Breaking News
Home / बॉलीवुड / शक्ती कपूरची बायको आहे बॉलिवूडच्या ह्या लोकप्रिय मराठी अभिनेत्रीची बहीण

शक्ती कपूरची बायको आहे बॉलिवूडच्या ह्या लोकप्रिय मराठी अभिनेत्रीची बहीण

बॉलिवूडचा लोकप्रिय अभिनेता शक्ती कपूरचे खरे नाव सुनील सिकंदरलाल कपूर आहे. परंतु चित्रपटांत आल्या नंतर व्हिलनच्या भूमिकेला साजेसे नाव दिसण्यासाठी त्याचे नाव शक्ती कपूर पडले. ३ सप्टेंबर १९५८ ला दिल्लीच्या एका पंजाबी कुटुंबात शक्ती कपूरचा जन्म झाला. आयुष्याच्या सुरुवातीच्या काळात त्याने खूप संघर्ष केला. त्याच्या वडिलांचे नवी दिल्लीत कपड्यांचे दुकान होते, तिथे शक्ती कपूर कपडे शिवण्याचे काम करायचा. जेव्हा सुनील दत्त आपला मुलगा संजय दत्त ह्याला चित्रपटसृष्टीत लाँच करण्यासाठी ‘रॉकी’ चित्रपट बनवत होते, तेव्हा त्यांनी शक्ती कपूरला पाहिल्यावर खलनायकसाठी निवडले. शक्ती कपूरने हिंदी सिनेमात अनेक प्रकारच्या भूमिका केल्या, परंतु त्याच्या व्हिलन वाल्या भूमिका प्रेक्षकांच्या आणि त्याच्या फॅन्सच्या जास्त लक्षात राहिल्या. त्याच बरोबर त्याने अनेक चित्रपटांत विनोदी भूमिका सुद्धा केल्या आहेत. गोविंदा सोबत त्याची जोडी खूप गाजली. तुम्हांला हे ऐकून आश्चर्य वाटेल, परंतु त्याने जवळजवळ ७०० पेक्षा जास्त चित्रपटांत काम केलेले आहे. शक्ती कपूरचे लग्न बॉलिवूडच्या लोकप्रिय अभिनेत्रीच्या बहिणीशी झाले आहे. दोघांचे लग्न सुद्धा एका चित्रपटाला शोभेल अश्या पद्धतीने झाले आहे. ते कसे झाले, हे आपण पुढे पाहणारच आहोत.

शक्ती कपूर ह्यांची मुलगी श्रद्धा कपूर लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिने सुद्धा आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून बॉलिवूडमध्ये आपली एक वेगळी ओळख निर्माण केली. शक्ती कपूरच्या चित्रपट करिअर बद्दल तर जवळजवळ सर्वांनाच माहिती आहे. तुम्हांला श्रद्धा कपूर बद्दल सुद्धा माहिती असेल. परंतु आज आपण शक्ती कपूरची पत्नी आणि कश्या पद्धतीने दोघांचे लग्न जमले ह्या विषयी जाणून घेऊया. शक्ती कपूरच्या पत्नीचे नाव शिवांगी कोल्हापुरे आहे. नावावरून तुम्ही ओळखलेच असेल. होय शिवांगी कोल्हापुरे ह्या बॉलिवूडच्या ८० च्या दशकातील लोकप्रिय मराठी अभिनेत्री पद्मिनी कोल्हापुरे ह्यांची बहीण आहे. शक्ती कपूर आणि शिवांगी कोल्हापुरेचे लग्न १९८२ मध्ये झाले होते. असं बोललं जातं कि दोघांनी पळून लग्न केले होते. शिवांगीचा जन्म मुंबईत झाला होता. शिवांगीच्या वडिलांचे नाव पंढरीनाथ कोल्हापुरे आणि आईचे नाव अनुपमा कोल्हापुरे आहे. वडील पंढरीनाथ कोल्हापुरे हे क्लासिकल गायक होते. शिवांगीने आपले शिक्षण पूर्ण झाल्यानंतर बॉलिवूडमध्ये प्लेबॅक सिंगर म्हणून आपल्या करिअरची सुरुवात केली होती. त्यानंतर तिने एक अभिनेत्री म्हणून बॉलिवूडमध्ये काम करण्यास सुरुवात केली. तिने काही मोजक्याच चित्रपटांत काम केले आहे.

पहिल्या फोटोत अभिनेत्री पद्मिनी कोल्हापुरे, तर दुसऱ्या फोटोत अभिनेत्री श्रद्धा कपूर आपल्या मावशी पद्मिनी कोल्हापुरे सोबत दिसत आहेत.

शिवांगीने वयाच्या केवळ अठराव्या वर्षीच लग्न केले. दोघांचा प्रेमकहाणीचा किस्सा सुद्धा काहीसा फिल्मीपद्धतीचाच आहे. शिवांगी आणि शक्ती कपूरची भेट ‘किस्मत’ चित्रपटाच्या शुटिंगवेळी झाली. हि भेट सुद्धा खूपच मनोरंजक पद्धतीने झाली होती. एका प्रोड्युसरला ‘किस्मत’ चित्रपटाच्या वेळी पद्मिनी कोल्हापुरे ह्यांना चित्रपटासाठी साइन करायचे होते. परंतु त्यावेळी पद्मिनी कोल्हापुरे व्यस्त असल्यामुळे, प्रोड्युसरने पद्मिनी ह्यांची बहीण म्हणजेच शिवांगी कोल्हापुरे ह्यांना चित्रपटासाठी साइन केले. आणि ह्या चित्रपटाच्या सेटवर शक्ती कपूर आणि शिवांगी मध्ये प्रेम झाले. शिवांगीच्या आई वडिलांना हे नातं मंजूर नव्हते आणि ते त्यावेळी ह्या दोघांच्या लग्नाविरुद्ध होते. ह्यानंतर शिवांगीने १८ वर्षाच्या वयातच शक्ती कपूरसोबत कोर्टात लग्न केले. लग्नानंतर शिवांगीने चित्रपटात काम करणे बंद केले. आज शिवांगी आणि शक्ती कपूर दोघांना दोन मुले आहेत. त्यातील एक म्हणजे श्रद्धा कपूर आणि मुलाचे नाव सिद्धांत कपूर. हे कुटुंब सुखी जीवन जगत आहे.

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published.