आजपर्यंत बॉलीवुड मध्ये जवळपास बऱ्याचश्या स्टार्सच्या जीवनावर आधारित चित्रपट बनले आहेत. मिशन मंगल आणि बाटला हाऊस ह्या चित्रपटानंतर देशभक्तीवर आधारित अजून एक चित्रपटासाठी तयार राहा. चित्रपट बालाकोट एयर स्ट्राईकवर आधारित असणार आहे. तीच सर्जिकल स्ट्राईक जी पुलवामा हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानवर केली होती. त्याच वेळी भारताने पाकिस्तानच्या काही आतंकवाद्यांना कंठस्थानी आणले होते. आता बॉलीवूड मधील सुपरस्टार विवेक ओबेरॉय भारतीय वायुसेनेच्या (IAF) विरतेला सलाम करण्यासाठी बालाकोट एयर स्ट्राइक वर एक चित्रपट घेऊन येण्याच्या तयारीत आहे.
अभिनंदन वर्थमान, इंडियन एअरफोर्स मध्ये विंग कमांडर आहेत. बालाकोट सर्जिकल स्ट्राईक नंतर दोन्ही देशांमधील तणाव खूप वाढले होते. पाकिस्तानी विमानाने भारतीय हद्दीत घुसण्याचा प्रयत्न केला होते. अभिनंदन ह्यांनी पाकिस्तानच्या एफ-१६ ह्या विमानाचा पाठलाग केला. त्या विमानाला तर पाडलं, परंतु ह्या चकमकीत त्यांचे स्वतःचे ‘मिग २१’ हे विमान क्रॅश झाले. एका पॅराशूटच्या मदतीने ते खाली उतरले परंतु पाकिस्तानच्या प्रदेशात. मग काय होतं, पाकिस्तानी आर्मीने त्यांना पकडलं. परंतु जनेवा कन्व्हेन्शन ऍक्ट नुसार पाकिस्तानला त्यांना भारतात सोडावं लागलं. त्यानंतर जे बनलं ते इतिहास झाला. भारतात एका हिरोसारखं त्यांचं स्वागत झालं. लोकांनी सोशिअल मीडियावर प्रोफाईल्स बदलली. टीव्ही चॅनल्सवर सुद्धा दिवसभर अभिनंदनच दिसत होते. चॅनल्सवाल्यांना खूप टीआरपी मिळाला. भारत सरकारने सुद्धा त्यांना वीर चक्र देऊन सन्मानित केले आहे आणि ह्याच अभिनंदन ह्यांच्या शौर्याबद्दल चित्रपट बनत आहे.
देशभक्तीवर आधारलेला हा चित्रपट ह्या वेळी अक्षय कुमार किंवा जॉन अब्राहाम नाही तर विवेक ओबेरॉय चित्रपट घेऊन येत आहे. प्रधानमंत्री मोदींच्या बायोपिक नंतर, विवेक ओबेरॉयने ‘बालाकोट’ नावाचा चित्रपट बनवणार असल्याचे घोषित केले आहे. चित्रपटाची शूटिंग ही काश्मीर, दिल्ली आणि आग्रामध्ये होऊ शकते. या वर्षीच्या शेवटपर्यंत चित्रपट बनून तयार होईल असे वर्तविले जात आहे. विवेक ओबेरॉयला चित्रपट बनवण्यास परवानगी मिळाली असून चित्रपटास हिंदी, तामिळ आणि तेलगू भाषेत बनवण्याचा बेत आहे.चित्रपटात अभिनंदन आणि पाकिस्तानी फायटर जेट्सला रोखण्यासाठी वायुसेनेच्या इंटरसेप्शन मिशनला गाईड करणारी स्क्वॉड्रन लीडर ‘मिन्टी अग्रवाल’ च्या रुपात चित्रपटात दिसणार आहे. आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की, अभिनंदन यांना वीर चक्र पुरस्काराने सन्मानित केले गेले आहे. तसेच मिन्टी ही युद्ध सेवा मेडल मिळवणारी प्रथम महिला बनली आहे.