Breaking News
Home / मनोरंजन / विनाकारण बाहेर फिरल्यावर पो’लीस कुठं मा’रतात, ह्या मुलाने इशाऱ्यावरून दिलेले उत्तर पाहून हसू आवरणार नाही

विनाकारण बाहेर फिरल्यावर पो’लीस कुठं मा’रतात, ह्या मुलाने इशाऱ्यावरून दिलेले उत्तर पाहून हसू आवरणार नाही

गेल्या सव्वा ते दीड वर्षांपासून क’रोना संक्रमणाचा काळ आपल्याकडे चालू आहे. त्याची सुरुवात कशी झाली, मग क’रोना होऊ नये म्हणून काय काळजी घ्यायची, बाकीची माहिती आणि एकंदर इतिहास आपल्याला माहिती आहेच. पण एवढं सगळं होऊनही आपल्यातील काही जणं मात्र यातून काही शिकले आहेत, असं वाटत नाहीत. अनेक वेळेस तर लॉक डाऊन असूनही अनेकांना कामाला जावं लागतं. ते बिचारे जीव मुठीत घेऊन कामावर हजेरी लावत असतात. पण याउलट काही जण, काहीही काम नसताना बाहेर कामाच्या नावाखाली फिरत असतात. अनेकांनी सांगून झालं. मध्ये तर लहान मुलांचे काही व्हिडियोज वायरल झाले होते आणि त्यातून लोकांनी विनाकारण बाहेर पडू नयेत, असा संदेश ही देण्यात आला होता. काहींना हा संदेश पटला, तर काहींचे पहिले पाढे पंचावन्न.

पण हरकत नाही. आज आपल्या टीमने पाहिलेला एक व्हिडियो आहे अगदी काही सेकंदांचा. लहान मुलाचाच विडियो आहे. लोकांनी लॉक डाऊन असताना विनाकारण बाहेर पडलं तर काय होतं हे सांगणारा हा व्हिडियो आहे. यात आपल्याला घरापुढील वऱ्हांड्यात एक लहान मुलगा आणि त्याच्या घरातील मोठ्या व्यक्ती असल्याचे जाणवते. त्या लहान मुलाचे वडील असावेत. ते त्याला विचारत असतात की बाहेर गेलं की पोलीस कुठे मारतात ? त्यावर हा छोटा चिमुकला आपल्या हाताने कुठे फटके बसतात हे दाखवुन देतात. त्याने निरागसपणे दिलेल्या उत्तराने कॅमेऱ्यामागे खसखस पिकलेली असते. तेव्हा पुन्हा विचारणा होते, की कुठे मारतात पोलीस ? पुन्हा आपला हा छोटा मित्र हाताने जागा दाखवत इथे मारतात हे सांगतो. पुन्हा पुन्हा हाच काय प्रश्न विचारला जातोय हे कळत नसतं त्याला. त्याच्या देहबोलीवरून हे कळत असतं. पण त्याच्या एकंदर हावभाव, देहबोली आणि निरागस उत्तर यांनी आपण हसत सुटतो. कॅमेऱ्यामागील एक ताईसुद्धा जोरात हसत सुटतात. खरंच त्याचं उत्तर आपल्याला बरंच काही सांगून जातं.

त्याने सोशल मीडियावर किंवा टीव्ही वर कोणी तरी फटके खात असल्याचे बघितले असावे किंवा कोणाचं बोलणं ऐकलं असावं. पण त्यामुळे कारण नसताना घराबाहेर पडणं योग्य नव्हे हे त्याला कळत असतं. जे या छोट्या जीवाला कळलं ते आपल्या पैकी काहींना कळायलाच हवं. ज्यांना अगदीच महत्वाचे काम आहे त्यांना बाहेर जाणं अपरिहार्य असतं. पण कारण नसताना बाहेर जाणं योग्य नव्हे. असो. अनेक मोठी माणसं सांगून थकली. पो’लीस सांगून, गाणी गाऊन आणि प्रसंगी फटके मारून थकले. आता वेळ आहे ती आपण स्वतःवर काही काळ निर्बंध घालून घेण्याची. जेव्हा लॉक डाऊन पूर्णपणे उठेल तेव्हा मुक्तपणे फिरता येईलच. तोपर्यंत थोडीशी कळ सोसूयात.

आपल्याला हा लेख आवडला असेल अशी अपेक्षा आहे. आपली मराठी गप्पाची टीम आपल्या वाचकांसाठी नेहमीच उत्तम असं काही शोधून त्यावर लेख लिहीत असते. हा लेखही त्याच प्रकारचा. या लेखातून विनाकारण फिरणाऱ्यांमध्ये काही प्रमाणात जनजागृती व्हावी ही अपेक्षा. या सोबतच आपल्या मराठी गप्पाच्या टीमने मनोरंजन क्षेत्रातील विविध विषयांवरही लेख लिहिले आहेत. त्यांचाही आनंद आपण नक्की घ्या. तसेच वाचक म्हणून आपला लोभ आमच्याप्रति कायम राहू दे हीच सदिच्छा. मनापासून धन्यवाद !!!

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *