे नक्की. आम्ही दोन वेगवेगळे व्हिडीओ शेअर करत आहोत.

व्हिडीओ क्रमांक १ :

अनेक वाहिन्यांवरून आपण याची झलक पाहिली असेलच. असो. त्यामुळे उन्हाच्या झळा वाढल्या असल्या तरी त्यावर उपाय म्हणून फिरते मंडप ही वापरात येत आहेत हे बघायला मिळतंय. सध्या ही दोनच उदाहरण बघण्यात आली असली तरी येत्या काळात यात भर पडेल हे नक्की. पण अस असलं तरी, हा एखाद्या गंभीर विषयावरचा तात्पुरता उपाय झाला. किंबहुना आपले समारंभ उत्तमरीत्या व्हावेत म्हणून केलेली ही एक सोय आहे. ती यापुढेही वापरात येत राहीलच. गरज आहे ती या वाढत्या तापमानावर काही तरी ठोस उपाय करण्याची. येत्या काळात आपल्या भारतीयांच्या सुपीक डोक्यातून त्यावर ही काही तरी कल्पना आकारास येतील हे नक्की. आणि जेव्हा त्या येतील तेव्हा आमची टीम त्यावर लिहिल हे ही निश्चित ! सध्या मात्र आपला निरोप घेतो.

मंडळी, हा होता आपल्या टीमने लिहिलेला लेख ! आपल्या टीमने लिहिलेला हा लेख आपल्याला आवडला असेल अशी अपेक्षा आहे. आपली टीम नेहमीच उत्तमोत्तम विषयांवर लेखन करत असते आणि करत राहील. त्यासाठी अर्थातच आपला पाठिंबा अपेक्षित आहे आणि जो आम्हाला मिळतो ही आहे. हा पाठींबा येत्या काळात ही मिळत रहावा ही सदिच्छा. आपली टीमही नेहमीच उत्तमोत्तम लेख आपल्या भेटीस घेऊन येत राहील याची खात्री बाळगा. लवकरच एका नवीन विषयासह भेट होईलच. तोपर्यंत आपल्या टीमचे अन्य नवनवीन लेख वाचत राहा. आठवणीने सगळे लेख शेअर करत राहा आणि आनंद वाटत राहा. धन्यवाद !!!

व्हिडीओ क्रमांक २ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *