Breaking News
Home / मनोरंजन / विद्यार्थ्याने शिक्षिकेसोबत संपूर्ण वर्गासमोर केला अप्रतिम डान्स, बघा व्हिडीओ

विद्यार्थ्याने शिक्षिकेसोबत संपूर्ण वर्गासमोर केला अप्रतिम डान्स, बघा व्हिडीओ

शाळेत असो वा कॉलेजमध्ये असो, फेअरवेल हा समारंभ आपल्या सगळ्यांसाठी महत्वाचा असतो. कारण या वर्षी आपण एका संस्थेतून खऱ्या आयुष्यात प्रयाण करत असतो. शाळेतून कॉलेजमध्ये जाणं हा ही एक वेगळाच अनुभव असतो. त्याच्या पुढचं पाऊल म्हणजे कॉलेज जीवनातून खऱ्या आयुष्यात कामाला सुरुवात करणे होय. त्यामुळे या बदलाच्या काळात, फेअरवेल ही बाब अतिशय महत्त्वाची होऊन जाते. त्यामुळे अनेकवेळा आपले सिनियर्स कॉलेजमध्ये असताना प्रत्येक गोष्टीत सहभागी व्हायला बघतात.

आपल्याला कदाचित त्यावेळी जाणवत नाही. पण आपण स्वतः त्या क्षणांचे साक्षीदार व्हायला लागलो की कळतं, की आता पुन्हा हा काळ अनुभवता येणार नाही. ही मजा मस्ती अनुभवता येणार नाही. त्यामुळे या शेवटच्या दिवशी जमेल तितकी धमाल करण्याकडे आपला कल असतो. मग कोणी डान्समध्ये भाग घेत असतात तर कोणी मस्तपैकी गाणं म्हणत असतात. तर काहींची अशीही मागणी असते की त्यांच्या शिक्षकांनी या त्यांच्या आनंदात सहभागी व्हावं. शिक्षक ही तसे विद्यार्थीप्रिय आणि उत्साही होतील तर अनेकवेळा सहभागी होतात. अर्थात त्यातही काही जण अगदी नावापुरते सहभागी होतात. पण हेच शिक्षक तरुण असतील तर त्यांचा सहभाग हा जास्त प्रमाणात असतो. तसेच ते ही या समारंभाचा आनंद घेत असतात.

आता आम्ही बघितलेल्या व्हिडियोचं उदाहरण घ्या. हा व्हिडियो काही काळापूर्वी प्रसिद्ध झाला होता. या व्हिडियोत आपल्याला एका संस्थेतील फेअरवेलचा कार्यक्रम चालू असलेला दिसतो. वर्गातील फळ्यावर तसं लिहिलेलं असतं. तसेच एक छोटा मंच हा महाविद्यालयात असतोच. त्यावर काही मुलं आपल्या उजवीकडे बसलेली असतात. तर आपल्या डावीकडे दोन मुली हसत असतात. हसत म्हणण्यापेक्षा थोड्या लाजत आणि आश्चर्यचकित झालेल्या असतात. पण का? कारण असतं एक विद्यार्थी आणि या सगळ्यांच्या शिक्षिका या डान्स करत असतात. या प्रकारचा डान्स आपण अनेकवेळा सिनेमातून पार्ट्यांमध्ये होताना बघितलेला असेल. खरं तर आपल्या शिक्षक वा शिक्षिकेच्या एवढ्या जवळ जाऊन डान्स करणं म्हणजे धाडसच. कारण आपण त्यांना डान्स करण्यासाठी विचारणे यातच अर्ध अवसान गळून पडेल. पण मुलगा धाडसीच असावा. तसेच शिक्षिका या सुद्धा शिस्तीच्या पण मैत्रीपूर्ण स्वभाव असणाऱ्या असाव्या. याचमुळे हे दोघेही वर उल्लेख केलेला डान्स करताना दिसतात. त्यांचा हा डान्स, अरिजित सिंघ यांच्या, ‘तुम ही हो’ या गाण्यावर होत असतो. अशी गाणी सहसा संथ चालीची असतात. त्यामुळे डान्सही तसाच होताना दिसतो.

अर्थात दोघांसाठी ही हा डान्स काही तितकासा सोप्पा नसतो, त्यामुळे दोघांच्या डान्समध्ये थोडा अवघडलेपणा जाणवतो. पण ते तर होणं स्वाभाविकच होतं. असो. आपल्या टीमने हा व्हिडियो बघितला आणि म्हंटलं यावर लेख लिहुया. काही तरी नवीन घडतंय तर त्याविषयी लिहायला हवं. त्यातूनच आजचा हा लेख आकाराला आला आहे. आपल्याला आमच्या टीमचा हा प्रयत्न आवडला असेल अशी अपेक्षा आहे. आम्ही ज्या व्हिडियो विषयी हा लेख लिहिला आहे तो व्हिडियो आपल्याला या लेखाच्या शेवटी बघायला मिळेल. आमच्या टीमने आपल्या।वाचकांसाठी तो खास शेअर केलेला आहे.

आमच्या या लेखसोबत आपण आमचे अन्य लेखही जरूर वाचा. कारण आपली टीम आपल्या वाचकांसाठी अगदी शोधून शोधून विषय निवडत असते. त्यावर माहिती घेऊन लिहीत असते. दिसलं काही तरी आणि लिहून दिलं अस होत नाही. अनेकवेळा तर विविध विषयांवर लिहिताना खूप वेळ ही जातो. पण आमची लिहायची आणि आपली वाचायची आवड यासाठी आम्ही हे अगदी मनापासून करत असतो. पुढेही करत राहू. गरज आहे ती आपल्या खंबीर पाठिंब्याची ! तो कायम मिळत राहू दे ही सदिच्छा ! लवकरच एका नवीन विषयासह भेटूच. तोपर्यंत काळजी घ्या, आमचे सगळे लेख वाचा आणि आठवणीने शेअर करा. धन्यवाद !!!

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *