गणेशोत्सव असो लग्न असो वा नवरात्र असो, एक गाणं होतं, ज्यांन सगळ्यांची मने जिंकली होती. लहान पोरांपासून तर थोरांपर्यंत सगळे या गाण्यासाठी वेडे होते. ते हुकमी आणि हृदयात वाजणारं गाणं होतं, लटक मटक चवळी चटक… शांताबाय … शांताबाय..
अलीकडच्या काळात उत्सव हे मोठ्या प्रमाणात भरू लागले आहेत. खाजगी असो व सार्वजनिक लोकांना उत्सव करण्याची जाम हौस असते. आणि असे उत्सव गाजवण्यासाठी कुठलं तरी एक हुकमी धतिंग गाणं लागतंच. याला गावाकडे उडत्या चालीच गाणं म्हणतात. सध्या मराठी असो व हिंदी… अशाच धतिंग गाण्यांची चलती आहे. मात्र या अशा उडत्या चालींच्या आणि धतिंग गाण्यांची सुरुवात कोणी केली असेल तर ती शांताबाइ या गाण्याने.
को’रोनाच्या आधीचे सलग 2 गणेशोत्सव व इतर सार्वजनिक ‘ए शांताबाई’ या गाण्याने गाजवले. या गाण्यावर भक्तांची, नाचणाऱ्यांची, लेकरांची आणि नाचता न येणाऱ्यांचीसुद्धा पावलं बेफाम थिरकली. या गाण्याला अफाट लोकप्रियता मिळाली. त्यानंतर किती गाणी आली किती गेली पण या गाण्याचं भूत अजूनही प्रेक्षकांच्या डोक्यावरून उतरलेलं नाही. ‘रेतीवाला नवरा पायजे’, ‘वाट माझी बघतोय रिक्षावाला’, ही गाणीही मोक्कार हिट झाली. पण ही गाणी हिट होण्यामागे नेमकी कारणं काय? लोकांना ही गाणी एवढी का आवडतात? आधीही अशी गाणी यायची मग त्याला एवढी लोकप्रियता का मिळत नव्हती? ह्या प्रश्नाला खरंतर ठोस उत्तर नाहीच. मात्र या प्रश्नांना एकच उत्तर आहे, ते म्हणजे शांताबाई सारखी गाणी प्रसिद्ध होण्यामागे लहान मुले, महिला, तरुण, वयोवृद्ध हे सगळे आहेत.
कारण ही गाणी त्यांना भावतात. आता हीच गाणी लोकांना का भावतात, हे तुम्हाला नेमकं सांगता येणार नाही. पण आम्ही ते व्हिडीओच्या माध्यमातून दाखवू शकतो. असाच एक व्हायरल व्हिडीओ आमच्या टीमकडे आला. ज्यात एक 2-4 वर्षाचा मुलगा शांताबाई गाण्यावर डान्स करतो आहे. तोही एकदम तालात आणि एकदम मोसममध्ये… आता एवढ्या लहान मुलाला गाण्यावर नाचावस वाटत असेल तर तुम्ही समजू शकता की, ही गाणी लोकांमध्ये एवढी लोकप्रिय का आहेत. ह्या गाण्याची चाल आणि त्यावर लोकगीताचा असलेला प्रभाव उत्तम आहे, लक्षात राहण्यासारखी आहे, म्हणून ते गाणं लोकांना आवडतं. आता या लहानग्या पोराने एकदम अप्रतिम असा डान्स या गाण्यावर केला आहे. आणि या मुलाच्या निमित्ताने पुन्हा एकदा हे गाणं मार्केटमध्ये आलेलं आहे. हा व्हिडीओ बघा आणि आणि हे गाणं पुन्हा एकदा नव्याने एन्जॉय करा…
बघा व्हिडीओ :