Breaking News
Home / मनोरंजन / वेड्यांच्या इस्पितळात गेल्यावर नेहमी सतर्क राहा, बघा ह्या व्यक्तीसोबत काय घडलं ते

वेड्यांच्या इस्पितळात गेल्यावर नेहमी सतर्क राहा, बघा ह्या व्यक्तीसोबत काय घडलं ते

सोशल मीडियावरील व्हिडीओ किंवा मीम्स नेहमीच आपले मनोरंजन करत असतात. काही व्हिडीओ आपल्याला हसवतात, तर काही आपल्याला आयुष्यातील सत्यता सांगतात आणि आपल्याला त्याची जाणीव करुन देतात. सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला व्हिडीओ देखील असाच काहीसा आहे. जो लोकांना मजेशीर रित्या आयुष्यातील एक सत्य बाजू दाखवत आहे. यातील एक बाजू सत्य आहे तर दुसरी बाजू कॉमेडी आहे. आजवर तुम्ही अनेक व्हिडीओ पाहिले असतील, जे व्हायरल असतात. पण एकाच व्हिडीओत सत्य आणि कॉमेडी अशा दोन्ही गोष्टी समजणार आहेत.

आता आधी मूळ मुद्दा समजून घेऊयात. हा व्हिडीओ एका येड्यांच्या इस्पितळातला आहे. महत्वाची बाब म्हणजे या व्हिडीओत कॉमेडी अँगलने पाहिलं तर विशेष काहीच घडत नाही. एक क्षण येतो आणि आपली हसून हसून पुरेवाट होते मात्र आम्ही जो अँगल तुम्हाला आता सांगणार आहोत. तोही तितकाच महत्वाचा आहे. तर आता आपण व्हिडीओकडे वळूयात.

या व्हिडीओत आपल्याला असे दिसून येते की, एक माणूस निवांत बाकड्यावर बसलेला आहे. तो मोबाईलमध्ये मान घालून बसला आहे, ज्यामुळे त्याचे दुसरीकडे लक्ष नाही. त्यातल्या त्यात जो माणूस मोबाईल मध्ये बघत असतो त्याचे दुसरीकडे लक्ष कधीच नसते, असे एक सर्वसामान्य निरीक्षण आहे. तर असाच हाही माणूस आपल्या मोबाईल मध्ये धुंद होता. त्याच्यामागून एक माणूस हळूच आला. बघितले आणि खाडकन कानाखाली जाळ काढला. त्याचा आवाज इतका मोठा होता की, सगळ्यांचे लक्ष तिकडे गेले. तर ज्याने कानाखाली वाजवली तो एक हॉस्पिटलमध्ये असणारा वेडा होता.

आता तो वेडाच आहे म्हटल्यावर त्याला काय आली लहर केला कहर असा मूड होता. त्यातल्या त्यात असा मोबाइल मध्ये डोके घालून बसलेला माणूस म्हणजे त्याच्यासाठी संधीच असते. तर या वेड्याने ज्या पद्धतीने खाडकन कानाखाली वाजवली, ते पाहून आपल्याला हसू आवरत नाही. साला वेडे पण किती कॉमेडी असतात, असे आपल्याला वाटून जाते.

आता हा झाला व्हिडीओचा कॉमेडी अँगल. आता आपण या व्हिडीओत असणारा “सत्य” अँगल जाणून घेऊयात. तर विषय असाय भावांनो… आपल्या आयुष्यात अनेकदा अशी परिस्थिती येते की, आपण हतबल झालेलो असतो. आपल्याला काहीच पर्याय समोर शिल्लक दिसत नसतात. आणि आपण काहीच करू शकत नसतो. फक्त दम धरणे, तगून राहणे एवढेच आपल्या हातात असते.

या व्हिडीओत ज्या व्यक्तीला कानाखाली बसली आहे, तो खरं तर हतबल आहे कारण या येड्याला आता आपण उलटून मारलं तर हा मागे लागायचा. नाही मारलं तर आपण शांत आहे, हे समजून पुन्हा अंगावर यायचा. आणि याच्याशी भांडत बसलो तर हेच हॉस्पिटलवाले आपल्याला पण येडे समजून इथे भरती करतील. त्यापेक्षा वेळ जाऊ देणे हेच योग्य आहे. कारण बऱ्याचदा आयुष्य जगत असताना असे प्रसंग येतात, जिथे ‘काळ’ हेच उत्तर असते. जशी वेळ सरत जाते तसे उत्तर मिळत जाते. हा व्हिडीओ तुमचं मनोरंजन करेलच याची खात्री आम्हाला आहे. म्हणूनच आता हा व्हायरल व्हिडीओ तुम्हीही बघा आणि मजा घ्या. काळजी घ्या तसेच आमचे लेख वाचून, व्हिडीओ पाहुन आनंदी राहा.

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *