Breaking News
Home / मनोरंजन / वेडिंग ऍनिव्हर्सरीला डान्स करणाऱ्या ह्या कपलची केमिस्ट्री पाहून तुम्हीदेखील कौतुक कराल, बघा व्हिडीओ

वेडिंग ऍनिव्हर्सरीला डान्स करणाऱ्या ह्या कपलची केमिस्ट्री पाहून तुम्हीदेखील कौतुक कराल, बघा व्हिडीओ

डान्स म्हंटला की तो सहसा उत्साहवर्धक, ऊर्जेने परिपूर्ण असावा असा आपला समज आहे. जो एका अर्थाने बरोबरच आहे. त्यातही तो डान्स जर आनंद व्यक्त करण्यासाठी केला असेल तर त्यात उत्साह आणि ऊर्जा ही हवीच. जर हा डान्स एका व्यक्तीने केला असेल तर या गोष्टी हव्याच असतात. पण यात एकापेक्षा जास्त व्यक्ती आल्या तर ट्युनिंग हा एक नवीन घटक ही येऊन मिळतो. हा घटक ज्या कपल किंवा ग्रुप डान्स मध्ये असेल त्यांचा डान्स जबरदस्त होतोच होतो. पण जर का हा घटक नसेल तर मग डान्स ऐवजी आपण सगळा सावळा गोंधळ पाहतो आहोत असंच वाटत राहतं. असो.

आपण ट्युनिंग जबरदस्त असलेले डान्स पाहतो तेव्हा आपसूक आपल्याला हे डान्स परफॉर्मन्स आवडून जातात. मग ते एखादया रियालिटी शो मध्ये केलेले असतील किंवा एखाद्या समारंभात. या परफॉर्मन्स ची छाप ही पडतेच. हे परफॉर्मन्स बराच काळ लक्षात ही राहतात. अशाच धाटणीचा एक परफॉर्मन्स आपल्या टीमने काही दिवसांपूर्वी पाहिला होता. हा एक वायरल झालेला व्हिडियो होता. यावर लेख लिहायचा विचार होताच. पण अन्य काही लेखांमुळे हा विषय थोडा पाठी पडला होता. पण आज मात्र समय भी हैं और दस्तुर भी. मग काय आमच्या टीमने याविषयी लिहायचं ठरवलं.

या परफॉर्मन्स मध्ये दिसून येते ती एक तरुण उमदा जोडी. एका लग्नाच्या निमित्ताने सजवलेल्या डान्स फ्लोअर वर ही दोघं जणं आपल्याला दिसून येतात. पुढे संपूर्ण व्हिडियो भर त्यांच्या डान्सचा बोलबाला दिसून येतो. सोबतच लक्षात राहावं असं त्यांचं जबरदस्त ट्युनिंग ही आपल्याला या व्हिडियोत अनुभवायला मिळतं. पूर्ण व्हिडियोत त्यांचा डान्स इतका मस्त असतो की आपलं लक्ष इतरत्र जात नाही. तरी एकदा एक दादा मधेच पाहुणे कलाकार म्हणून येतात. पण तरीही आपलं लक्ष मात्र या दोघांवर खिळलेलं राहतं. या दोघांची देहबोलीच इतकी ऊर्जेने परिपूर्ण असते की आपल्यातही बसल्या जागी उत्साह संचारावा. ज्यांना डान्स करण्याची जबरदस्त आवड आहे त्यांनी तर कदाचित हा व्हिडियो बघून डान्स केला ही असेल. कारण एखादं उत्तम गाणं ऐकलं की आपण ते गुणगुणत राहतो तसंच एखादा उत्तम डान्स बघितला की आपल्याला ही नाचवसं वाटतंच ना. त्यात हा व्हिडियो खुप लोकप्रिय ठरला आहे.

आजच्या घडीला केवळ पाच ते सहा महिन्यांत या व्हिडियोला दहा लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. यावरून हा व्हिडियो अल्पावधीत किती लोकप्रिय ठरला आहे याची कल्पना यावी. कदाचित आपणही हा व्हिडियो या अगोदर बघितला असण्याची शक्यता नाकारता येत नाही. पण जर आपण हा व्हिडियो बघितला नसेल तर जरूर बघा. या जोडीची ऊर्जा, त्यांच्या डान्स स्टेप्स आणि त्यांच्यातलं ट्युनिंग तुम्हाला ही भुरळ पाडेल हे नक्की.

तर मंडळी हा होता आजचा लेख. आपल्या टीमने लिहिलेला हा लेख आपल्याला आवडला असेल अशी अपेक्षा आहे. आपली टीम नेहमीच उत्तमोत्तम विषयांवर लेखन करत असते आणि करत राहील. त्यासाठी अर्थातच आपला पाठिंबा अपेक्षित आहे आणि जो आम्हाला मिळतो ही आहे. हा पाठींबा येत्या काळात ही मिळत रहावा ही सदिच्छा. आपली टीमही नेहमीच उत्तमोत्तम लेख आपल्या भेटीस घेऊन येत राहील याची खात्री बाळगा. लवकरच एका नवीन विषयासह भेट होईलच. तोपर्यंत आपल्या टीमचे अन्य नवनवीन लेख वाचत राहा. आठवणीने सगळे लेख शेअर करत राहा आणि आनंद वाटत राहा. धन्यवाद !!!

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published.